जगातलं भयानक गाव, शेकडो घरं पण राहतो फक्त एक माणूस, नेमकं कारण काय?
सध्या जगातील एका अनोख्या गावाची सगळीकडेच चर्चा होत आहे. या गावात फक्त एकच माणूस राहतो. विशेष म्हणजे या माणसाचा या गावात मोठा बार आहे.

Isolated Village On Earth : या पृथ्वीवर अनेक आश्चर्यकारक गोष्टी, वास्तू, घरे आहेत. काही ठिकाणी तर तुम्हाला एकदम थक्क करणाऱ्या गोष्टी पहायला मिळतात. भारतातील गावांमध्ये शेकडो लोक राहतात. आपल्याकडे बहुसंख्य गावात अनेक सोई-सुविधा असतात. परंतु या जगात असे एक गाव आहे, जिथे फक्त एक माणून राहोत. विशेष म्हणजे या गावात अनेक घरे आहेत. मोठे रस्ते आहेत. परंतु तिथे फक्त एकच माणूस राहतो. हा माणूनस तिथेच राहून आपले पोट भरतो. कधीकाळी या गावात 120 पेक्षा जास्त लोक राहायचे. परंतु आता तिथे फक्त हा एकटाच टोपी घातलेला माणूस वास्तवय करतो. त्यामुळे बाकीची माणसं नेमकी कुठे गेली? हा एकटाच माणूस तिथे का राहतो? असे विचारले जात आहे.
फक्त एकच माणूस गावात राहतो
या गावाची माहिती देणारा एक व्हिडीओ सध्या खूपच चर्चेत आला आहे. इन्स्टाग्रामवर @annainlisbon या खात्यावर तो पोस्ट करण्यातआला आहे. हे गाव पोर्तुगालमध्ये आहे. या अजब गावाचे नाव तलासनल (Talasnal) असे आहे. हे गाव मध्य पोर्तुगालमध्ये डोंगरांमध्ये वसलेले आहे. याच गावात फक्त एक माणूस वास्तव्यास आहे. या व्यक्तीचे नाव जॉर्ज असे आहे.
गावातील लोक नेमके कुठे गेले?
अगोदर 1900 सालात या गावात साधारण 120 लोक राहायचे. परंतु या सर्वांनीच हळूहळू हे गाव सोडून दिले. हे गाव फारच दुर्गम भागात आहे. आरोग्य तसेच इतर सुविधान सल्याने या लोकांनी आपापल्या सोईनुसार गाव सोडून दिले. 1980 सालापर्यंत तिथे फक्त दोन नागरिक शिल्लक राहिले होते. आता तर फक्त जॉर्ज हे एकटेच या मोठ्या गावात वास्तव्य करतात. या गवात जॉर्ज यांचा एक बार आहे. पर्यटक या गावाला भेट देतात. त्या गावात जाऊन मद्यप्राशन करतात. यातूनच जॉर्ज यांना पैसे मिळतात.
View this post on Instagram
दरम्यान, जॉर्ज यांची कहाणी सांगणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. आतापर्यंत हा व्हिडीओ 51 लाख लोकांनी पाहिला आहे.
