ब्रिटिश माध्यमांनी प्रिंसेस डायनासाठी ताजमहल भेट दुर्दैवी असल्याचं म्हटलं, नेमकं काय घडलं?

डायनाने 1992 मध्ये भारतातील जगप्रसिद्ध वास्तू ताजमहालला भेट दिली. मात्र, ब्रिटिश माध्यमांनी या ही भेट प्रिंसेस डायनासाठी दुर्दैवी असल्याचं म्हटलं.

ब्रिटिश माध्यमांनी प्रिंसेस डायनासाठी ताजमहल भेट दुर्दैवी असल्याचं म्हटलं, नेमकं काय घडलं?
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 02, 2021 | 4:27 PM

वॉशिंग्टन : ब्रिटनमध्ये प्रिंस विलियम आणि प्रिंस हॅरी आपली आई प्रिंसेज डायनासाठी मोठ्या काळानंतर एकत्र आलेले दिसले. त्यांनी गुरुवारी (1 जुलै) प्रिंसेज ऑफ वेल्‍स, डायनाच्या 60 व्या जन्‍मदिनानिमित्त एका पुतळ्याचं अनावरण करुन आठवणी जागवल्या. प्रिंसेस डायनाची लोकप्रियता जगभरात होती. नेपाळपासून लंडन, अमेरिकेपर्यंत त्याचा प्रभाव होता. याच डायनाने 1992 मध्ये भारतातील जगप्रसिद्ध वास्तू ताजमहालला भेट दिली. मात्र, ब्रिटिश माध्यमांनी या ही भेट प्रिंसेस डायनासाठी दुर्दैवी असल्याचं म्हटलं (Know why British media called Princes Diana Taj Mahal visit unfortunate for her back in 1992).

ताजमहाल भेटीवेळी फोटो काढताना डायना एकटीच शांतपणे बसलेली दिसली

लेडी डायनाने ताजमहालला भेट दिली तेव्हा रेड कोट आणि स्‍कर्टमध्ये सुंदर पोज दिली. याचे सुंदर फोटो लोकांमध्ये चांगलेच पसंतीस उतरले. मात्र, ब्रिटनमधील घडामोडींच्या जाणकारांनी या फोटोत डायना दुःखी आणि एकटे पडल्याचं दिसत असल्याचं निरिक्षण नोंदवलं.

सुरुवातीला लेडी डायनाने फोटोग्राफर्ससमोर पोज देत फोटो काढले मात्र, 2 मिनिटानंतर त्यांनी कॅमेरे बंद करुन फोटोग्राफर्सला तेथून जाण्यास सांगितलं. डायना या बेंचवर 5 मिनिट तशीच शांत आणि एकटे बसून राहिली. त्या बेंचला आजही डायना बेंच म्हणून ओळखलं जातं. या फोटोनंतर 10 महिन्यातच प्रिंसेज डायना आणि प्रिंस चार्ल्‍सने वेगळं होण्याच्या निर्णयाची घोषणा केली.

पती चार्ल्‍सशिवाय डायनाची एकटीच ताजभेट

आधी प्रिंस चार्ल्‍स आणि लेडी डायना दोघेही आग्रा येथे ताजमहाल पाहायला येणार होते. मात्र, शेवटी डायना एकटीच ताजमहाल पाहायला आली आणि फोटो काढले. लेडी डायना ताजमहल पाहत असताना त्यांचे पती प्रिंस चार्ल्‍स दिल्‍लीत होते. डेली मिररचे रॉयल एडीटर जेम्‍स व्हिटेकर यांनी यावेळी म्हटलं होतं, “हा फोटो काढल्यानंतर काही महिन्यातच लेडी डायना आणि प्रिंस चार्ल्‍स वेगवेगळे झाले. डायनासाठी ताजमहाल भेटीचा दिवस खरंच एक दुर्दैवी दिवस होता.”

‘An Alone Lady at the Taj’

प्रिंसेज डायना आणि प्रिंस चार्ल्‍सचा अधिकृत भारत दौरा फेब्रुवारी 1992 मध्ये झाला. तेव्हा लंडनमध्ये व्हॅलेंटाईन दिवसाचं सेलिब्रेशन सुरू होतं. तेव्हा सर्वांचीच नजर त्यांचं आवडतं कपल चार्ल्स आणि डायना यांच्याकडे होतं. भारत दौऱ्यानंतर दोघांमधील दुरावा संपून ते पुन्हा सर्वकाही ठिक होईल, असंच त्यांना वाटत होतं. मात्र, लेडी डायनाच्या ताजमहाल भेटीच्या फोटोला ब्रिटिश माध्यमांनी ‘अॅन अलोन लेडी अॅट द ताज’ असं कॅप्शन दिलं. त्यामुळे या फोटोतून डायना आणि चार्ल्समध्ये सर्वकाही ठिक नाही हे स्पष्ट झालं. त्यावेळी प्रिंस चार्ल्‍स यांची त्यावेळची मैत्रीण आणि आत्ताची पत्नी कॅमिलासोबत जवळीक वाढली होती. हाच मुद्दा डायना आणि चार्ल्स यांच्या वैवाहिक आयुष्यात मिठाचा खडा ठरला.

हेही वाचा :

ब्रिटनची राजकुमारी डायनाची खोटं बोलून मुलाखत घेतल्याचा आरोप, BBC स्वतंत्र चौकशी करणार

व्हिडीओ पाहा :

Know why British media called Princes Diana Taj Mahal visit unfortunate for her back in 1992

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें