तुम्ही किती वर्ष जगाल हे तुमच्या डोळ्यांद्वारे कळेल, ऑस्‍ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केला आहे दावा !!

तुम्ही किती वर्ष जगाल हे तुमच्या डोळ्यांद्वारे कळेल, ऑस्‍ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केला आहे दावा !!
eye scan

व्यक्तीचे उर्वरित जीवन किती बाकी आहे? हे त्याच्या डोळ्याच्या सहाय्याने आता आपल्याला कळणार आहे.आपले डोळे याची माहिती आपल्याला सांगणार आहेत.डोळ्यांची तपासणी केल्यानंतर मृत्यूच्या धोक्याबद्दलची माहिती दिली जाईल. कसा झाला हा संशोधन,हे संशोधनं नेमके काय सांगते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 21, 2022 | 7:42 AM

मुंबई :  या आधी सुद्धा शास्त्रज्ञांनी डोळ्यांचे स्कॅनिंग करून अल्‍जाइमर्स आजार ओळखण्याचा दावा केला आहे. व्यक्तीचे उर्वरित जीवन किती बाकी आहे? हे त्याच्या डोळ्याच्या सहाय्याने आता आपल्याला कळणार आहे. आपले डोळे याची माहिती आपल्याला सांगणार आहेत. डोळ्यांची तपासणी(Eye Scan) केल्यानंतर मृत्यूच्या धोक्याबद्दलची माहिती दिली जाईल. कसा झाला हा संशोधन,हे संशोधनं नेमके काय सांगते? सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास डोळ्यांची तपासणी करून मृत्यूचा हिशोब केला जातो हा दावा ऑस्‍ट्रेलिया (Australia) चे मेल्‍बर्न्‍स सेंटर फॉर आय रिसर्च संशोधकांनी नुकतेच याबाबत संशोधनं केले आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की डोळ्यांमध्ये असणाऱ्या रेटीना हे मानवाच्या आरोग्याचा आरसा असतो आणि म्हणूनच डोळे स्कॅन करून सांगितले जाऊ शकते की मनुष्याला मृत्यू(Death Risk) चा धोका आहे की नाही. आपले उर्वरित जीवन किती शिल्लक राहिलेले आहे. या सर्व गोष्टी आपल्या डोळ्यांमधील ज्या रेटिना असतात त्यांच्या अंदाजावरून आपण सगळ्या गोष्टी मांडू शकतो. रेटिना आपल्या आरोग्याच्या बाबतीत अनेक गोष्टी दर्शवत असते.

डोळ्यांची तपासणी करून भविष्यात येणाऱ्या मृत्यूबद्दल आपण जाणून घेऊ शकतो, हे एका संशोधनानुसार सिद्ध झालेले आहे.

अशाप्रकारे आपल्याला कळतो मृत्यूचा धोका

शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की व्यक्ती आणि रेटिना यांच्या वयाच्या अंतरानुसार एकंदरीत व्यक्ती भविष्यात किती वर्षे जिवंत राहणार आहे याबद्दल कळते.या संशोधनाच्या वेळी डोळ्यांची तपासणी केली गेली आणि आणि काही फोटो घेण्यात आले आहे व हे फोटो आर्टिफिशियल इंटेलिजेंस प्रोग्राम द्वारे यांचे विश्लेषण करण्यात आले. एकंदरीत विश्लेषण केल्यानंतर समोर जे परिणाम व निष्कर्ष आले त्यानुसार काही गोष्टी सिद्ध झाल्या. संशोधनानुसार प्रत्येक वर्ष उलटल्यानंतर मृत्यूचा धोका 2 टक्के अधिक वाढून जातो.

19000 डोळ्यांचे केले गेले स्कॅन

डेलीमेल यांच्या रिपोर्टनुसार मेल्‍बर्न्‍स सेंटर फॉर आय रिसर्च यांनी अभ्यास केला आणि या अभ्यासामध्ये विशेष आर्टिफिशियल इंटेलिजेंस एल्‍गोरिदिम तयार केले त्याच्या माध्यमातून डोळ्यांच्या रेटिनाची 19000 फोटो घेण्यात आले आणि या सर्वांचे विश्लेषण करण्यात आले या शिवाय युकेच्या बायोबँक मध्ये 36 हजार लोकांच्या रेटिना मधील वयातील गॅप समजून घेण्यात आला. रिपोर्टमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या जसे की 50 टक्के लोकांचे डोळ्यातील रेटिना ही त्यांच्या वयाच्या तीन वर्षापेक्षा जास्त मोठी होती म्हणजेच ती व्यक्ती वयाच्या तीन वर्षापेक्षा जास्त प्रगल्भ दिसून आली. तसेच काही लोकांच्या रेटीनामध्ये त्यांच्या वयाच्या तुलनेमध्ये त्यांच्या रेटिनाचे वय 10 वर्षापेक्षा जास्त अधिक दिसून आले.

एजिंगचे संकेत देतो रेटिना 

शास्त्रज्ञ डॉ. लीजा झू सांगतात की , संशोधना अंती एक गोष्ट समोर आली की, रेटिना आपल्या वाढत्या वयाचे इंडिकेटर देतो याचाच अर्थ रेटिना आपल्याला आपल्या वाढत्या वयाचे संकेत देत असतो. प्लेटिना च्या साह्याने आपण आपल्या डोळ्यांचे व हृदया संदर्भातील अनेक गंभीर आजार याबद्दल माहिती सुद्धा जाणून घेऊ शकतो. जे गंभीर आजार भविष्यात मनुष्याला मृत्युच्या जवळ घेऊन जातात तसेच यामुळे मृत्यूचा धोका सुद्धा वाढतो.

ब्र‍िटिश जर्नल ऑफ ऑप्‍थैल्‍मोलॉजी मध्ये पब्लिश करण्यात संशोधनानुसार आपल्या डोळ्याच्या मागे उपलब्ध असणारी एक लेयर प्रकाशामुळे सेन्सिटिव्ह बनते.आपण अनेक आजारांबद्दलची माहिती या द्वारे मिळवू शकतो. अनेक वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की,केलेल्या संशोधनामुळे भविष्यात अनेक गोष्टी समोर येणार आहेत आणि हा संशोधन मानवी जीवनासाठी प्रोत्साहन ठरणार आहे.

नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार रेटिना स्कॅन केल्यानंतर अल्‍जाइमर्स आणि हृदय रोगाची संबंधित भविष्यवाणी करण्यात आली होती असा दावा सुद्धा केला गेला होता.

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.

मासिक पाळीच्या दिवसात तू अल्कोहोलचं सेवन करतेय…थांब मग जरा, हे केल्याने शरीरावर काय परिणाम होतात ते जाणून घे…

तुम्हीही कोंब आलेल्या बटाट्यांचा वापर करताय; शरीराला आहे घातक…

Pushpa Movie: सर्वत्र गाजत असलेल्या ‘पुष्पा’ सिनेमातल्या शेषाचलम जंगलाबद्दल थक्क करणाऱ्या गोष्टी जाणून घ्या…


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें