नवरा की मुले? महिलांची डोकेदुखी कोणामुळे वाढते? संशोधनातून महत्वाची माहिती समोर
मुले ही महिलांच्या डोकेदुखीचे कारण असू शकतात असं अनेकांना वाटतं. आता याबाबत एक अहवाल समोर आला आहे. यामुळे मुले की पती कोणामुळे डोकेदुखी वाढते याबाबत भाष्य करण्यात आले आहे.

लहान मुले घरात असली की महिलांचे काम दुप्पट वाढते. कारण लहान मुले राडा करतात, धिंगाणा घालतात, यामुळे त्यांच्या आईला त्रासाचा सामना करावा लागतो. त्यामुळे मुले ही महिलांच्या डोकेदुखीचे कारण असू शकतात असं अनेकांना वाटतं. आता याबाबत एक अहवाल समोर आला आहे. यामुळे मुले की पती कोणामुळे डोकेदुखी वाढते याबाबत भाष्य करण्यात आले आहे. या अहवालातील माहिती सविस्तर जाणून घेऊयात.
अमेरिकेत एनबीसी न्यूज आणि टुडे यांनी एक सर्वेक्षण केले आहे. यात अशी माहिती समोर आली आहे की, महिलांना मुलांपेक्षा त्यांच्या पतींमुळे जास्त ताण येतो. या सर्व्हेक्षणात 7000 पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला होता. यातील 46 % महिलांनी असे कबूल केले की त्यांचे पती त्यांना मुलांपेक्षा जास्त ताण देतात. तसेच महिलांची तणावाची पातळी 10 पैकी 8.5 पर्यंत पोहोचली असल्याचेही समोर आले आहे.
पती महिलांना मुलांपेक्षा जास्त का ताण देतात?
7000 पैकी सुमारे 75 % महिलांनी सांगितले की, त्यांना घरातील कामे करावी लागतात आणि मुलांची काळजी घ्यावी लागते. या असंतुलनामुळे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकवा येतो. तसेच पती त्यांच्या जबाबदाऱ्या नीट पार पाडत नाहीत, त्यामुळे महिलांना पतीचे वर्गीकरण मोठा मुलगा असे केले आहे.
पती वेळ देत नाही
या सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्या काही महिलांनी अशी तक्रार केली आहे की, पती आम्हाला वेळ देत नाहीत, आम्हाला पतींकडून पुरेशी मदत मिळत नाही. त्यामुळे दैनंदिन कामे पूर्ण करण्यात आम्हाला अडथळा येतो आणि ताण वाढतो.
ऑफिसपेक्षा घरात जास्त ताण येतो
पेन स्टेट युनिव्हर्सिटीने एक संशोधन केले होते, त्यात अशी माहिती समोर आली आहे की, महिलांना ऑफिसपेक्षा घरी जास्त ताण येतो. तसेच जेव्हा पती घरकामात मदत करतो तेव्हा महिलांचा ताण कमी होतो अशीही माहिती समोर आली आहे. तसेच महिला घराचे आणि मुलांचे संपूर्ण नियोजन स्वतः करतात, त्यामुळे त्यांचा भावनिक थकवा वाढतो अशी माहिताही संशोधनातून समोर आलेली आहे.