‘या’ विनाशकारी शस्त्रांनी रशियाने युक्रेनमध्ये घातला धुमाकूळ

रशिया-युक्रेमधील युध्दामुळे जगात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रशियाकडून युक्रेनच्या तळांवर हवाई हल्ले केले जात असून यात अनेक विध्वंसक शस्त्रांचा वापर केला जात आहे. रशियाच्या या हल्ल्यात अनेक लोक मारले जात आहे.

‘या’ विनाशकारी शस्त्रांनी रशियाने युक्रेनमध्ये घातला धुमाकूळ
रशियानं वापरेलल्या विध्वंसक शस्त्रांबाबत जाणून घ्या (फोटो - PTI)Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 2:22 PM

गेल्या काही दिवसांपासून रशिया व युक्रेनमधील तणावाचे (Russia ukraine Crisis) रुपांतर आता युध्दात झाले आहे. रशियाने गुरुवारपासून युक्रेनवर हवाई हल्ले (ukraine attack) करण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनच्या सैन्याने रशियन आक्रमकांचा तीन आघाड्यांवर मुकाबला केला आणि रशियाने युक्रेनमध्ये क्षेपणास्त्रांसह मोठा विनाश केला. रशियाने या देशावर जमीन, समुद्र आणि हवाई हल्ला केला. एएफपीच्या म्हणण्यानुसार, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की युद्धाच्या पहिल्या दिवशी 137 मृत्यू झाले आहेत. यात अनेक विध्वंसक शस्त्र तसेच क्षेपणास्त्रांचा वापर केला जात आहे. रशियाकडे अनेक अशी अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, लढाउ विमाने आहेत. भारताची अनेक क्षेपणास्त्रे तसेच लढाउ विमाने ही रशियाकडून आयात करण्यात आली आहे. अशा पध्दतीने संरक्षणात्मदृष्ट्या स्वयंपूर्ण असलेल्या रशियाकडे नेमकी कुठली शस्त्रात्रे (Weapons) आहेत? हा प्रश्‍न पडणे साहजिक आहे. रशियाने नेमकी कोणती हायटेक शस्त्रास्त्रे वापरली ते जाणून घेणार आहोत.

  1.  रशियाच्या शस्त्राचे नाव 9K720 इस्कंदर बॅलिस्टिक मिसाइल आहे. ही कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली असून ती रशियन लष्कराने खास तयार केली आहे.
  2. BM-30 स्मर्च MBR हे रशियाचे दुसरे शस्त्र आहे. हे एक हेवी रॉकेट लाँचर आहे आणि जे सॉफ्ट टार्गेट, बॅटरी, कमांड पोस्ट इत्यादींसाठी वापरले जाते.
  3. BMPT टर्मिनेर टँक हे तिसरे शस्त्र आहे. बीएमपीटी टर्मिनेर हे टँक सपोर्ट फायटिंग व्हेईकल आहे. ही टाकी गोळीबारासह शत्रूची हेलिकॉप्टर आणि कमी वेगाने उडणारी विमाने पाडण्यास सक्षम आहे. ही टाकी रशियन कंपनी Uralvagonzavod ने बनवली आहे.
  4. Tor-M2 हे एक अँटी एअरक्राफ्ट मिसाईल आहे. हे क्षेपणास्त्र वेग आणि अंतरासाठी ओळखले जाते. त्याचा पल्ला 16 किमी पर्यंतचा आहे.
  5. KA-52 एलिगेटर हेलिकॉप्टर पाचवे मोठे शस्त्र आहे. हे रशियन सैन्याच्या शक्तिशाली शस्त्रांपैकी एक आहे, त्याच्या प्रभावी उड्डाणामुळे ते विशेष बनले आहे. शत्रूचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
  6. युक्रेनवरील हल्ल्यासाठी T-80 मॅन बॅटल टँकवरही हल्ला करण्यात आला. रशियाने बनवलेला हा खास टँक असून तो T-64 विकसित करून तयार करण्यात आला आहे. हे विशेषतः गॅस टर्बाइन इंजिनसाठी ओळखले जाते.
  7. सुखोई SU-35 हे लढाऊ विमान रशिायाची मोठी ताकद आहे. Su-35 हे दोन इंजिन असलेले लढाऊ विमान आहे. यातून एका वेळी लांब अंतरापर्यंत उड्डाण करता येते. हे विमान पाकिस्तानला रशियाकडूनही हवे होते.
  8. आठवे शस्त्र म्हणजे TU-95 स्ट्रॅटेजिक हेवी बॉम्बर आहे. हे विशेष चार इंजिन असलेले बॉम्बर आहे. याच्या मदतीने शस्तूच्या हवाई अड्ड्यांवर मोठ्या प्रमाणात विध्वंस करता येतो.

Akola Student | युक्रेनमध्ये अडकलाय अकोल्याचा जॅकशारोन! जॅकला परत आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न

युक्रेनमध्ये अडकलेल्यांसाठी नाशिक जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन सुरू; कुठे मिळेल मदत?

Aprilia SR GT 200 स्कूटर लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि खास वैशिष्ट्य!

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.