AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य सरकारकडून दहावीच्या निकालाचे निकष जाहीर, याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांना काय वाटतं?

दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात याचिका करणाऱ्या धनंजय कुलकर्णी यांनी राज्य सरकारच्या निकषांवर टीका केली आहे. Dhananjay Kulkarni Maharashtra SSC Result

राज्य सरकारकडून दहावीच्या निकालाचे निकष जाहीर, याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांना काय वाटतं?
वर्षा गायकवाड धनंजय कुलकर्णी
| Updated on: May 28, 2021 | 4:08 PM
Share

पुणे: महाराष्ट्र सरकारनं आज दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे आणि अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे निकष जाहीर केले. राज्य सरकारच्या या निर्णयावर दहावी परीक्षा रद्द करण्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या धनंजय कुलकर्णी यांनी आक्षेप घेतले आहेत. शासनाने दहावीच्या परीक्षेबाबत घेतलेल्या निर्णयात नेमकेपणाचा अभाव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर, राज्य सरकारनं निकष जाहीर केले असले तरी हे प्रकरण सध्या न्यायालयात असल्यानं न्यायालय घेईल तो निर्णय अंतिम असेल, असंही कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं. (Dhananjay Kulkarni raise objection on guidelines issued by Government of Maharashtra regarding SSC Result)

राज्य सरकारची भूमिका गोंधळात टाकणारी

राज्य शासनाने विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारी भूमिका घेतली असल्याचा दावा धनंजय कुलकर्णी यांनी केला. शासन म्हणतंय अंतर्गत मूल्यमापनानुसार गुणं दिले जातील. पुन्हा म्हणतंय 11वीच्या प्रवेशासाठी सीईटी ही घेणार आहोत. ज्यांना कोणाला गुणांवर शंका असेल त्यांच्यासाठी स्वतंत्र परीक्षा ही घेतली जाईल, असं सांगितलं गेलं. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयात नेमकेपणाचा अभाव असून त्यांची भूमिका विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारी आहे, असं कुलकर्णी म्हणाले.

न्यायालयाचा निर्णय अंतिम

दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हे सगळं प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय अंतिम असेल. विद्यार्थ्यांचं अंतर्गत मूल्यमापन झालंय का ? हा प्रश्न आहे, असा सवालही कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. सरकारला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं न्यायालायत द्यावी लागतील. न्यायालयाचा निर्णय अंतिम असेल, अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे.

दहावीचा निकाल कसा लावणार? राज्य सरकारचे निकष काय?

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल लावताना 9 वी व10 वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट2019 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल. शैक्षविक वर्ष 2020-21 साठी इ.10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे. i. विद्यार्थ्यांचे इ 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण देण्यात येतील. ii. विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण देण्यात येतील. iii. विद्यार्थ्यांचा इ. 9 वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या:

दहावीची परीक्षा, निकाल ते 11 वी प्रवेश आणि CET, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

FYJC Class 11th Admission Process Maharashtra | अकरावीची प्रवेश प्रक्रिया CET ने होणार, जाणून घ्या सर्व प्रक्रिया

(Dhananjay Kulkarni raise objection on guidelines issued by Government of Maharashtra regarding SSC Result)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.