AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता लडाखच्या खोऱ्यांमध्येही हवाई सफर करता येणार; पर्यटकांना मोठी आनंदाची बातमी

हवाई संपर्क वाढण्यासाठी सरकार केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये चार नवीन हवाई अड्डे आणि 37 हेलिपॅड बनविण्याची योजना बनवत आहे. लडाख क्षेत्राच्या 6 खोऱ्यांनाही हवाई धावपट्ट्यांनी जोडले जाणार आहे.

आता लडाखच्या खोऱ्यांमध्येही हवाई सफर करता येणार; पर्यटकांना मोठी आनंदाची बातमी
आता लडाखच्या खोऱ्यांमध्येही हवाई सफर करता येणार
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 8:14 AM
Share

नवी दिल्ली : फिरण्याचे शौकीन असलेल्या लोकांसाठी लडाख एक परिपूर्ण डेस्टिनेशन मानले जात आहे. विकेंडला डोंगरावर भटकंती करण्याचे मन झाले तर लोक अर्थात पर्यटक दिल्लीहून उत्तराखंडला बाहेर पडतात. लडाखला जायचे असेल तर तुम्हाला तिथे फिरण्यासाठी 2 दिवस कमी पडू शकतील. इतक्या कमी अवधीत तुम्ही लडाख फिरू शकणार नाहीत. पण जर विमानाने गेलात, तर तुमचा खूप वेळ वाचू शकेल. याच अनुषंगाने केंद्र सरकारने महत्वाकांक्षी हवाई संपर्क योजना आखली आहे. ही योजना केवळ लडाखच्या लोकांसाठीच नव्हे, तर पर्यटकांसाठीदेखील अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. (It will now be possible to travel by air in the valleys of Ladakh as well; Great news for tourists)

केंद्र सरकार अलीकडेच या महत्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिली आहे. आशा आहे की, येत्या दिवसांत लडाखची सर्व क्षेत्रे लवकरच हवाई मार्गाने जोडली जाणार आहेत. हवाई संपर्क वाढण्यासाठी सरकार केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये चार नवीन हवाई अड्डे आणि 37 हेलिपॅड बनविण्याची योजना बनवत आहे. लडाख क्षेत्राच्या 6 खोऱ्यांनाही हवाई धावपट्ट्यांनी जोडले जाणार आहे. यातील अनेक विमानतळे याच वर्षाच्या अखेरीपर्यंत चालू होण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला लेह आणि कारगिलमध्ये एअरस्ट्रिप आहे.

लेह आणि कारगिलमध्ये 37 हेलिपॅड बनवणार

केंद्र सरकारने लडाखच्या विकास योजनेवर वेगाने काम सुरु केले आहे. सर्वप्रथम लडाखच्या सर्व भागांना हवाई मार्गांनी जोडण्यात येणार आहे. लडाख आधीपासूनच हवाई मार्गाशी जोडलेले आहे, परंतु आता केंद्र सरकारने महत्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिली आहे. त्यानुसार लेह आणि कारगिलमध्ये उन्नत तंत्राने 37 हेलिपॅड बनविण्याचे उद्दिष्ट आहे.

यातील 7 हेलिपॅड लेह आणि 30 हेलिपॅड कारगिलमध्ये असतील. लडाखच्या डेमचॉक, लिंगशेक, चुशूल भागांमध्ये 6 हवाई पट्ट्या बनवल्या जाणार आहेत. कारगिलमध्ये अजूनपर्यंत हवाई क्षेत्राचा वापर केवळ भारतीय हवाई दलामार्फत केला जात आहे. याठिकाणी आतापर्यंत नागरिकांना प्रवेश मिळाला नाही. सरकारकडून नागरिकांना परवानगी देण्यात आलेले नाही.

भारत-चीन सीमारेषेजवळ बहुतांश हेलिपॅड

लडाखच्या प्रांतात 8 हेलिपॅड आहेत. यातील 5 लेहमध्ये आणि 3 कारगिलमध्ये आहेत. या हेलिपॅडचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. सरकारने आता कारगिल क्षेत्रामध्ये वैकल्पिक नागरी हवाईतळासाठी जागेची निश्चिती केली आहे. याव्यतिरिक्त 29 नवीन आधुनिक हेलीपॅड बनवली जाणार आहेत. यात 2 लेह आणि 27 कारगिलमध्ये उभारली जाणार आहेत. अशाच पद्धतीने लडाख प्रांतात 37 अत्याधुनिक हेलिपॅड उभारली जाणार आहेत. लेहच्या 3 हवाई पट्टीवर काम सुरु करण्यात आले आहे. तसेच लडाखच्या आणखी तीन खोऱ्यांमध्येही लवकरच हवाईपट्टी बनविण्याचे काम चालू केले जाणार आहे. बहुतांश हेलीपॅड भारत-चीन सीमेजवळ आहेत.

4 नवीन विमानतळांसाठी जमीन निश्चित

सरकारने यापूर्वीच चार नवीन विमानतळांसाठी जमिनीची निश्चिती केली आहे. या विमानतळांवर सर्वात मोठी विमाने उतरू शकणार आहेत. याव्यतिरिक्त सरकार लेह शहरासाठी एक वैकल्पिक हवाई क्षेत्र आणि जंस्कर खोऱ्याला थेट जोडण्याच्या योजनेवर काम करत आहे. सरकार पेन्गोंग सरोवरापासून चांगटांगजवळही एक हवाईतळ बनवण्याच्या योजनेवर काम करत आहे. (It will now be possible to travel by air in the valleys of Ladakh as well; Great news for tourists)

इतर बातम्या

माजी आमदार राजू तोडसाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर प्रवेशाबाबत निर्णय होणार?

कोपरी पुलाच्या मधल्या दोन मार्गिकांचे काम 9 महिन्यांत पूर्ण करणार; एकनाथ शिंदेंनी केली पाहणी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.