माजी आमदार राजू तोडसाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर प्रवेशाबाबत निर्णय होणार?

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेऊन राजू तोडसाम यांच्या प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचं कळतंय. पुढील काही दिवसांत आर्णी मतदारसंघात सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय होऊ शकतो असं बोललं जात आहे.

माजी आमदार राजू तोडसाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर प्रवेशाबाबत निर्णय होणार?
राजू तोडसाम, माजी आमदार

यवतमाळ : भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती मिळतेय. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेऊन राजू तोडसाम यांच्या प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचं कळतंय. पुढील काही दिवसांत आर्णी मतदारसंघात सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय होऊ शकतो असं बोललं जात आहे. राजू तोडसाम यांच्या रुपानं जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आदिवासी नेतृत्वाची पोकळी भरली जाणार असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरु आहे. (Former BJP MLA Raju Todsam likely to join NCP)

भाजपमध्ये अशताना राजू तोडसाम वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीत तोडसाम यांचं तिकीट भाजपनं कापलं. त्यांच्याऐवजी भाजपनं डॉ. संदीप धुर्वे यांना मैदानात उतरवलं होतं. तोडसाम यांनी त्यावेळी बंडखोरी करत तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती. त्यामुळे तोडसाम यांच्या रुपाने राखीव मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा डोळा असल्याचं चर्चा सध्या सुरु आहे.

2013 मधील प्रकरणात तोडसाम यांना कारावास

राजू तोडसाम यांना जानेवारीमध्ये तीन महिन्यांचा कारावास ठोठावण्यात आला होता. वीज वितरण कंपनीविरोधात आंदोलन करताना त्यांनी लेखापालाला मारहण केली होती. पांढरकवडा सत्र न्यायालयानं त्यांना ही शिक्षा सुनावली होती. तोडसाम यांनी 2013 मध्ये वीज वितरण कंपनीत आंदोलन करत लेखापालाला मारहाण आणि शिवीगाळ केली होती. त्याप्रकरणात कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तीन महिने कारावासाची कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा वरिष्ठ न्यायालयानेही कायम ठेवली होती. त्यानंतर तोडसाम यांनी रवानगी यवतमाळ जिल्हा कारागृहात करण्यात आली होती.

इतर बातम्या :

Scholarship Examination : 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर, कधी होणार परीक्षा?

कळवा दुर्घटनेनंतर प्रवीण दरेकर आक्रमक, संबंधित अधिकाऱ्यांवर मोक्का लावण्याची मागणी, जखमींची विचारपूस

Former BJP MLA Raju Todsam likely to join NCP

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI