AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ATM कार्डसारखं मजबूत आधार कार्ड हवंय? आता फक्त ₹५० मध्ये घरपोच मिळवा PVC Aadhaar!

तुमचंही आधार कार्ड पाकिटात ठेऊन ठेऊन खराब झालंय? पण तुम्हाला माहीत आहे का, की तुम्ही आता तुमच्या एटीएम कार्डसारखं मजबूत, टिकाऊ आणि सोबत बाळगायला एकदम सोपं असं प्लास्टिकचं आधार कार्ड थेट सरकारकडून मागवू शकता? तेही घरबसल्या, फक्त ५० रुपयांमध्ये! चला, जाणून घेऊया कसं ?

ATM कार्डसारखं मजबूत आधार कार्ड हवंय? आता फक्त ₹५० मध्ये घरपोच मिळवा PVC Aadhaar!
PVC Aadhaar CardImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: May 07, 2025 | 2:00 PM
Share

आज शाळेच्या ऍडमिशनपासून ते बँकेच्या कामांपर्यंत आणि सरकारी योजनांपासून ते सिम कार्ड घेण्यापर्यंत, सगळीकडे आधार कार्ड लागतंच. आपल्याला UIDAI कडून पोस्टाने जे आधार कार्ड मिळतं, ते सहसा कागदाचं असतं आणि लवकर खराब होण्याची, फाटण्याची किंवा पाण्याने भिजण्याची शक्यता असते. पाकिटात ठेवायलाही ते सोयीचं नसतं.

पण तुम्हाला माहीत आहे का, की तुम्ही आता तुमच्या बँकेच्या ATM Card किंवा पॅन कार्डसारखं मजबूत, टिकाऊ आणि सोबत बाळगायला सोपं असं प्लास्टिकचं आधार कार्ड अधिकृतरित्या मागवू शकता? होय, आणि यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, तुम्ही ते घरबसल्या ऑनलाइन ऑर्डर करू शकता, तेही अगदी माफक शुल्कात!

काय आहे हे PVC आधार कार्ड?

PVC म्हणजे Polyvinyl Chloride, हा एक प्रकारचा टिकाऊ प्लास्टिक मटेरियल आहे. या कार्डवर तुमचा फोटो, नाव, पत्ता, आधार नंबर आणि एक सुरक्षित QR कोड छापलेला असतो. हे दिसायला आणि टिकायला अगदी तुमच्या ATM कार्डसारखं असतं, त्यामुळे ते सहजपणे पाकिटात ठेवता येतं आणि लवकर खराब होत नाही.

कसं मागवायचं ऑनलाइन?

हे कार्ड मागवण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे:

UIDAI वेबसाइटला भेट द्या: सर्वात आधी आधार कार्डची अधिकृत वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in/ तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर उघडा.

पर्याय निवडा: वेबसाइटवर खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला ‘Order Aadhaar PVC Card’ असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

माहिती भरा: आता तुमचा १२ अंकी आधार नंबर किंवा २८ अंकी Enrollment ID टाका. स्क्रीनवर दिसणारा Captcha Code जसा आहे तसा भरा.

मोबाईल नंबर आणि OTP:

जर तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक असेल: तर Send OTP वर क्लिक करा. तुमच्या लिंक असलेल्या नंबरवर OTP येईल.

जर मोबाईल नंबर लिंक नसेल: तर काळजी करू नका! तिथे ‘My mobile number is not registered’ असा एक छोटा बॉक्स दिसेल, त्यावर टिक करा. आता तुम्हाला कोणताही चालू मोबाईल नंबर टाकण्याचा पर्याय मिळेल. त्या नंबरवर OTP येईल.

OTP टाका: तुमच्या मोबाईलवर आलेला OTP योग्य ठिकाणी टाका आणि ‘Terms and Conditions’ मान्य करण्यासाठी बॉक्समध्ये टिक करा. त्यानंतर ‘Submit’ बटण दाबा.

Preview आणि Payment: तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा Preview दिसेल. माहिती तपासून ‘Make Payment’ वर क्लिक करा.

शुल्क भरा: तुम्हाला Online Payment करण्यासाठीचे पर्याय दिसतील. फक्त ₹५०/- शुल्क भरा.

किती दिवसात मिळणार कार्ड?

तुमचं पेमेंट यशस्वी झाल्यावर तुमची ऑर्डर पूर्ण होईल. साधारणपणे दोन आठवड्यांच्या आत स्पीड पोस्टाने तुमच्या आधार कार्डवर नोंदणी असलेल्या पत्त्यावर हे नवीन, टिकाऊ PVC आधार कार्ड घरपोच पाठवलं जाईल.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.