किती जुने स्टँप पेपर वापरावेत? व्हॅलिडीटीविषयीची ‘ही’ माहिती जाणून घ्या

स्टँप पेपरचा अनेक महत्त्वाच्या कामात होतो. त्यात आर्थिक व्यवहार असो, जमिनीचे व्यवहार किंवा कायदेशीर प्रतिज्ञापत्र असो, प्रत्येक ठिकाणी स्टँप पेपरची भूमिका मोठी असते.

किती जुने स्टँप पेपर वापरावेत? व्हॅलिडीटीविषयीची 'ही' माहिती जाणून घ्या


नवी दिल्ली : स्टँप पेपरचा अनेक महत्त्वाच्या कामात होतो. त्यात आर्थिक व्यवहार असो, जमिनीचे व्यवहार किंवा कायदेशीर प्रतिज्ञापत्र असो, प्रत्येक ठिकाणी स्टँप पेपरची भूमिका मोठी असते. कायदेशीर व्यवहारात त्याला अनन्यसाधारण महत्व असते. संपत्तीची खरेदी-विक्री करताना सरकारला काही शुल्क द्यावा लागतो. तो स्टँप ड्यूटीच्या रुपात देतात. केंद्र सरकारने यासाठी कास इंडियन स्टँप कायदा, 1899 बनवलेला आहे. यानुसारच हे पैसे अदा केले जातात. मात्र, राज्य सरकारचे देखील वेगवेगळे नियम असतात त्यामुळे प्रत्येक राज्यात हे शुल्क वेगळं असतं. त्यातच स्टँप पेपरची काही एक्सपायरी डेट असते का असाही प्रश्न विचारला जातो. त्याचाच हा आढावा (Know all about Stamp duty and its validity in India).

अनेक लोक पुढे जाऊन कामाला येईल म्हणून स्टँप खरेदी करुन ठेवतात. मात्र, अनेक दिवस होऊनही त्याचा वापर न झाल्यानं तो स्टँप पेपर चालेल का असा प्रश्न उपस्थित होतो. म्हणूनच आपण घेतलेला स्टँप पेपर किती दिवस ग्राह्य धरला जाईल याची माहिती करुन घेणं गरजेचं आहे.

स्टँप पेपर किती दिवस चालतो?

इंडियन स्टँप कायद्याचा विचार केल्यास स्टँप पेपरला एक्सपायरी डेट असते का याबाबत या कायद्यात कोणताही उल्लेख नाही. मात्र. इंडियन स्टँप पेपर कायद्याच्या कलम 64 नुसार याबाबत काही मर्यादा सांगितल्या आहेत. यानुसार जर स्टँप पेपर खरेदी करुन तो वापरात आला नाही तर तो परत करुन त्यावर अलाउंस किंवा रिफंड मिळतो. मात्र, यासाठी तो स्टँप पेपर सुस्थितीत असणं गरजेचं आहे. फाटलेल्या स्थितीत रिफंड मिळत नाही. विशेष म्हणजे हा रिफंड स्टँप खरेदीनंतर 6 महिन्यापर्यंतच मिळतो.

सर्वोच्च न्यायालयाचा स्टँपच्या व्हॅलिडीटीबाबत निर्णय काय?

सुप्रीम कोर्टाने तिरुवेंगडा पिल्लई विरुद्ध नवनीतमाल, (2008) 4 एससीसी 530 मध्ये म्हटलं, “कलम 54 मध्ये देण्यात आलेली 6 महिन्यांची मर्यादा ही केवळ स्टँप पेपरच्या रिफंडसाठी आहे. स्टँप पेपर वापराबाबत कोणतीही कालमर्यादा नाही. म्हणूनच स्टँप पेपरचा वापर करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही. स्टँप पेपर 6 महिन्यांपेक्षा जुना असेल तरी तो वापरता येतो.”

हेही वाचा :

सर्वसामान्यांना झटका बसण्याची चिन्हं, पेट्रोल-डिझेलवर टॅक्स वाढवण्याच्या केंद्राच्या हालचाली

बँकेच्या चेकवर दोन रेषा का मारल्या जातात? वाचा याचा नेमका अर्थ काय

ऑनलाईन ब्रँडेड सामान मागवताय? वस्तू खरी की खोटी ‘असं’ तपासा

व्हिडीओ पाहा :

Know all about Stamp duty and its validity in India

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI