औरंगजेब किती क्रूर? असंख्य मंदिरे तोडली, धर्मपरिवर्तन घडवले… छत्रपती संभाजी महाराजच नाही तर भावासोबतही औरंगजेबची क्रूरता
Aurangzeb History: औरंगजेबने हिंदूंचे अनेक मंदिरे तोडली. 9 एप्रिल 1669 रोजी त्याने हिंदूंची मंदिरे तोडण्याचे आदेश काढले होते. त्याचे शासन असलेल्या सर्व भागांसाठी हे आदेश होते. त्याने जी मंदिरे तोडली त्यात हिंदूचे सर्वाधिक श्रद्धास्थान असलेले काशी विश्वनाथ आणि सोमनाथ मंदिराचाही समावेश आहे.

Aurangzeb History: मुगल बादशाह औरंगजेब याचे गुणगान करुन समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी वादात अडकले आहे. अबू आझमी यांना विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अबू आझमींना उत्तर प्रदेशात पाठवा, त्यांचा चांगला उपचार करु, या शब्दांत फटकारले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘छावा’ चित्रपटामुळे औरंगजेबची क्रूरता आजच्या पिढीपर्यंतही आली. औरंगजेब किती निर्दयी, निष्ठुर, हिंसक, अमानुष होता ते पडद्यावर पाहून चित्रपट पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे येत आहेत. औरंगजेबचा इतिहास वाचल्यावर क्रूर शब्दही त्याच्यापुढे खूप खुजा ठरतो. शाहजहान यांना कारागृहात टाकले पाचवा मुगल बादशाह...