‘ही’ भाजी शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवते, फायदे वाचून अवाक व्हाल

आता शरीराची शक्ती वाढवणाऱ्या एका आयुर्वेदिक भाजीची चर्चा आहे. या भाजीचं नाव आहे करटोली (Spiny gourd). काय आहे ही भाजी आणि तिचे नेमके काय फायदे आहेत याचाच हा खास आढावा.

'ही' भाजी शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवते, फायदे वाचून अवाक व्हाल


मुंबई : कोरोनाच्या संसर्गात जीवाला धोका होऊ नये म्हणून प्रत्येकजण शक्य ती काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोनाचा सामना करण्यास शरीर सक्षम व्हावं म्हणून रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यावरही भर दिला जातोय. निरोगी राहण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतोय. त्यासाठी दैनंदिन आयुष्यातील सवयींमध्ये बदल करुन खाण्यापिण्याची पथ्य आणि व्यायामही महत्त्वाचा असतो. त्यातच आता शरीराची शक्ती वाढवणाऱ्या एका आयुर्वेदिक भाजीची चर्चा आहे. या भाजीचं नाव आहे करटोली (Spiny gourd). काय आहे ही भाजी आणि तिचे नेमके काय फायदे आहेत याचाच हा खास आढावा (Know all about Spiny gourd medical importance of Momordica dioica).

करटोली काय आहे?

करटोली ही भारतात डोंगराळ भागात उगवणारी एक वेलवर्गीय वनस्पती आहे. ही भाजी अनेक पोषकतत्वांनी युक्त असल्याचं सांगितलं जातं. तिच्यात औषधी गुणधर्म आहेत. ही भाजी कारल्यासारख्या दिसत असली तरी कारल्यापेक्षा आकाराने लहान असते. या वेलीच्या फळांची भाजी करूनही खातात. या भाजीला गुजरातीमध्ये कंटोळा असंही म्हणतात. या भाजीचं शास्त्रीय नाव Momordica dioica आणि इंग्रजीत तिला Spine gourd म्हणतात.

करटोलीला कंटोला, कर्कोटकी आणि ककोरा अशा नावाने देखील ओळखलं जातं. करटोलीत प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट्स, विटामिन ए, विटामिन बी1, बी2, बी3, बी5, बी6, बी9, बी12, विटामिन सी, विटामिन डी2 आणि 3, विटामिन एच, विटामिन के, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पॉटेशियम, सोडियम, कॉपर, झिंक इत्यादी पोषकतत्वे आढळतात.

आता तुमच्या लक्षात आलंच असेल की या भाजीमध्ये किती प्रकारचे पोषणतत्वं आहेत. म्हणूनच या भाजीचं इतकं महत्त्व आहे. करटोलीची भाजी अत्यंत चविष्ट असते. ही भाजी खाल्ल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात शक्ती मिळते. म्हणूनच अनेकजण या भाजीचं कौतुक करताना या भाजीला अनेक अतिशोयक्ती बिरुदंही जोडतात.

करटोलीचा ‘या’ रोगांवर मोठा परिणाम

करटोलीची भाजी अनेक प्रकारच्या आजारांपासून शरीराचं संरक्षण करते. इतकंच नाही ही भाजी खाल्ल्याने अनेक आजार बरे होतात असंही सांगितलं जातं. आयुर्वेदात देखील करटोलीला खूप महत्त्व आहे. डोकेदुखी, केस गळती, कान दुखणे, खोकणे, पोटात इंफेक्शन, मुळव्याध, डायबिटीज, खरुच, अर्धांगवायू, ताप, सूज, बेशुद्ध पडणे, सापाने दंश करणे, डोळ्यांच्या व्याधी, कँसर, ब्लड प्रेशर सारख्या अनेक आजारांवर या भाजीचा चांगला परिणाम होतो.

तसं पाहिलं तर करटोलीची भाजी इतर सामान्य भाज्यांप्रमाणेच करतात. मात्र, आयुर्वेदात या वेलवर्गीय वनस्पतीची मुळं, फुलं, रस, पानं इत्यादींचा उपयोग वेगवेगळ्या रोगांवर उपचारासाठी केला जातो. बाजारात करटोलीची भाजी वेगवेगळ्या किमतीला मिळते. तिची किंमत 80 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत असते. या भाजीची किंमत सिझन आणि उपलब्धता यावरच ठरत असते.

हेही वाचा :

कोरोना लसीविषयी आदिवासींमध्ये गैरसमज आणि भिती, ‘सुरगाणा पॅटर्न’ प्रभावी : छगन भुजबळ

कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी दररोज एक वाटी दही खा, वाचा अधिक!

शरीरातून घाम का निघतो?, प्रकृतीसाठी चांगलं की वाईट?, वाचा सविस्तर…

व्हिडीओ पाहा :

Know all about Spiny gourd medical importance of Momordica dioica

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI