AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gulf Countries : सौदी ते ओमान, कोणत्या आखाती देशात किती मुस्लीम लोकसंख्या?

इराण-अमेरिका संघर्षामुळे चर्चेत आलेल्या सौदी अरेबिया, युएई आणि कतारसह सहा आखाती देशांमधील मुस्लिम लोकसंख्येची सविस्तर आकडेवारी आणि धार्मिक रचना जाणून घ्या.

Gulf Countries : सौदी ते ओमान, कोणत्या आखाती देशात किती मुस्लीम लोकसंख्या?
| Updated on: Mar 29, 2026 | 1:32 PM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी तणाव सातत्याने वाढत आहे. या वाढत्या तणावामुळे आखाती देशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा जागतिक चर्चेचा विषय बनला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा सर्वाधिक फटका पर्शियन आखातातील देशांना बसला आहे. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE), बहरीन, कुवेत, ओमान आणि कतार या सहा देशांना जागतिक ऊर्जा केंद्र म्हणून ओळखले जातो. जगाचे ऊर्जा केंद्र असणारे हे देश केवळ खनिज तेलासाठीच नव्हे, तर त्यांच्या वेगाने बदलणाऱ्या लोकसंख्येमुळेही चर्चेचा विषय ठरत आहेत. आज आपण सौदी अरेबियापासून ते ओमान या देशांमधील मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण किती याबद्दलची माहिती घेणार आहोत.

सौदी अरेबिया

आखातातील सर्वात मोठे राष्ट्र असलेल्या सौदी अरेबियाची लोकसंख्या ३७ दशलक्ष (३.७ कोटी) इतकी आहे. वर्ल्डोमीटरच्या ताज्या अहवालानुसार, येथील ९३ टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. विशेष म्हणजे, सौदी अरेबिया हा सर्वात तरुण देश असून, येथील ५६ टक्के लोकसंख्या ३० वर्षांखालील आहे. धार्मिक विभागणीनुसार येथे बहुसंख्य सुन्नी मुस्लिम असून शिया समुदायाचे प्रमाण १५ टक्के आहे.

संयुक्त अरब अमिराती (UAE)

UAE ची लोकसंख्या ११.५ दशलक्ष (१.१५ कोटी) इतकी आहे. दूतावासाच्या माहितीनुसार, येथील ७५ टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांसारख्या देशांतून आलेल्या स्थलांतरित कामगारांमुळे येथील लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. व्यावसायिक संधींमुळे येथे मुस्लिम लोकांचे प्रमाण जास्त आहे.

ओमान

ओमानची लोकसंख्या ५६ लाख असून त्यापैकी ९५ टक्के नागरिक मुस्लिम आहेत. या लोकसंख्येत ५७ टक्के स्थानिक ओमानचे नागरिक तर ४३ टक्के परदेशी आहेत. ओमानची धार्मिक रचना इतर देशांच्या तुलनेत वेगळी आहे. याठिकाणी मुस्लिम समुदायामध्ये ७० टक्के इबादी, २० टक्के सुन्नी आणि ५ टक्के शिया पंथाचे लोक आहेत. ओमान सरकारने हिंदू, शीख आणि ख्रिश्चन संघटनांना अधिकृत मान्यता दिली आहे. येथे धार्मिक सलोखा मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

कुवेत

कुवेतची एकूण लोकसंख्या ५१ लाख असून, जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ०.०६१ टक्के आहे. येथील ७५ टक्के लोकसंख्या मुस्लिम असून उर्वरित २५ टक्के भागात हिंदू, ख्रिश्चन आणि इतर धर्मांचे लोक राहतात.

कतार

कतारची लोकसंख्या ३० लाख असून येथील ९७ टक्के लोक शहरी भागात राहतात. एकूण लोकसंख्येपैकी ६५ टक्के लोक मुस्लिम आहेत. उर्वरित लोकसंख्येमध्ये १५ टक्के ख्रिश्चन, १४ टक्के हिंदू आणि ३ टक्के बौद्ध धर्मीय आहेत.

बहरीन

बहरीनची लोकसंख्या १६ लाख असून येथील सर्व लोक हे शहरी भागात राहतात. बहरीनमध्ये ८२ टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. लोकसंख्येच्या बाबतीत बहरीनचा जगात १५३ वा क्रमांक लागतो.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय