जर तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये दारू घेऊन जायचे असेल, तर हे नियम माहिती असायलाच हवे!

Liquor Rules in India: भारतात लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात अगदी सहज प्रवास करतात परंतु तुम्हाला माहिती आहे का,तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये दारू सोबत घेऊन प्रवास देखील करू शकता.

जर तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये दारू घेऊन जायचे असेल, तर हे नियम माहिती असायलाच हवे!
दारुबंदी असलेल्या बिहारमध्ये मृत्यूचा शिमगा, 25 जणांचा मृत्यूImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 4:48 PM

भारतामध्ये दारू ( Liquor)संदर्भात प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे नियम आपल्याला पाहायला मिळतात. अनेक राज्यांमध्ये दारू पूर्णपणे सेवनास व विक्री करण्यास देखील बंदी आहे, अशावेळी तुमच्याकडे दारू सापडली तर तुमच्यावर योग्य ती कारवाई देखील केली जाते. जर तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जरी प्रवास करत असाल तर या राज्यांमध्ये जे नियम असतात, ते नियम आपल्याला पाळणे गरजेचे आहे. प्रवास करताना जर आपण या नियमांची अंमलबजावणी केली नाही तर आपल्याला अनेक संकटांना सामोरे देखील जावे लागू शकते. तुम्हा सर्वांना माहितीच असेल की, अनेक राज्यांमध्ये दारू विकणे किंवा दारू सेवन करणे यावर पूर्णतः बंदी ( Liquors ban)करण्यात आलेली आहे. परंतु तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर दारू सोबत घेऊन जायची असेल तर अशा वेळी नेमके नियम नेमके काय असतात याबद्दलची तुम्हाला माहिती आहे का? आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात दारू घेऊन जाणे, दुसऱ्या राज्यांमध्ये दारू सेवन करण्याबाबतचे कोणकोणते नियम असतात याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया दारू प्रवासामध्ये ( Liqiours carrying while travel) घेऊन जाण्याबाबतचे कोणकोणते नियम आहेत त्याबद्दल…

तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मध्ये दारू घेऊन जाऊ शकता ?

नियमानुसार तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात दारूची बॉटल घेऊन जाऊ शकता परंतु तुम्ही ज्या राज्यांमध्ये जाणार आहात तेथील काही नियमांचे पालन तुम्हाला करणे अनिवार्य आहे.जसे की तुम्ही एखाद्या राज्यांमध्ये आहात आणि त्या राज्यांमध्ये फक्त तुम्हाला दारूच्या 4 बॉटल सोबत नेण्याची परवानगी असेल आणि अशावेळी तुम्ही त्या राज्यांमध्ये जात आहात. या राज्यांमध्ये 2 बॉटल परवानगी असेल तर अशा वेळी प्रत्येक राज्याच्या नियमानुसार तेथील नियमावली तुम्हाला फॉलो करणे गरजेचे आहे.

ड्राय स्टेट बद्दल काय नियमावली आहे?

जर तुम्ही एखाद्या ड्राय स्टेट म्हणजेच एखाद्या राज्यामध्ये दारू नेण्यास बंदी आहे अशा ठिकाणी प्रवास करत असाल तर तुम्हाला त्या राज्यांमध्ये जी काही नियमावली जाहीर केलेली आहे त्या नियमावलीचे पालन करणे अनिवार्य आहे. याचा अर्थ तुम्ही त्या राज्यामध्ये प्रवास करतेवेळी दारू सोबत घेऊन जाऊ शकत नाही.

बंदी असलेल्या राज्यात दारू कसे सेवन करू शकतो?

बंदी असलेल्या राज्याचे वेगवेगळे नियम असतात, जसे की बिहारमध्ये कुणालाच दारू पिण्याची परवानगी नाही. त्याचबरोबर गुजरात मधील बाहेरील लोकांना दारू पिण्याची परवानगी दिली जाते परंतु त्यासाठी आधी परवानगी घ्यावी लागते. म्हणूनच जर एखाद्या राज्यात बंदी असलेल्या ठिकाणी तुम्हाला दारु पिण्याची इच्छा झाल्यास अशा वेळी तुम्हाला परवानगी घेणे गरजेचे आहे. भविष्यात तुम्ही कुठे प्रवास करणार असाल आणि तुम्हाला जर दारूच्या बाटल्या सोबत न्यायच्या असतील तर अशा वेळी त्या राज्यात दारू संदर्भातील काही नियमावली आवश्य पडताळून पाहायला पाहिजे, अन्यथा तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

असे युद्ध ज्यात 5 कोटींपेक्षा जास्त लोक मारले गेले, जाणून थक्क व्हाल युद्धामागील रक्तरंजित कहाणी

प्रत्येक पत्नीने आपल्या पतीचे म्हणणे ऐकायला हवे..? ,जाणून घेऊया भारतीयांचे विचार !

हक्काच्या कारमध्ये बसून दारू पिणं का ठरतं बेकायदेशीर? ‘हे’ आहे यामागचं नेमकं कारण!

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.