AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीच्या दिवसात नदी आणि समुद्रातून धूर का येतो बाहेर? ‘हे’ आहे त्यामागील कारण!!

What is sea smoke : थंडीच्या दिवसात अनेकदा नदी, तलाव आणि समुद्रातील पाण्यावर आपल्याला मोठ्या प्रमाणात वाफ किंवा गॅसची चादर पसरलेली पाहायला मिळते. हे नेमके का तयार होते? तर याचा संबंध वातावरणाशी निगडीत आहे. आज पाण्यावर वाफ का तयार होते याबद्दलची जाणून घेणार आहोत...

थंडीच्या दिवसात नदी आणि समुद्रातून धूर का येतो बाहेर? 'हे' आहे त्यामागील कारण!!
Sea Smoke (Youtube)
| Updated on: Jan 14, 2022 | 1:57 PM
Share

थंडीच्या दिवसात अनेकदा नदी, तलाव आणि समुद्रातील पाण्यावर आपल्याला मोठ्या प्रमाणात वाफ किंवा गॅसची विशिष्ट अशी चादर पसरलेली पाहायला मिळते. आपल्यापैकी अनेकांनी हे दृश्य पाहिले असेल परंतु कधी असा विचार केला आहे का हे दृश्य नेमके का तयार होते हे त्यामागील कारण आहे का? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, की या सर्वांचा संबंध वातावरणाशी निगडीत आहे. द कंवर्सेशन यांच्या रिपोर्टनुसार पाण्याचे एकंदरीत तीन रूपे असतात. एक स्थायू बर्फ (Solid Ice), द्रव्य (Liquid Water) आणि बाष्प (Gaseous Water Vapor). या तिसऱ्या पाण्याचे उपयोग आपल्याला प्रामुख्याने थंडीच्या दिवसांमध्ये पाहायला मिळते आणि म्हणूनच वातावरणामध्ये अनेकदा आपल्याला धुके पसरलेले पाहायला मिळते तसेच समुद्र, नदी, तलाव यांच्या पृष्ठभागावरसुद्धा धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळते.

नेमके असे का होते? रिपोर्टनुसार थंडीच्या दिवसात नदी आणि समुद्राचे पाणी फ्रीझिंग पॉइंटपेक्षा जास्त थंड होऊ शकत नाही. म्हणून समुद्राच्या पृष्ठभागावर थंड हवेच्या तुलनेमध्ये गरम राहते. हे थंड पाणी गरम वातावरणाच्या दरम्यानच भरपूर मात्रात पाण्याचे वाफ बनून त्याचे बाष्पीभवन होते. हे पाणी आपल्याला लांबून पाहिल्यावर वाफेसारखे म्हणजे धुरासारखे दिसते.

थंडीच्या दिवसांमध्ये जेव्हा वाफ पाण्याच्या पृष्ठभागावर पासून वरच्या दिशेने जाण्यास सुरुवात करते तेव्हा तेव्हा ही वाफ थंड हवेमध्ये मिसळते, असे झाल्यामुळेच हवेत वाफेच्या कणामुळे लहान लहान पाण्याचे थेंब जमा होऊन जातात यालाच आपण सी स्मोक म्हणजेच धूके असे म्हणतो. अशा पद्धतीने पाण्याच्या पृष्ठभागावर आपल्याला वाफेची चादर पसरलेली पाहायला मिळते.

रिपोर्टनुसार वाफेमुळे पाणी वरच्या दिशेने जाते. त्यामुळे मोठ्या जहाजांना याचा अजिबात फरक पडत नाही परंतु जी व्यक्ती जहाज चालवत असते, त्या व्यक्तीला या गोष्टींचा फरक मोठ्या प्रमाणात जाणवत असतो. कारण की या वाफेमुळे निर्माण झालेल्या धुक्यामुळे समोरील दृश्य अजिबात दिसत नाही. सी-स्‍मोकसाठी आर्कटिक आणि अंटार्कटिक हे दोन्ही प्रदेश प्रामुख्याने ओलखले जातात.

हिवाळ्याच्या दिवसात पाण्याच्या पृष्ठभागावर दिसणाऱ्या वाफेला फ्रॉस्‍ट स्‍मोक किंवा स्‍टीम फॉग असे सुद्धा म्हणतात. जर पुढच्या वेळी तुम्हाला नदी तलाव किंवा समुद्राच्या पृष्ठभागावर जर फ्रॉस्‍ट स्‍मोक दिसला तर अशावेळी समजुन जा की हे सारे कमी तापमानामुळे झालेल्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळे घडत आहे जे वाफेच्या रूपामध्ये बाहेर पडत आहे.

वर्तमानपत्र वाचताना पानावर वेगवेगळ्या रंगाचे असणारे चार डॉट कधी पाहिलेत का? त्यामागे लपला आहे “हा” अर्थ!!

आगळीवेगळी परंपरा : येथे लग्न झाल्यानंतर तीन दिवस जोडप्यांना बाथरूममध्ये जाण्यास केली जाते बंदी!! कारण जाणून घ्याल तर व्हाल थक्क…

किस्से निवडणुकीचे: एका जागेसाठी हजार उमेदवार, आयोगाने बॅलेट पेपर नव्हे ‘बॅलेट बुकच’ छापले!

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.