Ganpati Visarajan: विसर्जन झाल्यावर मागे वळून बघू नये हे खरं आहे का? सत्य काय ते जाणून घ्या…
Ganpati Visarjan: गणपती विसर्जनाचा क्षण हा अत्यंत भावनिक असतो पण या विसर्जनानंतर मागे वळून पाहायचे की नाही याबद्दल अद्याप लोकांच्या मनात गूढच आहे.

- गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्साह जितका जास्त असतो, तितकाच त्यांच्या विसर्जनाचा क्षण अत्यंत भावनिक असतो. दीड दिवस, तीन, पाच, सात किंवा दहा दिवस घरात राहिल्यानंतर बाप्पाला निरोप देताना प्रत्येक कुटुंबाची वेगवेगळी पद्धत असते.
- उत्तरपूजा, आरती, अक्षता, नैवेद्य, विसर्जनाचा मंत्र, जयघोष आणि त्यानंतर पाळल्या जाणाऱ्या विविध प्रथा या सगळ्यांचा या निरोपात समावेश होतो.
- यापैकी एक प्रथा जी नेहमीच चर्चेत असते ती म्हणजे ‘बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर मागे वळून पाहू नये.’ काही जण याला शास्त्र मानतात, तर काही जण श्रद्धेचा भाग मानतात.
- गणपती विसर्जनाच्या वेळी सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न हाच असतो की, ‘बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर मागे वळून पाहावे की नाही?’ यामागे अनेक लोकमान्यता असल्याचे म्हटले जाते.
- काहींच्या मते बाप्पाकडे मागे वळून पाहिले तर निरोप देताना मनात मोह राहतो. तर असं की म्हटले जाते की बाप्पाने घरातील दुःख आणि अडचणी सोबत घेऊन जाव्यात आणि भक्तांनी नव्या आशेने घरी परतावे.
Follow Us





