AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Snake Fact: कात टाकल्यावर साप होतो हिंसक? कात दिसताच सावध व्हा

snakes shedding skin: साप कात टाकतो. आपण शेतात अथवा जंगलात फिरताना सापाची कात दिसून येते उन्हाळ्यात सापाची कात शेताच्या बांधावर, ओढ्या शेजारी अथवा खळ्या शेजारी तुम्ही पाहिली असेल. तेव्हा या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका.

Snake Fact: कात टाकल्यावर साप होतो हिंसक? कात दिसताच सावध व्हा
| Updated on: Jun 12, 2026 | 4:39 PM
Share

snakes shedding skin: देशात विविध प्रजातींचे साप आढळतात. काही साप विषारी तर काही बिनविषारी असतात. साप दिसला की अनेकांची भांबेरी उडते. त्यामागे अर्थातच सापाविषयी असलेले गैरसमज आहे. साप दिसला की अगोदर त्याला मारायला सगळे धावतात. सापाने कात टाकली तर तो हिंसक, आक्रमक होतो असाही एक समज आहे. वर्षभरातून साप हा 6 ते 8 वेळा कात टाकतो. उन्हाळ्यात तर तुम्हाला शेताच्या बांधावर, खळ्यावर अथवा ओढ्याच्या ठिकाणी, एखाद्या वारुळाजवळ सापाची कात दिसते. कात टाकणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.

कात टाकणे म्हणजे काय?

साप कात टाकतो म्हणजे त्याची जुनी त्वचा टाकून देतो. या प्रक्रियेला Ecdysis असेही म्हणतात. साप हा सरपटणारा प्राणी आहे. त्याची त्वचा लवचिक नसते. शरीर जसे वाढते तशी त्वचा वाढतेच असे नाही. सापाला झाडीझुडपातून जाताना खरचटते. शरीरावर जखमा होतात. अशावेळी काही दिवसांनी तो कात टाकतो. त्यामुळे त्याला चपळाईने पुढे जाण्यास मदत मिळते.

मादीला आकर्षिक करण्यासाठी साप कात टाकतात असं म्हटलं जातं. पण ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जखमा बऱ्या करण्यासाठी निसर्गाने सापाला हे एक वरदान दिले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर कात टाकल्यावर साप अधिक चमकदार आणि चपळ होतो. त्याला शिकाऱ्यापासून वाचण्यासाठी जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी मदत मिळते. तर डेड स्कीन बाजूला हटल्यावर त्याला चपळाईने पुढे सरकता येते. शिकार करता येते. त्याला हा मोठा फायदा होतो.

कात टाकल्यावर साप हिंसक होतो का?

कात टाकल्यावर साप अधिक चपळ होतो. तो चपळ होतो. त्यामुळे अचानक जर त्याच्या जवळ कुणी आले तर तो हल्ला करतो. एकदा कात टाकली की काही दिवसांनी तो शांत होतो. तो पुन्हा लपण्याची जागा शोधतो. पण कात टाकण्याची प्रक्रिया सुरू असताना त्याची नजर कमजोर होतो. त्याला समोरचे व्यवस्थित दिसत नाही. अशावेळी साप थोड्याशा हालचालीने अलर्ट होतो. तो हिंसक होतो. अशावेळी तुम्ही शेतात वावरताना अथवा अडगळीच्या ठिकाणी काम करताना सतर्क राहणे आवश्यक असते.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा