नाशिक : “कोरोनाविषयी असलेले गैरसमज व भीतीमुळे उपचारासाठी आदिवासी बांधव पुढे येत नव्हते. अशावेळी आदिवासी बांधवांचा ज्या उपचार पध्दतीवर विश्वास व उपचार घेण्याची तयारी आहे, अशी आयुर्वेदीक उपचार पध्दती सुरगाण्यासारख्या आदिवासी भागात पोहचवून आदिवासी बांधवावर उपचार करण्यात आले. या माध्यमातून कोरोनामुक्तीचा ‘सुरगाणा पॅटर्न’ आदिवासी भागात प्रभावी ठरला आहे,” असं मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. भुजबळ फॉर्म येथे ‘सुरगाणा पॅटर्न’ यशस्वीपणे राबविणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील वैद्यकीय क्षैत्रातील मान्यवरांचा सत्कार जिल्हा परिषदेच्यावतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते (Chhagan Bhujbal praise Surgana Pattern of Corona treatment in Tribal of Nashik).