भारत कसा बनला इंडिया, कधी मिळाली या शब्दाला मंजुरी, जाणून घ्या यामागचा इतिहास

काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की भारतासाठी इंडिया हा शब्द ग्रीक वरून लॅटिन भाषेत बदललेल्या इंडिका या शब्दापासून प्रेरित झाला आहे. (How Bharat became India, when was the word approved, know the history behind it)

भारत कसा बनला इंडिया, कधी मिळाली या शब्दाला मंजुरी, जाणून घ्या यामागचा इतिहास
भारत कसा बनला इंडिया, कधी मिळाली या शब्दाला मंजुरी
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 4:23 PM

नवी दिल्ली : नेहमी देशात भारत, हिंदुस्थान किंवा इंडिया याबाबत वाद होत राहतात. अनेक लोक देशाच्या नावाबद्दल भिन्न मते देखील व्यक्त करतात. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे की भारतला इंडिया का म्हटले गेले आणि त्याचे नाव कसे पडले. त्याची कहाणी अत्यंत रंजक आहे. काही लोक असे मानतात की इंडिया हा शब्दसुद्धा सिंधू संस्कृतीतून आला आहे. इंडिया या शब्दावरुन बरेच वाद झाले. (How Bharat became India, when was the word approved, know the history behind it)

भारत नाव कसे पडले?

काही लोक म्हणतात की, भारत किंवा भारतवर्ष हे देशाचे खरे नाव आहे. असे म्हणतात की या देशाचे नाव भरत घराण्याच्या नावावरुन पडले. राजा दुष्यंत आणि राणी शकुंतला यांचा मुलगा असलेला महान राजा भरत हा या घराण्याचा पुढारी होता असे म्हणतात. राजा भरत हा भारताचा पहिला राजा मानला जातो. म्हणूनच अनेक इतिहासकारांचा असा विश्वास आहे की या शक्तिशाली राजाच्या नावावरुन भारत देशाचे नाव देण्यात आले.

काय आहे 17 व्या शतकाचा इतिहास?

काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की भारतासाठी इंडिया हा शब्द ग्रीक वरून लॅटिन भाषेत बदललेल्या इंडिका या शब्दापासून प्रेरित झाला आहे. ब्रिटिशांनी सर्वात प्रथम भारताऐवजी इंडी(Indie) शब्द वापरला. सुरुवातीच्या काळात फ्रेंच भाषेच्या प्रभावामुळे त्यांनी हे केले होते. पण 17 व्या शतकात ब्रिटीश सरकारने इंडियाला स्वीकारले आणि नंतर हे नाव जबरदस्तीने लागू केले. ब्रिटीश हळूहळू भारत काबीज करीत होते आणि नावे बदलत होते. येथील वसाहतीच्या काळात त्यांनी इंडिया हा शब्द प्रचंड वापरला. यामुळे, काही लोक अजूनही मानतात की इंडिया हा शब्द गुलामीचे प्रतीक आहे.

ब्रिटिश येण्यापूर्वी हिंदुस्थान संबोधले जायचे

काही लोक असे मानतात की इंडिया हा शब्दसुद्धा सिंधू संस्कृतीतून आला आहे. हे इंग्रजीत इंडस व्हॅली म्हणून ओळखले जात असे. काही इतिहासकारांच्या मते, इंडस हा शब्दामध्ये सुधारणा करीत भारत इंडिया बनला आणि नंतर तो इंडिया म्हणून ओळखला गेला. काही लोकांचे म्हणणे आहे की जेव्हा ब्रिटिश भारतात आले त्यावेळी आपल्या देशाला हिंदुस्थान म्हटले जात असे. हा शब्द बोलण्यात त्यांना अवघड जात होते. ब्रिटिशांना जेव्हा कळले की लॅटिन भाषेत भारत या शब्दाला इंडिया म्हणतात तेव्हा त्यांनी भारताला इंडिया म्हणून संबोधण्यास सुरवात केली. इंडिया हे नाव ब्रिटीशांच्या काळात खूप प्रसिद्ध झाले आणि आपला देश जगात या नावाने ओळखला जाऊ लागला.

इंडिया नावावर वादविवाद

1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. सन 1949 मध्ये देशाची राज्यघटना तयार करण्यात आली होती. 17 सप्टेंबर 1949 रोजी युनियनच्या नावे व राज्ये यावर चर्चा सुरू झाली. घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांनी अर्ध्या तासात ते मान्य करावे अशी इच्छा व्यक्त केली. परंतु इंडिया आणि भारत सारख्या शब्दांमधील संबंध समजून घेण्यास इच्छुक असलेल्या इतर सदस्यांमध्ये नावाबद्दल मतभेद होते. यावर बरेच वादविवाद झाले आणि सेठ गोविंद दास, कमलापती त्रिपाठी, श्रीराम सहाय, हरगोबिंद पंत, हरी विष्णू कामथ या नेत्यांनी या चर्चेत भाग घेतला. हरि विष्णू कामथ यांनी सुचवले की इंडिया अर्थात भारतला भारत किंवा इंडिया मध्ये रूपांतरीत करण्यात यावे.

भारताचे इंडिया नाव कसे स्वीकारले?

त्यानंतर, सेठ गोविंद दास यांनी भारताच्या ऐतिहासिक संदर्भाचा उल्लेख करीत देशाचे नाव भारत ठेवण्याचा आग्रह धरला. यावर कमलापती त्रिपाठी यांनी मधला मार्ग काढला. ते म्हणाले की, त्याचे नाव इंडिया अर्थात भारत ऐवजी भारत अर्थात इंडिया ठेवले पाहिजे. हरगोविंद पंत यांनी आपले मत मांडले की ते नाव भारतवर्ष असावे, दुसरे कोणतेही नाही. परंतु या चर्चेनंतर इतर देशांशी असलेल्या संबंधांचा संदर्भ देऊन आणि देशातील प्रत्येकाला एकाच धाग्यात जोडण्याचा प्रयत्न करीत घटनेच्या अनुच्छेद 1 मध्ये असे लिहिले गेले की इंडिया म्हणजे भारत एक संघराज्य असेल. तेव्हापासून त्या देशाला इंडिया आणि इथले लोक इंडियन म्हणून ओळखले जाऊ लागले. (How Bharat became India, when was the word approved, know the history behind it)

इतर बातम्या

‘सर्वपक्षीय नेत्यांनी मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली’, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याबाहेर मराठा तरुण आक्रमक

पंतप्रधान मोदींना कोविड 19 आजपर्यंत समजलाच नाही, त्यामुळे लाखोंचा मृत्यू, आकडेवारीतही खोटारडेपण : राहुल गांधी

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.