AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Snake Blood: या देशातील सैनिक पितात सापाचं रक्त; कारण ऐकून व्हाल हैराण

Snake Blood for Stamina : सापाला जगातील सर्वात घातक प्राणी मानले जाते. पण या देशातील लोक तर सापापेक्षाही खतरनाक आहेत. या देशातील सैनिकच नाही तर सर्वसामान्य सुद्धा सापाचे रक्त पितात. यामागील कारण वाचून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल.

Snake Blood: या देशातील सैनिक पितात सापाचं रक्त; कारण ऐकून व्हाल हैराण
सापाचे पितात रक्तImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 04, 2026 | 3:35 PM
Share

Snake Blood for Stamina: जगभरात साप दिसला की अनेकांची भंबेरी उडते. साप हा अत्यंत विषारी प्राणी मानल्या जातो. सापाच्या दंशाने जगभरात अनेक लोक मरतात. पण या देशातील लोक सापापेक्षाही खतरनाक आहेत. ते सापाचे रक्त पितात. हे ऐकून किळस येईल, विचित्र वाटेल अथवा तुमचा विश्वासही बसणार नाही. पण स्टॅमिना वाढवण्यासाठी हा खटाटोप करण्यात येतो. इतकेच नाही तर आरोग्यासाठी हे रक्त चांगले मानले जाते. केवळ रक्तच नाही तर सापाच्या त्वचेचा वापरही उपचार पद्धतीत करण्यात येतो. कोणता आहे हा देश?

सैनिकच नाहीच तर सामान्य लोकही पितात रक्त

इंडोनेशियामध्ये हजारो वर्षांपासून परंपरागत उपाचारावर विश्वास करण्यात येतो. या उपचार पद्धतीनुसार, वन्य प्राणी आणि वनस्पती कोणताही आजार बरा करतात असा दावा केला जातो. तर यामध्ये औषधी वनस्पती आणि काही प्राण्यांचा वापर करण्यात येतो. सापाच्या रक्तामुळे त्वचारोग बरा होण्याचा उल्लेख येथे हजारो वर्षांपासून करण्यात येतो. येथील काही उपचार पद्धतीच्या जुन्या पुस्तकात याची माहिती देण्यात आली आहे. इंडोनेशियामध्ये, त्वचेच्या गंभीर आजारावर उपचारासाठी सापाच्या त्वचेपासून लगदा तयार करतात आणि तो जखम अथवा त्वचा विकारात वापरल्या जातो.

सापाच्या त्वचेचा वापर केवळ त्वचा विकारापूरता मर्यादीत नाही. तर आता अनेक गंभीर आजारावर सापाची त्वचा आणि रक्ताचा वापर करण्यात येत आहे. त्यात कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचाही समावेश आहे. तर सापाच्या विषाचा उपचारासाठी प्रयोग करण्यात येतो. हृदयरोगात त्याचा वापर करण्यात येतो. याशिवाय सापापासून तयार करण्यात आलेली औषधं दारू पिण्यापूर्वी वापरतात. त्यामुळे यकृतावर कुठलाही परिणाम होत नसल्याचे म्हटले जाते. हे औषध घेतल्यानंतर दारुचा विपरीत परिणाम होत नसल्याचा दावा येथील लोक करतात.

लैंगिक शक्तीसाठी रक्ताचा वापर

पारंपारिक उपचार पद्धतीत सापाचे रक्ताचा वापर लैंगिक शक्तीवर्धक म्हणून होतो. तर त्वचेचा वापर महिलांची त्वचा उजळण्यासाठी करतात. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे सकाळी 5 वाजेपासून ते रात्री उशीरापर्यंत दुकानांमध्ये सापांचे विष विक्री होते. तर ग्राहकांनी मागणी केल्यावर लागलीच सापाला मारून विष देण्यात येते. याशिवाय येथील लष्कराच्या नियमित जेवणात कोब्राचे रक्त आणि मांस देण्यात येते. त्याचे रक्त ताकद वाढवते असा येथील लोकांचा समज आहे.

किंग कोब्रा रेस्टॉरंट

इंडोनेशियाच्या मुख्य बाजारात किंग कोब्रा रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटच्या गोदामात अनेक किंग कोब्रा आणि इतर जातीचे साप असतात. इथे सापाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. सेमारंग, सेरंग आणि तेगल नावाच्या शहरात सापांची विक्री सर्वाधिक होते. तर येथील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये सापाच्या मासाची डिश प्रसिद्ध आहे. सोबतच रक्ताची मोठ्या प्रमाणात विक्री होते.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा