AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Snake Eggs: सापाची अंडी दिसतात कशी? तुमच्या घरात अथवा बगिचात तर नाही ना? अशी ओळख पटवा

How to identify Snake Eggs: पावसाळ्यापूर्वी साप त्याची अंडी ही सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवतो. बगिचा, घराची परस बाग, अडगळीच्या जागा अंडी घालण्यासाठी, लपवण्यासाठी सुरक्षित मानल्या जातात. पण सापाची अंडी ओळखणार कशी?

Snake Eggs: सापाची अंडी दिसतात कशी? तुमच्या घरात अथवा बगिचात तर नाही ना? अशी ओळख पटवा
सापाची अंडी ओळखायची कशी?Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 05, 2026 | 10:05 PM
Share

How to identify Snake Eggs: उन्हाळ्यात साप दिसण्याचे प्रमाण अधिक असते. कारण हा त्यांचा प्रजनन काळ असतो. या काळात मादी साप अंडे देण्यासाठी थंड आणि सुरक्षित जागा शोधते. अडगळीची जागा, बगिचा अथवा परस बाग यामध्ये मादी साप अंडी घालतात. शास्त्रज्ञांनी सापाच्या प्रजननावरून दोन श्रेणी केल्या आहेत. अंडी देणारी साप(Oviparous) आणि थेट मुलं जन्माला घालणारे साप(Viviparous, Ovoviviparous) असे दोन प्रकार आहेत. जगभरातील जवळपास 70 टक्के साप अंडी घालतात. अंडी घालण्यासाठी मानवी वस्ती मादी साप जवळ करते. स्टोअर रूम, अडगळीची जागा अथवा बगिचा, थंड ठिकाण ही त्यांच्यादृष्टीने सोयीस्कर ठिकाणं आहेत.

सापाची अंडी ओळखायची कशी?

सापाची अंडी ओळखण्याचा सर्वात सोपा उपाय त्याचा पोत ओळखणे हा आहे. पक्षी आणि कोंबडीचे अंडे बाहेरून थोडं कडक असतं. ते कॅल्शियमने तयार झालेले असते. ते पडलं की लागलीच फुटतं. तर सापाच्या अंड्याचं कवच थोडं वेगळं असतं. त्याला हात लावला तर ते नरम आणि रबरासारखं हाताला लागतं. हाताने दाबल्यावर ते लागलीच तुटत नाही. तर दबते.

अंड्याचा आकार आणि रचना कशी

सापाच्या अंड्याचा आकार वेगळा असतो. सापाचे अंडे हे एकदम गोल अथवा अंडाकृती नसते. तर ते थोडे लांब असतात. ते एखाद्या मेडिसिन कॅप्सूलसारखे अथवा काजू सारखे दिसते. विशेष म्हणजे मादी साप जेव्हा अंडी घालते, तेव्हा ते एकमेकांना चिकटलेले असतात. मादा सापच्या शरीरातून एक चिकट द्रव्य बाहेर पडल्याने ते एकमेकांना चिकटलेले असतात.

हे कारण अत्यंत महत्त्वाचे

तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अंडी घालण्याची जागा. पक्षी नेहमी अंडी ही खोप्यात अथवा झाडाच्या फाद्यांवरील बेचकीत, खोबणीत घालतात. पण साप त्यांची अंडी ही अडगळीच्या ठिकाणी घालतो. अंधारलेल्या ठिकाणी, थंड ठिकाणी ही अंडी दिसतात. बगिचात भुसभुशीत माती खाली, पालपाचोळ्यात, लाकडी भुशाखाली साप अंडी घालतो.  अशा ठिकाणी साप असण्याची भीती असते. तेव्हा ही अंडी दूर करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा