जगातली सर्वात डेंजर लेडी शार्पशुटर, जिला हिटलरही घाबरायचा, एकदा नेम धरला की…
इतिहासात अशी एक महिला स्नायपर होऊन गेली आहे, जिचे नाव घेताच हिटरलरही घाबरायचा. या महिलेने वयाच्या 14 व्या वर्षी हाती शस्त्र घेतलं होतं.

Lyudmila Pavlichenko : इतिहासात अशा काही महिला होऊन गेल्या आहेत, ज्यांचं नाव आजही मोठ्या अभिमानाने घेतलं जातं. अशीच एक महिला आहे, जिच्या कामाबद्दल संपूर्ण जग तिला सलाम ठोकतं. या महिलेचं नाव ल्युडमिला पवलिचेंको असं आहे. विशेष म्हणजे ज्या काळात महिलांना सैन्यात दाखल होण्यास मनाई होती, त्या काळात ही महिला शार्प शुटर म्हणून प्रसिद्ध होती. या महिलेला इतिहासातील सर्वांत तरबेज नेमबाज म्हटलं जातं. ल्युडमिला पवलिचेंको यांनी जर्मनीचा हुकूमशाहा हिटरल यालाही परेशान करून सोडलं होतं.
शार्पशुटर म्हणून केलं काम
आजही तिला सोव्हियत युनियनची एक मोठी योद्धा मानलं जातं. ल्युडमिला पवलिचेंकोने द्वितीय विश्वयुद्धाच्या काळात सोव्हियत संघाच्या रेड आर्मीमध्ये शार्पशुटर म्हणून काम केलं होतं.त्या काळात महिलांना सैन्यात घेतलं जात नव्हतं. तरीदेखील ल्युडमिला पवलिचेंको ही शार्पशुटर द्वितीय विश्वयुद्धात लढली होती.
तब्बल 309 लोकांना मारलं
वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी आपल्या स्नायपर रायफलने तिने तब्बल 309 लोकांना मारलं होतं, असं म्हटलं जातं. यातील बहुसंख्य लोक हे हिटरलच्या सैन्यातील सैनिक होते.स्नायपर राफयलमध्ये तिचं असलेलं प्रभुत्व लक्षात घेऊन लोक तिला लेडी डेथ असं म्हणायचे.
14 व्या वर्षी हाती घेतलं शस्त्र
ल्युडमिला पवलिचेंको यांचा जन्म 12 जुलै 1916 रोजी युक्रेनच्या एका गावात झाला होता. वयाच्या 14 व्या वर्षीच ल्युडमिला पवलिचेंको यांनी हातात शस्त्र घेतलं होतं. हेन्री साकेडा यांनी लिहिलेल्या हिरोईन्स ऑफ द सोव्हियत यूनियन या पुस्तकानुसार पवलिचेंको अगोदर शस्त्रांच्या कारखान्यात काम करायच्या. त्यानंतर मात्र त्या स्नायपर झाल्या.
युद्धात जखमी झाल्यानंतर…
युद्धादरम्यान 1942 मध्ये ल्युडमिला पवलिचेंको या जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना रशियाची राजधानी मॉस्को येथे पाठवण्यात आले. तिथे उपचार घेतल्यानंतर त्यांच्यावर अन्य स्नायपर्सना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी देण्यात आली. पुढे त्या रेड आर्मीच्या प्रवक्त्याही झाल्या. 1945 साली युद्ध संपल्यानंर त्यांनी मॉस्कोमध्ये सोव्हिएतच्या नौसेनेच्या मुख्यालयातही काम केले. 10 ऑक्टोबर 1947 मध्ये वयाच्या 58 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
