AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात स्वर्गासारखे दृश्य पाहण्यासाठी भारतातील ‘या’ स्वच्छ आणि सुंदर गावांना द्या भेट

पावसाळ्यात बाहेर फिरायला जाण्याची एक वेगळीच मजा असते. कारण पावसाळ्यात निसर्गाचं सौंदर्य खुलून येते. ते पाहण्यासाठी अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. अशातच तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या सुंदर गावांना नक्की भेट द्या. कारण पावसाळ्यात येथील दृश्य स्वर्गासारखे दिसते.

पावसाळ्यात स्वर्गासारखे दृश्य पाहण्यासाठी भारतातील 'या' स्वच्छ आणि सुंदर गावांना द्या भेट
फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम
| Edited By: | Updated on: Jul 10, 2025 | 4:17 PM
Share

पावसाळा सुरू होताच थंड गार वारा आणि हिरवगार निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी प्रत्येकजण कुठे ना कुठे जात असतात. कारण निसर्गाचे मनमोहक दृश्य पाहुन व त्या सानिध्यात जाऊन आपल्या मनाला आराम मिळतो. जेव्हा पावसाळा आपल्या सर्व सौंदर्यासह पृथ्वीवर येतो तेव्हा भारतातील अशी काही गावं आहेत जी अधिकच आकर्षक दिसतात. ही गावं केवळ सौंदर्यापुर्तिच मर्यादीत न राहता ही गावं सर्वात स्वच्छ गावांच्या यादीतही त्यांचा समावेश आहे. काही गावांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आशियातील सर्वात स्वच्छ गाव असे पुरस्कारही मिळाले आहेत. खरोखरच ही गावे स्वर्गापेक्षा कमी दिसत नाहीत. मेघालयातील मावलिनॉंग गाव असो किंवा हिमाचल प्रदेशातील नोक, पावसाळ्यात या गावांचे सौंदर्य शिगेला पोहोचते.

पावसाच्या सरी, हिरव्या दऱ्या, हिरवेगार डोंगर आणि स्वच्छ हवा यामुळे ही गावे एखाद्या चित्रपटाच्या दृश्यासारखी दिसतात. विशेष म्हणजे येथे शहरांसारखी गर्दी आणि प्रदूषण नाही. या गावांचे साधेपणा, स्वच्छता आणि नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला शांततेची भावना देते. जर तुम्हाला या पावसाळ्यात आरामदायी प्रवासाचा अनुभव हवा असेल तर या गावांना नक्की भेट द्या. चला तर मग आजच्या या लेखात आपण भारतातील त्या 4 गावांबद्दल जाणून घेऊया, जे स्वच्छता आणि नैसर्गिक सौंदर्यात नंबर वन मानले जातात.

मेघालयातील मावलिनॉन्ग गाव

मेघालयातील मावलिनॉन्ग गाव हे आशियातील सर्वात स्वच्छ गावांपैकी एक आहे. हे गाव त्याच्या स्वच्छता आणि पर्यावरणपूरक पद्धतींसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथील प्रत्येक रस्ता स्वच्छ आहे आणि प्रत्येक घराबाहेर एक कचराकुंडी आहे. पावसाळ्यात हे गाव एखाद्या परीकथेसारखे दिसते. पावसाळ्यात तुम्हाला ढगांनी वेढलेले डोंगर, हिरवळ आणि येथील थंड वारा अनुभवायला मिळेल. जर तुम्ही इथे आलात तर लिविंग रूट ब्रिज, क्लीन वॉकवे, धबधबे आणि बांबूची घरे पहायला विसरू नका.

हिमाचल प्रदेशातील स्पिती खोऱ्यात असलेले नोक गाव

हिमाचल प्रदेशात स्पितीच्या उंचीवर वसलेले नोक हे छोटेसे गाव पावसाळ्यात खूप शांत आणि सुंदर दिसते. येथील संस्कृती आणि सौंदर्य दोन्ही मनाला शांती देते. येथील लोकं बौद्ध संस्कृतीशी जोडलेले आहेत. येथे तुम्ही ढगांनी वेढलेले डोंगर, पावसाळ्यात थंड आणि ताजी हवा यांचा आनंद घेऊ शकता. या गावात पाहण्यासाठी कमी पर्यटन स्थळे असले तरी तुम्ही येथील पारंपारिक घरे, बर्फाळ शिखरे आणि स्थानिक बौद्ध मठ एक्सप्लोर करू शकता.

केरळची इडुक्की गाव देखील अद्भुत

केरळचा हा परिसर पावसाळ्यात आणखीनच सुंदर दिसतो. पावसाळ्यात इडुक्की गावातील दऱ्या त्यांच्या अवतीभोवती हिरवी मखमली चादर ओढून घेतात आणि धबधब्यांचा आवाज येथील वातावरणाला संगीतमय बनवतो. या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील हिरवळ, डोंगराळ प्रदेश, धबधबे आणि चहाचे बागा, जे पाहण्यासारखे आहेत. येथे तुम्ही इडुक्की धरण, वागमोन, चहाचे मळे, वन्यजीव अभयारण्य एक्सप्लोर करू शकता.

नागालँडमधील खोनोमाला भेट द्या

खोनोमा हे भारतातील पहिले ग्रीन व्हिलेज मानले जाते. खोनोमा गाव केवळ त्याच्या सौंदर्यासाठीच नाही तर पर्यावरण संवर्धनासाठी देखील ओळखले जाते. येथील लोक जंगलातील झाडे तोडत नाहीत आणि जैवविविधता राखतात. येथे तुम्ही टेरेस फार्मिंग, नागा संस्कृती, पारंपारिक वास्तुकला एक्सप्लोर करू शकता. पावसाळ्यात, हलक्या पावसात येथे हिरवळ आणि लोकसंस्कृतीचा संगम दिसून येतो.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.