बिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..

बिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या 'त्या' गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..
बिटिंग दी रिट्रीटचा फाईल फोटो

Beating The Retreat Ceremony: मोबाईल या वर्षी 29 जानेवारीच्या संध्याकाळी होणाऱ्या बिटींग द रिट्रीट समारंभामध्ये सगळ्यात चर्चित असलेली धून Abide With Me यावेळी ऐकू येणार नाही, चला तर मग जाणून घेऊया याची कहाणी..

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 23, 2022 | 10:59 PM

26 जानेवारीच्या परेड(26 January Parade) नंतर 29 जानेवारीच्या संध्याकाळी विजय चौकात ‘बिटींग द रिट्रीट’ समारोहाचे आयोजन केले जाते. या समारोहात नौसेना, वायुसेना आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल पारंपारिक बँड वेगवेगळ्या टोनमध्ये वाजवतात आणि देशासाठी शहीद झालेल्या जवानांना आठवत असतात. मात्र या वर्षी ‘बिटींग द रिट्रीट’मध्ये वाजवली जाणारी धून ‘अबाइड विद मी’ (Abide With Me)वाजवली जाणार नाही. खरं तर इथून दरवर्षी ‘बीटिंग द रिट्रीट‘ मध्ये वाजवली जाते. या बातमीसोबत लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत की या ‘बिटींग द रिट्रीट’मध्ये ही धून वाजवली जाते आणि या इंग्रजी गाण्याची कहाणी नेमकी काय आहे. तर आज आपण या गाण्याची कहाणी जाणून घेणार आहोत आणि आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या गाण्याचे वैशिष्ट्य नेमके काय आहे. सोबतच याऐवजी कोणती गाणी वाजवली जाणार आहे हे सुद्धा सांगणार आहोत.

काय असते बिटींग द रिट्रीट?

सगळ्यात आधी तुम्हाला हे सांगणारा आहोत की ‘बिटिंग द रिट्रिट’ काय असते.? 26 जानेवारीला 4 दिवसाचा समारोह आयोजित केला जातो. त्यामध्ये सगळ्यात शेवटचा कार्यक्रम ‘बीटिंग द रिट्रीट’ असतो. हा कार्यक्रम नवी दिल्लीतील ऐतिहासिक विजय चौकामध्ये आयोजित केला जातो. ‘बीटिंग द रिट्रीट’ एक जुनी परंपरा आहे, जेव्हा सर्व सेना सूर्यास्तानंतर युद्ध मैदानात येतात, ज्यावेळी परत येण्याचा बिगुल वाजतो, लढाई थांबवली जाते व हत्यारं ठेवली जातात आणि युद्ध स्थळ सोडले जाते. त्याच्याशी संबंधित याचे भारतात आयोजन केले जाते.

अशातच या कार्यक्रमात वेगवेगळे बँड परफॉर्म करतात आणि त्यानंतर रिट्रीट चे वादन होते. जेव्हा बँड मास्टर राष्ट्रपतींच्या जवळ जातात आणि बँड परत घेऊन जाण्याची अनुमती मागतात, त्यावेळेला समजते की समारोप समारोह पूर्ण झाला आहे.

कोणते गाणे वाजवले जात होते?

या कार्यक्रमात अनेक गाण्यांच्या टोन वाजवल्या जात होत्या. असे मानले जाते की 1950 सालापासून या कार्यक्रमाच्या शेवटी Abide With Me या गाण्याची धून वाजवली जाते आणि अनेक वर्षापासून ही वाजवली जात आहे , कदाचित तुम्ही सुद्धा ती ऐकली असेल. मात्र आता हे गाणे वाजवले जाणार नाही. 2020 मधील एका रिपोर्ट मध्ये सुध्दा चर्चा होती की बीटिंग रिट्रीटमध्ये हे गाणे वाजवले जाणार नाही, त्याऐवजी वंदे मातरम वाजवले जाईल, मात्र असे झाले नव्हते आणि वर्ष 2021 मध्ये सुद्धा ते वाजवले गेले होते. खर तर आता त्या दिवशी वाजवल्या जाणाऱ्या बीटिंग रिट्रीट सेरेमनीच्या इतर गाण्यांमध्ये स्थान दिलेले नाही, जी गाणी त्या दिवशी वाजविली जातील

काय आहे गाण्याची कहाणी?

इंडियन एक्सप्रेस च्या रिपोर्टनुसार हे गाणे प्री-मॉर्डन वर्ल्डमध्ये स्कॉटलैंडच्या एंगलिकन मिनिस्टर Henry Francis Lyte याने लिहिले होते. हे गाणे एक प्रकारचे चर्चमध्ये गायले जाणारे धार्मिक गाणे आहे ज्याला हीम (Hymn) म्हटले जाते. हे विशेष करून हिम भावूक आणि दुःखी क्षण असताना गायले जाणारे भजन आहे. इंग्रजी संगीतकार विल्यम हेनरी मोंक यांच्या ट्यून वर गायले जाते हेच गाणे बीटिंग रिट्रीट मध्ये गायले जाते आणि सेनेचा बँड त्याच साधेपणाने व भावपूर्ण पद्धतीने ते वाजवतात.

रिपोर्टनुसार Henry Francis Lyte यांनी हे गाणे 1820 मध्ये लिहिले होते. त्यांनी जेव्हा हे गाणे लिहिले त्यावेळेस ते आपल्या एका मित्राला भेटून आले होते आणि तो मित्र त्याच्या आयुष्यातील अंतिम क्षण जगत होता. त्यामुळे या गाण्यामध्ये त्याचे जाण्याचे दुःख सांगण्यात आले आहे. मात्र त्यांनी 1847 मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत हे गाणे त्यांच्याकडे ठेवले होते. हे गाणे पहिल्यांदा त्यांच्या अंतिम संस्काराच्या वेळेस गायले गेले होते.

हे गाणे इसाई धर्मात खूप लोकप्रिय आहे आणि अनेक दुःखद घटनानंतर हे गायले जाते. टायटॅनिक बुडण्याच्या वेळेस सुद्धा हे गीत वाजवले गेले होते. तसेच पहिल्या महायुद्धाच्या काळात सुद्धा अनेकदा हे गीत वाजवले गेले होते, ज्यामुळे हे खूप लोकप्रिय झाले. सोबतच फक्त इंडियन आर्मीच नाही तर अनेक देशांच्या सेनेकडून शहिदांच्या आठवणीत हे गीत वाजवले जाते.

भारतासोबत कनेक्शन?

अबाईड विद मी महात्मा गांधींच्या आवडत्या गाण्यांपैकी एक होते. राष्ट्रपिता यांनी सर्वात आधी मैसूर पॅलेस बँडकडून ही धून ऐकली होती आणि ते गाणे कायमस्वरूपी त्यांच्या स्मरणात राहिले. असे म्हटले जाते की वैष्णव जनतो, रघुपती राघव राजाराम यासोबतच ही टोन सुद्धा त्यांची खूप आवडती होती, जी आता ‘बिटींग द रिट्रीट’मध्ये ऐकायला मिळणार नाही असे मानले जाते की महात्मा गांधी यांच्यामुळे हे गाणे सेनेमध्ये गायले जात होते.

आता कोणत्या गाण्याने घेतली जागा :

भारतीय सेनेच्या वतीने शनिवारी जारी करण्यात आलेल्या एका विवरण पुस्तिकेमध्ये 29 जानेवारीला होणाऱ्या बीटिंग रिट्रीट समारोहातून या गाण्याला हटविण्यात आले आहे. या पुस्तिकेनुसार यावर्षीच्या समारोह समापनाच्या वेळी ” सारे जहासे अच्छा” ही धुन असणार आहे. याआधी दर वर्षी बीटिंग रिट्रीट ‘अबाइड विद मी’ ही धून वाजवून समाप्त केले जात होते. ‘वीर सैनिक’, ‘फैनफेयर बाय बगलर्स’, ‘आईएनएस इंडिया’, ‘यशस्वी’, ‘जय भारती’, ‘केरल’, ‘हिंद की सेना’, ‘कदम कदम बढ़ाए जा’, ‘ड्रमर्स कॉल’, ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे सुध्दा त्या 26 धूनचा हिस्सा आहे. जे 29 जानेवारीच्या संध्याकाळी वाजविले जाईल.

इतर बातम्या :

2600 वर्षांपूर्वी मृत पावलेल्या इजिप्तमधील महिलेचा चेहरा पुन्हा तयार करण्यात आला! कारण ऐकून थक्क व्हाल!

आर्मीतील श्वान फक्त गंधाने बॉम्बच नाही तर या अनेक गोष्टीसुद्धा चलाखीने शोधून काढतात, कशी असते स्पेशल ट्रेनिंग!!

Priyanka Chopra Surrogacy पद्धतीनं आई बनली, वाचा काय असते सरोगसी, भारतात यासंबंधीचे नियम काय?


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें