AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला ताप आहे का? तुमचा ताप डेंग्यू किंवा इतर व्हायरल आहे हे कसे ओळखावे?, वाचा! 

हवामान बदलत आहे, अजूनही अनेक शहरांमध्ये पाऊस पडत आहे. या बदलत्या वातावरणामुळे डेंग्यूचा धोकाही अधिक वाढला आहे. दिल्ली, महाराष्ट्र,पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. अनेक रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.

तुम्हाला ताप आहे का? तुमचा ताप डेंग्यू किंवा इतर व्हायरल आहे हे कसे ओळखावे?, वाचा! 
| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 6:45 PM
Share

मुंबई : हवामान बदलत आहे, अजूनही अनेक शहरांमध्ये पाऊस पडत आहे. या बदलत्या वातावरणामुळे डेंग्यूचा धोकाही अधिक वाढला आहे. दिल्ली, महाराष्ट्र,पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. अनेक रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. सरकारकडून अनेक आवश्यक पावले उचलली जात आहेत. डेंग्यू बद्दल सर्वांना माहित आहे की, डासं चावल्यानंतर डेंग्यूची लागण होते. (Special tips to identify dengue fever)

डेंग्यूची लागण टाळण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्नही केले जातात. परंतु, बऱ्याचदा लोक डेंग्यू आणि सामान्य तापामध्ये फरक करू शकत नाहीत आणि स्थिती अनियंत्रित होते. डेंग्यूच्या तापाला अनेक वेळा सामान्य ताप मानला जातो आणि त्यावर उपचार घेतला जात नाही. ज्यामुळे समस्या वाढते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की डेंग्यू ताप आणि सामान्य तापामध्ये फरक कसा ओळखायचा.

डेंग्यू कसा होतो?

प्रत्येक डास चावल्यानंतर डेंग्यू होत नाही. माजा एडीस डास चावल्यानंतरच डेंग्यू होतो. सोप्या शब्दामध्ये सांगायचे झाले तर ज्या डासांवर पांढरे टिपके असतात, ते डास डेंग्यूचे असतात. तसेच या डासांच्या पायावर पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात, ते देखील डेंग्यूचे डास असतात. असे मानले जाते की, हे डास अनेकदा प्रकाशात चावतात आणि ते सकाळी चावण्याची अधिक शक्यता असते. अनेक अहवालांमध्ये हे उघड झाले आहे की माजा एडीस डास फार उंच उडू शकत नाही आणि केवळ मानवाच्या गुडघ्यापर्यंत येऊ शकतो.

डेंग्यू ताप आहे की नाही हे कसे जाणून घ्यावे?

डेंग्यू डास चावल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी डेंग्यू तापाची लक्षणे दिसू लागतात. डेंग्यूमध्ये डोळे तापाने लाल होतात आणि रक्त कमी होते. काही लोक चक्कर आल्यामुळे बेशुध्द होतात. सीनियर सीटिजन स्पेशलिस्ट डॉक्टर रिशव बंसल म्हणतात की, ‘जर या हंगामात कोणाला ताप, सर्दी आणि  शरीर दुखत असेल तर त्यांनी शक्य तितक्या लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच, प्लेटलेट्स तपासल्या पाहिजेत. ताप आल्यामुळे एक किंवा दोन दिवस घरगुती औषध घेणे चुकीचे आहे. शक्यतो ताप आल्याबरोबर डॉक्टरांशी संपर्क साधा.

दोन्ही तापांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे

जर साध्या तापामध्येही काळजी घेतली गेली नाही तर तो ताप मेंदूपर्यंत जातो आणि घातक ठरू शकते. डेंग्यू तापामध्ये, शरीरातील रक्तातून प्लेटलेट झपाट्याने कमी होऊ लागतात. यातून होणारा धोका सामान्य तापापेक्षा कित्येक पटीने जास्त असतो. डेंग्यूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमकुवत होते आणि रुग्ण खूप कमकुवत होतो. अशा परिस्थितीत, जेव्हा डेंग्यू तापामध्ये प्लेटलेट्स कमी होतात. त्यावेळी तेही धोकादायक आहे.

संबंधित बातम्या : 

एका दिवसांत आपण किती शब्द बोलता माहितीये? जाणून घ्या याबद्दलची रंजक माहिती…

Fact Check | खरंच उत्तर प्रदेशचे विभाजन होणार ? केंद्र सरकारची भूमिका काय ?

(Special tips to identify dengue fever)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.