AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरता का? 1 जुलैपासून ‘हे’ नियम बदलणार

राज्यातील दोन मोठ्या खासगी बँका आपल्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये काही बदल करत आहेत. हे नवे बदल 1 जुलै 2025 पासून लागू होतील. एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक अशी या दोन बँकांची नावे आहेत. चला जाणून घेऊया.

तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरता का? 1 जुलैपासून ‘हे’ नियम बदलणार
| Updated on: Jun 10, 2025 | 2:04 PM
Share

आजकाल बहुतेक लोक क्रेडिट कार्ड वापरणे पसंत करतात. क्रेडिट कार्ड न वापरणारे फार कमी लोक आहेत. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांमध्ये तुम्हीही असाल तर देशातील दोन मोठ्या खासगी बँकांकडून त्यांच्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये काही बदल केले जात आहेत. हे नवे बदल 1 जुलै 2025 पासून लागू होतील. एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक अशी या दोन बँकांची नावे आहेत. या दोन्ही बँका आपल्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल करत आहेत.

एचडीएफसी बँकेचे नवे क्रेडिट कार्ड नियम

एचडीएफसी बँक देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक आहे. या बँकेच्या नवीन क्रेडिट कार्ड नियमांनुसार, एचडीएफसी बँकेच्या ग्राहकाने ड्रीम 11, रम्मीकल्चर, जंगली गेम्स किंवा एमपीएल सारख्या ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर 1 महिन्यात 10,000 रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास त्याला एकूण किंमतीच्या 1 टक्के रक्कम भरावी लागेल. हे शुल्क 4,999 रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही. नव्या नियमांनुसार गेमिंग ट्रान्झॅक्शनवर रिवॉर्ड पॉईंट मिळणार नाहीत.

हेच शुल्क आपल्या एचडीएफसी क्रेडिट कार्डवरून पेटीएम, मोबिक्विक, फ्रीचार्ज किंवा ओला मनी सारख्या थर्ड पार्टी वॉलेटमध्ये एका महिन्यात 10,000 रुपयांपेक्षा जास्त जोडण्यासाठी देखील लागू असेल. याशिवाय तुमचे बिल 50,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास युटिलिटी पेमेंटवरही हा 1 टक्के चार्ज लागू होईल. यात विमा देयकांचा समावेश नाही. त्याचबरोबर एचडीएफसी बँकेने भाडे, इंधन आणि शैक्षणिक व्यवहारांसाठी शुल्काच्या मर्यादेतही बदल केला आहे. यावरील शुल्कही प्रति व्यवहार 4,999 रुपयांपेक्षा जास्त असणार नाही.

आयसीआयसीआय बँकेचे नवे क्रेडिट कार्ड नियम

आयसीआयसीआय बँक ही देशातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे. क्रेडिट कार्डच्या नव्या नियमांनुसार, आयसीआयसीआय बँक आता केवळ अशा ग्राहकांनाच मोफत डोमेस्टिक एअरपोर्ट लाउंज सुविधा देणार आहे ज्यांनी मागील तिमाहीत आपल्या कार्डवर कमीतकमी 75,000 रुपये खर्च केले आहेत. ही सुविधा केवळ 3 महिन्यांसाठी उपलब्ध असेल. याशिवाय बँकेने आपल्या काही सेवांच्या नियमांमध्येही बदल केला आहे.

  • आयसीआयसीआय बँक आता कॅश डिपॉझिट, चेक डिपॉझिट आणि डीडी आणि पीओ ट्रान्झॅक्शनसाठी वेगळे शुल्क आकारणार आहे.
  • आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना आता प्रत्येक 1000 रुपयांमागे 2 रुपये मोजावे लागतील, परंतु किमान 50 रुपये आणि जास्तीत जास्त 15,000 रुपये आकारले जातील.
  • आयसीआयसीआय बँकेने एटीएमच्या 3 मोफत व्यवहारांनंतर आर्थिक व्यवहारांसाठी 23 रुपये आणि बिगर वित्तीय व्यवहारांसाठी 8.5 रुपये आकारले आहेत.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.