मुकेश अंबानी, गौतम अदानींकडे नाही सर्वात महागडी कार नंबर प्लेट, हे आहेत जगातील सर्वात महाग गाडी नंबर
Top 5 Expensive Number Plate: भारतातील सर्वात महाग गाडी क्रमांक 34 लाख रुपयांमध्ये विकला गेला आहे. हा क्रमांक मुकेश अंबानी किंवा गौतम अदानी यांच्यासारखा देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींनी घेतला नाही. तर हा क्रमांक घेणार वेगळाच व्यक्ती आहे.
Top 5 Expensive Number Plate: गाड्यांचे आवडीचे नंबर किंवा व्हीव्हीआयपी क्रमांक मिळवण्यासाठी कधीकाळी स्पर्धा होती. त्यानंतर या नंबरांचा लिलाव होऊ लागला. शासनला त्यातून चांगला महसूल मिळू लागला. भारतातील सर्वात महाग गाडी क्रमांक किती रुपयांमध्ये विकला गेला असले? हा प्रश्न आल्यावर तुम्ही उत्तर द्याल, दोन, तीन लाख…परंतु भारतातील सर्वात महाग गाडी क्रमांक 34 लाख रुपयांमध्ये विकला गेला आहे. हा क्रमांक मुकेश अंबानी किंवा गौतम अदानी यांच्यासारखा देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींनी घेतला नाही. तर हा क्रमांक घेणार वेगळाच व्यक्ती आहे.
भारतातील सर्वात महाग पाच गाडी क्रमांक कोणते आहेत, त्या गाड्यांचे मालक कोण आहेत? ही सर्व माहिती तुम्हाला देणार आहोत. तसेच मुकेश अंबानी यांच्या गाड्यांचे क्रमांक काय आहे, ते ही पाहू…पार्क प्लसच्या रिपोर्ट्सनुसार सर्वात महाग गाड्यांचे क्रमांक अन् त्यांचे मालक…
सर्वात महाग क्रमांक अन् त्यांचे मालक
- सर्वात महाग क्रमांक Toyota Fortuner या गाडीवर लागला आहे. ती गाडी आशिक पटेल यांच्या मालकीची आहे. कारचा नंबर ‘007’ आहे. ही नंबर प्लेट 34 लाख रुपयांमध्ये विकली गेली.
- दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महाग क्रमांक के. एस बालगोपाल यांच्याकडे आहे. त्यांच्या Porche 718 Boxster या गाडीवर हा क्रमांक आहे. त्याची किंमत 31 लाख रुपये आहे. कार नंबर प्लेट ‘KL-01-CK-1’ आहे.
- तिसऱ्या क्रमांकाचा महाग क्रमांकसुद्धा के. एस बालगोपाल यांच्याकडेच आहे. Toyota Land Cruiser LC200 या गाडीवर ही नंबर प्लेट लागली आहे. 18 लाख रुपये किंमत असलेल्या गाडीचा क्रमांक ‘KL01CB0001’ आहे.
- चौथ्या क्रमांकाचा महाग क्रमांक जगजीत सिंह यांच्याकडे आहे. Toyota Land Cruiser LC200 या गाडीवर 17 लाख रुपयांचा क्रमांक लावला आहे. तो क्रमांक ‘CH01AN0001’ आहे.
- पाचव्या क्रमांकावर Jaguar XJL कार आहे. त्या गाडीवर 16 लाख रुपयांची नंबर ‘RJ45CG0001’ आहे. या गाडीचे मालक राहुल तनेजा आहे.
मुकेश अंबानींकडे कोणते क्रमांक?
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि भारतातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे BMW 7-Series ची कार आहे. त्या गाडीवर 9 लाख रुपये किंमतीचा व्हीव्हीआयपी क्रमांक आहे. तो क्रमांक MH 01 AK 0001 आहे. इकोनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांनी 2022 मध्ये Rolls Royce विकत घेतली. त्यावर 12 लाख रुपयांची नंबर प्लेट आहे. तो क्रमांक ‘0001’ आहे.