AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरंच दारू पिणे कायदेशीर अधिकार आहे का?; खूप कमी लोकांना माहित आहेत या गोष्टी

सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास दारू पिणे हा मौलिक अधिकार नाही. न्यायालयाने अनेक वेळा आपल्या निकालांमध्ये याचा उल्लेख केला आहे.

खरंच दारू पिणे कायदेशीर अधिकार आहे का?; खूप कमी लोकांना माहित आहेत या गोष्टी
खरंच दारू पिणे कायदेशीर अधिकार आहे का?; खूप कमी लोकांना माहित आहेत या गोष्टी
| Edited By: | Updated on: Jul 14, 2021 | 11:11 PM
Share

नवी दिल्ली : दारु आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. हे सर्वच लोकांना माहित आहे. तरीही दारूचे व्यसन सोडण्यास लोक तयार नसतात. कुणी चांगला सल्ला दिला, तरी अनेक लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. आता प्रत्येक आनंद साजरा करण्यासाठी लोक दारूच्या पार्ट्या करतात. ज्या राज्यांमध्ये दारूला बंदी आहे, तेथेही तळीराम लोक वेगवेगळी शक्कल लढवून दारू पितात. या ना त्या माध्यमातून दारू उपलब्ध केली जाते. हे लोक दारूबंदीचा निर्णय चुकीचा मानतात. सरकारने दारूवर बंदी घालायला नको, या मताचे हे लोक आहेत. आम्ही काहीही खाणे आणि पिणे हा आपला अधिकार आहे, असे हे लोक म्हणतात. (Is it really a legal right to drink alcohol; Very few people know these things)

खरंच दारू पिणे हा मौलिक अधिकार आहे का ?

सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास दारू पिणे हा मौलिक अधिकार नाही. न्यायालयाने अनेक वेळा आपल्या निकालांमध्ये याचा उल्लेख केला आहे. दारू पिणे ही बाब मौलिक अधिकाराच्या श्रेणीत बसत नाही आणि राज्य आपल्या हिशोबाने दारूच्या विक्रीवर नियंत्रण ठेवू शकतात, असे न्यायालयाने अनेक निकालांमध्ये म्हटले आहे. 1960 मध्ये गुजरातने बॉम्बे प्रतिबंधक कायदा, 1949 कायम ठेवला होता. त्या कायद्यातील तरतुदीच्या आधारे दारूविक्रीवर बंदी घालण्यात आली होती. याच कायद्यातील कलाम 12 आणि कलाम 13 मध्ये राज्यांना दारू विक्रीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

तथापि, त्याव्यतिरिक्त औद्योगिक कार्यासाठी दारू विक्रीचा मुद्दा वेगळा ठेवण्यात आला आहे. अशा परिस्थिती बंदी लागू असलेल्या राज्यांमध्ये औद्योगिक कार्यासाठी दारूची खरेदी केली जाऊ शकते. मात्र दारू पिण्यास मनाई आहे. आर्टिकल 19 (1) (जी) मध्ये म्हटले आहे कि, कोणतीही व्यक्ती आपल्या हिशोबाने कोणत्याही वस्तूंचा व्यापार करू शकते. परंतु यापासून काही वस्तूंना दूर ठेवण्यात आले आहे. आर्टिकल 47 च्या तरतुदीनुसार राज्ये दारूवर बंदी लादण्याचा निर्णय घेऊ शकतात.

केरळमध्ये वेगळे धोरण

राज्यांच्या अधिकारांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास प्रत्येक राज्य आपल्या हिशोबाने धोरण बनवू शकते. केरळमध्ये 2-3 स्टारच्या हॉटेलमध्ये दारूची विक्री करण्यास मनाई आहे. परंतु 4-5 स्टारच्या हॉटेलमध्ये दारूची विक्री केली जाऊ शकते. कारण सरकारचे म्हणणे आहे कि, तेथील वातावरण आणि सुरक्षा वेगळी आहे. ज्यावेळी या धोरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले, त्यावेळी न्यायालयाने केरळ सरकारचे धोरण कायम ठेवले होते. दुसरीकडे बिहारमध्येही दारूवर बंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयालाही अनेक आव्हाने देण्यात आली. त्यावर सुनावणी करताना स्पष्ट केले कि, हा राज्यांचा अधिकार आहे. (Is it really a legal right to drink alcohol; Very few people know these things)

इतर बातम्या

नारायण राणेंची केंद्रात वर्णी, आमदार नितेश राणे कोअर कमिटीत! भाजपकडून मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग?

पेट्रोल आणि डिझेलचे दर स्वस्त होणार; पेट्रोलियम मंत्र्यांनी थेट तेल उत्पादक देशांशी साधला संपर्क

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.