AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवघरातील कापूर कोणत्या झाडापासून बनतो? 99 टक्के लोकांना माहितीच नाही

Kapur: देवाच्या आरतीसाठी किंवा हवन विधीसाठी कापून खूप महत्त्वाचा घटक आहे. कापूर हा ज्वलनशील पदार्थ आहे. आगीच्या जवळ जाताच कापूर पेट घेतो आणि मंद सुगंध सोडतो. मात्र तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की कापूर कशापासून तयार होतो? आज आपण याची माहिती जाणून घेऊयात.

देवघरातील कापूर कोणत्या झाडापासून बनतो? 99 टक्के लोकांना माहितीच नाही
camphor
| Updated on: Oct 18, 2025 | 4:09 PM
Share

आपल्या प्रत्येकाच्या घरात कापूर असतो. देवाच्या आरतीसाठी किंवा हवन विधीसाठी कापून खूप महत्त्वाचा घटक आहे. कापूर हा ज्वलनशील पदार्थ आहे. आगीच्या जवळ जाताच कापूर पेट घेतो आणि मंद सुगंध सोडतो. मात्र तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की कापूर कशापासून तयार होतो? कापूर तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा वापर केला जातो? कापूर इतका ज्वलनशील का असतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.

कापूर कसा तयार केला जातो?

कापूर दोन प्रकारचा असतो, एक म्हणजे नैसर्गिक कापूर आणि दुसरा म्हणजे कृत्रिम कापूर. नैसर्गिक कापूर हा कापूर वृक्षापासून तयार केला जातो. या झाडाचे वैज्ञानिक नाव सिनॅमोमूम कॅम्फोरा असं आहे. कापूर वृक्ष 50 ते 60 फूट उंच असते. या झाडाची पाने गोलाकार आणि 4 इंच रुंद असतात. या झाडाच्या सालीपासून कापूर तयार केला जातो. कापूर वृक्षाची साल सुकते किंवा राखाडी रंगाची होते, तेव्हा तिला झाडावरून काढले जाते. नंतर ही साल गरम करून रिफाईन केला जाते. नंतर तिची पावडर बनवली जाते आणि नंतर या पावडरला वेगवेगळा आकार दिला जातो. तसेच कार्बन आणि हायड्रोजनचे योग्य प्रमाण वापरून कारखाण्यांमध्ये कापूर तयार केला जातो.

कापूर वृक्ष कुठे आढळतो?

कापूर वृक्ष सर्वप्रथम चीनमध्ये आढळला असे मानले जाते. तांग राजवंशाच्या काळात कापूर वृक्षाचा वापर आइस्क्रीम मध्ये केला जायचा. तसेच चिनी लोक औषधांमध्येही कापूर वृक्षाचा वापर करत असत. भारतात 1882-83 च्या सुमारास लखनौच्या बागेत कापूर वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यानंतर ही लागवड आणखी वाढली. आता भारतातीस काही भागात या वृक्षाची लागवड आढळली जाते.

कापूर लवकर पेट का घेतो?

अनेकांना प्रश्न पडला असेल की कापूर लवकर पेट का घेतो? याचे कारण म्हणजे कापूरमध्ये कार्बन आणि हायड्रोजनचे प्रमाण जास्त असते. यामुळे आग पकडण्यासाठी खूप कमी तापमानाची आवश्यकता असते. त्यामुळे कापूर थोड्याशा उष्णतेनेही पेट घेतो. तसेच कापूर हा एक अत्यंत अस्थिर पदार्थ आहे. कापूर गरम केला जातो तेव्हा त्याची वाफ हवेत वेगाने पसरते आणि वातावरणातील ऑक्सिजनच्या मदतीने पेट घेऊ शकते.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.