मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने गरीबांच्या शिक्षणासाठी भरीव योगदान द्यावे : छगन भुजबळ

नाशिक येथील शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेजच्या नवीन इमारतीचं उद्घाटन आणि उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय लोकार्पण सोहळा आज पार पडला.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने गरीबांच्या शिक्षणासाठी भरीव योगदान द्यावे : छगन भुजबळ
Chhagan Bhujbal

नाशिक : येथील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, नाशिकचे शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर नामकरण, राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेजच्या नवीन इमारतीचं उद्घाटन आणि उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) उपस्थित होते. (future of MVP is bright, they should make significant contribution for education of poor: Chhagan Bhujbal)

मराठा विद्या प्रसारक समाज शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सत्यशोधक चळवळीचं काम केल जात आहे. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद वाक्य घेऊन मविप्र ही संस्था गेल्या 107 वर्षापासून समाजाला आपली सेवा देत आहे. सत्यशोधक विचारसरणीवर काम करून बहुजन समाजाची सेवा करावी. अतिशय सुंदर आणि प्रेक्षणीय असे संग्रहालय निर्माण करण्यात आलेले आहे. संस्था अधिकाधिक उज्वल कशी होईल, गरिबांना शिक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच कोरोनाच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवेसाठी मदत होईल, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

मराठा विद्या प्रसारक समाज शैक्षणिक संस्थेला शतकांचा इतिहास असून अनेक कर्मवीरांचे संस्थेच्या जडण घडणीत महत्वाचे योगदान आहे. त्यामुळे या संस्थेच्या रचलेल्या पायाला अधिक भक्कपणे पुढे नेण्यासाठी संस्थेमार्फत सुरु करण्यात आलेल्या आर्किटेक्चर व पॉलिटेक्निकल महाविद्यालयात आधुनिक काळाची आणि उद्योगांची गरज लक्षात घेत आधुनिक शिक्षण पध्दतीची कास धरावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पालकमंत्री या नात्याने छगन भुजबळ यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे नाशिकमध्ये झाली आहेत. त्यामुळे मुंबई आणि पुण्यानंतर आता नाशिक शहर पुढे येत आहे. विकासाचा हा वेग कायम राहण्यासाठी नागरिकांना दळणवळणाच्या अधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी निधीची भरीव तरतूद करण्यात येणार आहे. तसेच प्रस्तावित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय लवकर सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कार्यक्रमात यावेळी मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर कार्यक्रमाचे आभार संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांनी मानले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, आमदार दिलीप बनकर, आमदार सीमा हिरे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते, सरचिटणीस नीलिमाताई पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, उपसभापती राघोनाना आहिरे, चिटणीस डॉ. सुनिल ढिकले आणि मविप्र संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

इतर बातम्या

वसंतराव नाईक यांनी खेडयापाड्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं, त्यांच्यामुळं महाराष्ट्रात कृषी क्रांती : छगन भुजबळ

राज्यात आणखी एका विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा ऐरणीवर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नावाची मागणी

Maharashtra Krishi Diwas 2021: आई वडिलांना शेतात होणारा त्रास अनुभवला, मालेगावच्या तरुणानं टाकाऊ वस्तूंचं जुगाड करत थेट पेरणी यंत्र बनवलं

(future of MVP is bright, they should make significant contribution for education of poor: Chhagan Bhujbal)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI