भारताच्या नकाशावर पाकिस्तान, चीन नव्हे तर श्रीलंका दिसतो.. काय आहे याचे नेमके कारण?

भारताच्या नकाशावर पाकिस्तान, चीन नव्हे तर श्रीलंका दिसतो.. काय आहे याचे नेमके कारण?

जेव्हा कधी तुम्ही भारताचा नकाशा पाहत असाल तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की भारताच्या नकाशात श्रीलंका दाखवला गेला आहे पण पाकिस्तान, भूतान, चीन वगैरे देश नकाशात दाखवले गेले नाहीत, असे का ?? याचा कधी विचार केला आहे.... भारताच्या नकाशात श्रीलंका दाखवण्याचे कारण आहे समुद्री कायदा ज्याला, ओशियन लॉ असे म्हणतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 03, 2022 | 9:16 PM

तुम्ही भारताचा नकाशा अनेकवेळा पाहिला असेल आणि त्यात श्रीलंकेचा नकाशाही दाखवला आहे, हे तुमच्या लक्षात आले असेल पण पाकिस्तान, चीन किंवा इतर अन्य कोणत्याही शेजारच्या देशाबाबत असे होत नाही. श्रीलंकेव्यतिरिक्त इतर देश भारताच्या नकाशावर कधीच दाखवले जात नाहीत. असे का घडते ,याचा तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? श्रीलंकेशी आपले चांगले संबंध आहेत, असे नाही, त्यामुळे ते भारताच्या नकाशावर दाखवले गेले तरी काही फरक पडत नाही, तर त्यामागे हे एक महत्त्वाचे कारण आहे.

होय, काही विशिष्ट कारणामुळे श्रीलंकेचा नकाशाही भारताच्या नकाशावर दाखवला आहे. असे नेमके कोणते कारण आहे ज्यामुळे भारताच्या नकाशावर श्रीलंका दाखवला जातो आणि यामध्ये हिंद महासागराची भूमिका किती महत्त्वाची आहे, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत…

असे नेमके का ?

भारताच्या नकाशात श्रीलंका दाखवण्याचा अर्थ असा नाही की ,त्यावर भारताचा श्रीलंकेवर काही अधिकार आहे किंवा दोन्ही देशांमध्ये असा काही करार आहे किंबहुना असे करण्यामागचे कारण सागरी कायदे आहेत, ज्याला ओशियन लॉ म्हणतात. हा कायदा करण्यासाठी पुढाकार यूनाइडेट नेशन म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघानी घेतला होता, त्यानंतर हा कायदा अस्तित्वात आला.

आपणास सांगू इच्छितो की, हा कायदा करण्यासाठी युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी (UNCLOS-1) ही परिषद पहिल्यांदा १९५६ मध्ये आयोजित करण्यात आली होती आणि त्यानंतर १९५८ मध्ये परिषदेचा निकाल घोषित करण्यात आला होता. वास्तविक, या UNCLOS-1 ने समुद्राशी संबंधित सीमा आणि करारांबाबत सहमती दर्शविली गेली त्यानंतर १९८२ पर्यंत तीन वेळा परिषद आयोजित करण्यात आल्या, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर समुद्राशी संबंधित कायदे यांना अंमलात आणण्याचे काम करण्यात आले.

समुद्री कायदा (ओशियन लॉ) काय आहे?

जेव्हा हा कायदा निर्माण करण्यात आला, तेव्हा कोणत्याही देशाची सीमा म्हणजेच बेसलाइन आणि २०० सागरी मैल यांच्यातील स्थान भारताच्या नकाशावर दाखवले पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर, जर एखादा देश समुद्राच्या जवळ असेल किंवा त्याचा काही भाग समुद्राशी जोडला गेला असेल, तर त्या देशाचा नकाशात देशाच्या सीमेभोवतीचा जो परिसर आहे तो नकाशावर दाखवला जाईल.

हेच नेमके कारण आहे की श्रीलंका भारताच्या नकाशावर दाखवला जातो, कारण तो २०० सागरी मैलांच्या आत येतो. भारतीय सीमेपासून २०० सागरी मैल अंतरावर असलेली सर्व ठिकाणे नकाशावर दाखवली गेली आहेत.

२०० सागरी नॉटिकल मैल म्हणजे किती ?

जर नॉटिकल मैल ला किलोमिटर च्या हिशोबाने पाहायला गेल्यास एक सागरी मैल (nmi) मध्ये १.८२४ किलोमीटर (km) आहे. या नुसार २०० सागरी मैल म्हणजे ३७० किलोमीटर. अशा स्थितीत भारतीय सीमेपासून ३७० किलोमीटर चा परिसर भारताच्या नकाशावर दाखवण्यात आला आहे. यामुळे दुसरा देश होऊनही श्रीलंका भारताच्या नकाशात समाविष्ट आहे.

श्रीलंका भारतापासून किती अंतरावर आहे?

भारत ते श्रीलंकेच्या अंतराबद्दल बोलायचे झाले तर, भारतातील धनुषकोडी ते श्रीलंकेचे अंतर फक्त १८ मैल आहे, यावरून हे स्पष्ट होते की भारताच्या नकाशात श्रीलंकेचे महत्त्वाचे स्थान आहे आणि त्यामुळेच त्यावर कोणताही वाद नाही म्हणून या नियमाचे पालन अन्य इतर सागरी देश देखील पाळतात.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें