असे युद्ध ज्यात 5 कोटींपेक्षा जास्त लोक मारले गेले, जाणून थक्क व्हाल युद्धामागील रक्तरंजित कहाणी

World War 2: 1 सप्टेंबर रोजी दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली होती. या दुसऱ्या महायुध्दात 5 कोटी पेक्षा जास्त लोक मारले गेले होते. हे युद्ध विश्वासाठी महाविनाश ठरले होते. आज पासून काही वर्षापूर्वी टेक्नॉलॉजी सोबत लढले गेले होते आणि हे युद्ध अगदी भयंकर होते या युद्धामध्ये 5 कोटींपेक्षा जास्त लोकांना मारण्यात आले होते. दुसरे महायुद्ध कसे सुरू झाले आणि त्याचे नेमके परिणाम जगावर काय झाले होते याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

असे युद्ध ज्यात 5 कोटींपेक्षा जास्त लोक मारले गेले, जाणून थक्क व्हाल युद्धामागील रक्तरंजित कहाणी
दुसऱ्या युध्दातील संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 3:52 PM

मुंबई : हल्ली रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) या दोघांमध्ये युद्ध सुरू आहे. या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे अनेकांना भविष्यात तिसरे महायुद्ध (Third World War) होईल की काय ? ,अशी भीती वाटत आहे. अनेक ठिकाणी तिसऱ्या महायुद्ध बद्दल चर्चा देखील केली जात आहे. जर भविष्यात तिसरे महायुद्ध घडले तर हे विनाशकारी ठरेल कारण की आधी जे दोन महायुद्ध (Second World War) झाले होते त्यात प्रचंड हानी पाहायला मिळाली होती. आज पासून काही वर्षापूर्वी टेक्नॉलॉजी सोबत लढले गेले होते आणि हे युद्ध अगदी भयंकर होते या युद्धामध्ये 5 कोटींपेक्षा जास्त लोकांना मारण्यात आले होते. दुसरे महायुद्ध कसे सुरू झाले आणि त्याचे नेमके परिणाम जगावर काय झाले होते याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेव्हा अनेक देश एकाच वेळी युद्धाच्या रणभूमीमध्ये उडी घेतात तेव्हा जगाची परिस्थिती अतिशय गंभीर स्वरूपाची होऊन जाते. सगळीकडे रक्तरंजित वातावरण पाहायला मिळते, याचा अंदाज न लावलेला बरा… चला तर मग जाणून घेऊया दुसऱ्या महायुद्धामध्ये अशी नेमकी कोणती घटना घडली होती, जी आजही लोकांच्या हृदयामध्ये कोरली गेलेली आहे. ही आठवण जरी काढली तरी लोकांच्या अंगावर काटे उभे राहतात..जाणून घेऊया या रक्तरंजीत कहाणी त्याबद्दल…

या वर्षी सुरु झाली होती युद्धाची सुरुवात..

1 सप्टेंबर 1939 मधील नव्या महिन्यामध्ये लोकांना असे वाटत होते की, हा एक महिना खूप आशा पल्लवीत करणारा असेल. अंदाजे 82 वर्ष पूर्वी सुद्धा 1 सप्टेंबरला लोक असाच विचार करत होते परंतु त्याच दिवशी जागतिक संघर्षाला सुरुवात झाली. हे युद्ध एवढे मोठे झाले की, या युद्धाच्या कारणामुळे 5 कोटी पेक्षा जास्त लोक मारले गेले हो, खरच.. 1 सप्टेंबर ही तारीख म्हणजे जगाला विनाशकारी वाटेवर नेणारी ठरली याच दिवशी दुसरे महायुद्ध सुरू झाले होते.

1 सप्टेंबर 1939 ला जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या युद्धाच्या सोबतच दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली. जर्मनी आणि पोलंड यांच्यात युद्धाला सुरुवात झाल्यानंतर या युद्धामध्ये अनेक देशांनी उडी मारली. एकंदरीत 6 वर्षापर्यंत युद्ध सुरूच राहिले आणि या युद्धामध्ये 5 कोटी पेक्षा जास्त लोक मारले गेले. सगळीकडे मृत पडलेल्या माणसांचे शरीर सगळीकडे रक्ताचा सडा पडलेला आणि रक्तरंजित असलेला मानवी देह पहायला मिळत होता. आपणास सांगू इच्छितो की, दुसरे महायुद्ध वर्ष 139 ते 45 या दरम्यान घडले आणि हे एक सशस्त्र जागतिक संघर्ष निर्माण करणारे महायुद्ध ठरले.

या महा युद्धामध्ये विश्वातील दोन गटातील शक्ती (जर्मनी, इटली आणि जापान) व मित्र राष्ट्र (फ्रांस, ग्रेट ब्रिटेन, संयुक्त राज्य अमेरिका, सोवियत संघ आणि चीन चे काही हद्दिपर्यंत) यांचा समावेश होता. हा इतिहासातील सर्वात संघर्षमय असलेला काळ मानला जातो. हे युद्ध कमीत कमी 6 वर्षे चालले होते.या युद्धामध्ये 100 मिलियन लोकांचा सहभाग होता आणि या युद्धामध्ये जगातील लोकसंख्या पैकी 3 टक्के हिस्सा या युद्धामुळे संपुष्टात आला होता म्हणूनच या युद्धामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झाली होती.

अशी झाली युद्धाला सुरुवात ..

जागतिक महायुद्ध सुरू होण्याच्या काही महिन्यापूर्वी ब्रिटन आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी पोलंड ला आश्वासन दिले होते की जर पोलंडवर आक्रमण झाले तर ते त्याच्यासोबत त्याला मदत करतील मग जर्मनीने सुद्धा युद्धाची घोषणा न करताच पोलंडवर आक्रमण केले. फ्रान्स आणि ब्रिटन नस 3 सप्टेंबर 1939 ला जर्मनी विरुद्ध युद्ध करण्याची घोषणा केली तसेच जपानने सोवियेत संघाच्या विरोधात युद्ध करण्याचे जाहीर केले अशातच सुरुवातीच्या काळामध्ये इटली या महा युद्धामध्ये सहभागी नव्हती परंतु इटलीने 1940 मध्ये जर्मनीविरुद्ध युद्धाचे रणशिंग फुंकले यामध्ये राष्ट्रसंघ बद्दलची कटुता ,1929 मधली महामंदी नाझी वाद यांचा उदय इत्यादी या युद्धाचे कारण होते.

युद्ध कधी संपले…

जपान येथील शहर हिरोशिमावर परमाणु बॉम्ब टाकल्यानंतर जपानने 14 ऑगस्टला आत्मसमर्पण केले. जपानच्या आत्मसमर्पण करण्याबरोबरच दुसरे महायुद्धाचे अस्तित्व संपुष्टात आले. हे युद्ध 2 सप्टेंबर 1945 ला संपले. या युद्धामध्ये म्हणजेच दुसऱ्या महायुद्धा मधील 61 देशांनी सहभाग घेतला होता आणि समूहामध्ये एकत्रित येऊन एक दुसरा विरुद्ध हल्ला देखील केला.दुसऱ्या जागतिक महायुद्ध मध्ये मित्रराष्ट्र द्वारा पराभूत होणारा अंतिम देश जपान होता. आंतरराष्ट्रीय क्षेत्रांमध्ये दुसऱ्या जागतिक युद्धाचे सर्वात मोठे योगदान म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना आहे.

संबंधित बातम्या :

Russia Ukraine War: काय आहे C17 एअरक्राफ्ट ज्याचा वापर यूक्रेनमधून भारतीयांना आणण्यासाठी केला जाणार आहे?

National Science Day : 28 फेब्रुवारीलाच का होतो ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा? काय आहेत कारणे अन् उद्देश?

कॉमेडियन ते राष्‍ट्रपती : रशियापुढं नतमस्तक न होणाऱ्या वोलोदिमीर जेलेंस्की यांचा प्रेरणादायी प्रवास!

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.