पावसात धावल्यानंतर जास्त भिजतो की एका जागी उभे राहिल्यावर, उत्तर आहे खूप रंजक..

पावसात धावल्यानंतर जास्त भिजतो की एका जागी उभे राहिल्यावर, उत्तर आहे खूप रंजक..
rain

जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा लोक धावू लागतात आणि त्यांना वाटते की त्यांनी लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी पोहोचले पाहिजे. पण, पावसात धावणे परिणामकारक आहे की नाही हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग आज आपण जाणून घेवू याबद्दलची रंजक माहिती..

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jan 25, 2022 | 3:44 PM

जेव्हा आपल्याकडे छत्री नसते नेमके त्याच दिवशी पाऊस येतो आणि आपली नेमकी फजिती होते. हे आपल्यापैकी बऱ्याच जणांसोबत घडले असेल. पाऊस आणि भिजणे हे तसे आपल्यासाठी काही नवीन नाही. आपण प्रत्येक जण कधी ना कधी पावसात आवडीने किंवा नाईलाजाने भिजलेलो असतो. याच पावसात भिजण्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.   तुम्ही रस्त्यावरून चालत असाल आणि अचानक पाऊस पडला तर तुम्ही काय कराल? तुम्ही पण म्हणाल की हा काय प्रश्न आहे.  पावसापासून भिजू नये म्हणून आपण जागा शोधू आणि आजूबाजूला जागा नसेल तर निदान भिजू नये म्हणून धावत जावून एखादा आडोसा शोधाल. अनेकदा आपण धावत पळत एखादा आडोसा शोधाल. पण पळून जाण्याचा तुमचा निर्णय चुकीचा आहे आणि ही गोष्ट आम्ही नाही तर सायन्स सांगते. (Science behind the Rain) तुम्हीही विचार करत असाल की असं कसं होईल आणि पळून जाणं तर अंतर पटकन कमी करण्यास मदत करते. तर मग पावसात धावणं (Running in the Rain), हे कसं चुकतं.

पाऊस पडत असताना त्यात धावणे हे चुकीचे पाऊल ठरू शकते. कारण तुम्ही भिजू नये म्हणून असे करत असाल तर तुम्ही ते चुकीचे करत आहात, असे अनेक संशोधनातून समोर आले आहे. जर तुम्हीही ही गोष्ट आत्मसात करत नसाल, तर आम्ही तुम्हाला संशोधनातून सांगतो की, पावसात धावणे हा योग्य पर्याय नाही. जाणून घेवूया खास आणि रंजक संशोधनाबद्दल, ज्याबद्दल तुम्हाला क्वचितच माहिती असेल…

नेमके संशोधन काय म्हणते? तुमचा विश्वास बसणार नाही, पण काही तज्ज्ञांच्यामते, पाऊस पडू लागल्यावर धावल्याने माणूस जास्त भिजतो किंवा पावसात एकाच जागी उभे राहून पावसापासून बचाव होतो. या विषयावर इटालियन भौतिकशास्त्रज्ञ फ्रँको बोकी यांनी २०१२ मध्ये युरोपियन जर्नल ऑफ फिजिक्समध्ये एक शोधनिबंध प्रकाशित केला होता. यात पावसात धावणे हा योग्य पर्याय नसल्याचे समोर आले होते. या संशोधनातून सत्याग्रहाने आपल्या अहवालात असेही म्हटले आहे की, ‘गणितानुसार जरी विचार केला तरी अचानक पाऊस पडला आणि पावसापासून भिजू नये यासाठी जागेच्या शोधात आपण असू तर चालण्याऐवजी एका जागी उभे राहिल्यास तुम्ही त्यातुलनेत कमी भिजाल. अनेकदा शोधून सुध्दा आपल्याला आडोसा मिळत नाही तर मग अशावेळी पावसात एका जागी उभं राहा, म्हणजे कमी ओले व्हाल, कारण अशा स्थितीत पावसाचे कमी थेंब आपल्या अंगावर पडतील.

तुम्ही एकाच ठिकाणी उभे राहिल्यास काय होईल?

फ्रँकोनेही गणिताच्या माध्यमातून ही गोष्ट सिद्ध केली आहे. या अहवालात फ्रँकोच्या संशोधनाच्या आधारे असे सांगण्यात आले आहे की सामान्य परिस्थितीत पाऊस पडत आहे आणि वादळाची स्थिती नाही. अशात पावसाचे थेंब थेट पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडत आहेत. त्याच वेळी, पावसाचा दर किंवा प्रति चौरस मीटर प्रति सेकंद पडणार्‍या पाण्याच्या थेंबांची संख्या सारखीच असते… मग या स्थितीत जो एका जागी उभा आहे त्याच्यावर ठराविक प्रमाणात पाणी पडेल आणि त्याचे डोके आणि खांदे याचा भागावर पाण्याचे थेंब जास्त प्रमाणात पडतील. (पण या स्थितीत पाऊस सरळ असावा)

पावसात धावल्यास काय होईल?

अनेक जण पावसात कमी भिजावे यासाठी धावण्याचा निर्णय घेतात मात्र हा निर्णय चुकीचा ठरू शकतो. त्यामुळे दुसरी परिस्थिती बघितली तर पावसानंतर जर कोणी चालायला सुरुवात केली तर डोक्यावर आणि खांद्यावर पाणी तर पडतेच पण त्या व्यक्तीच्या गतीच्या दिशेला लंबवत पडणारे थेंब पार करतो यामुळे, त्याच्या अंगावर पडणारे थेंबाची संख्या वाढू लागेल. म्हणजे तो अधिक ओला होईल. जेव्हा एखादी व्यक्ती पावसात चालायला लागते तेव्हा त्याचा वेग कितीही असो, त्याच्या डोक्यावर आणि खांद्यावर पडणाऱ्या पाण्याच्या दरात कोणताही बदल होत नाही. यासोबतच शरीराचे इतर भागही पाण्याच्या संपर्कात येऊ लागतात. म्हणजेच पावसात धावल्याने माणूस अधिक भिजतो हे संशोधनाअंती समोर आले आहे.

हवा सी उडती जाऊ… सई लोकुरचा हटके अंदाज, फोटो एकदा बघाच

Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाची राजकारणातली आयटम गर्ल : Nawab Malik

Video : या मजुराचा डान्स पाहून भल्या भल्या डान्सरला घाम फुटेल, सोशल मीडियाने बनवलं रातोरात स्टार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें