रेल्वे आपलीच म्हणून मोठ्यानं गप्पा मारताना जरा सावध बरं का, नियम वाचा… नाही तर कारवाई होऊ शकते!

रेल्वे आपलीच म्हणून मोठ्यानं गप्पा मारताना जरा सावध बरं का, नियम वाचा... नाही तर कारवाई होऊ शकते!
रेल्वे

रेल्वेने (Railways) प्रवास करत असताना अनेक वेळा रात्री गोंधळ आणि गाण्यांच्या आवाजामुळे आपली झोप खराब झाली असेल. कारण बरेचजण लोक ग्रुपने प्रवास करत असतात. त्यावेळी रात्री उशीरापर्यंत गप्पा मारणे आणि गाणे ऐकणे हे सुरू असते. मात्र, आता प्रवाश्यांना असे करता येणार नाही. भारतीय रेल्वेकडून (Indian Railways)  रेल्वेमध्ये प्रवास करण्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 24, 2022 | 9:48 AM

मुंबई : रेल्वेने (Railways) प्रवास करत असताना अनेक वेळा रात्री गोंधळ आणि गाण्यांच्या आवाजामुळे आपली झोप खराब झाली असेल. कारण बरेचजण लोक ग्रुपने प्रवास करत असतात. त्यावेळी रात्री उशीरापर्यंत गप्पा मारणे आणि गाणे ऐकणे हे सुरू असते. मात्र, आता प्रवाश्यांना असे करता येणार नाही. भारतीय रेल्वेकडून (Indian Railways)  रेल्वेमध्ये प्रवास करण्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. रेल्वेने बदल केलेल्या नियमांची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे. रेल्वेने रात्रीच्या वेळी प्रवाशांना झोपेचा त्रास लक्षात घेऊन काही मोठे बदल केले आहेत.

भारतीय रेल्वेकडून मोठे बदल

नवीन नियमानुसार रात्री उशीरा मोठ्या आवाजामध्ये कोणताही रेल्वे प्रवासी मोबाईलवर बोलू शकत नाही. तसेच मोठ्या आवाजात गाणी ऐकू शकणार नाही. विशेष म्हणजे जर एखाद्या प्रवासी मोठ्या आवाजात फोनवर बोलत असेल किंवा गाणे ऐकत असेल तर रेल्वे अशा लोकांवर कारवाई करेल. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे रेल्वेमधील प्रवाशाकडून आलेल्या तक्रारीचे निराकरण न झाल्यास रेल्वे कर्मचाऱ्याला जबाबदार धरले जाणार आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या वतीने सर्व झोनला आदेश जारी करून हे नियम तातडीने लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेकदा प्रवासी शेजारच्या सीटवर असलेल्या प्रवाशाच्या मोबाईलवर मोठ्याने बोलत असल्याची तक्रार करतात. याशिवाय रात्रीच्या वेळी काही प्रवासी जोरजोरात बोलत असल्याच्याही तक्रारी मोठ्या प्रमाणात केल्या जातात. इतकेच नाहीतर रात्रीच्या वेळी रेल्वे कर्मचारी देखील गप्पा मारत असल्यामुळे झोप खराब होत असल्याच्या तक्रारी प्रवाश्यांकडून वारंवार केल्या जात आहेत. विशेष म्हणजे आता बोगीमध्ये लाईट लावण्यावरूनही नियमावली देण्यात आली आहे.

हे आहेत आता नवीन नियम

कोणत्याही प्रवाश्याला रात्री 10 नंतर मोठ्याने बोलता येणार किंवा मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणे ऐकणार नाही. रात्रीच्या वेळी प्रवाश्यांची झोप खराब होऊ नये. यासाठी नाईट लाईट सोडून इतर सर्व लाईट बंद राहतील. ग्रुपमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत रेल्वेमध्ये गप्पा मारत बसता येणार नाहीत.

संबंधित बातम्या : 

Budget 2022: कोरोनानं पर्यटन क्षेत्राला फटका, निर्मला सितारमण यांच्याकडून व्यावसायिकांच्या अपेक्षा काय ?

Budget 2022: डिजिटल आरोग्य सेवा ते टेलि-मेडिसिन, यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला झुकतं माप?


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें