गणेशमूर्तीची सोंड उजवीकडे असावी की डावीकडे; मूर्तीची सोंड कोणत्या बाजूला असणे शुभ?
घरात बाप्पाची मूर्ती आणताना किंवा कोणाला देताना ती मूर्ती डाव्या बाजूला सोंड असलेली असावी कि उजव्या बाजूला सोंड असलेली असावी हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. चला जाणून घेऊयात.

अनेकांच्या घरी बाप्पाचे आगमन झालेलं आहे. बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी जवळपास महिनाभर आधीच करायला घेतली जाते. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे की बाप्पाच्या मूर्तीची सोंड ही कोणत्या बाजूला असणे शुभ मानले जाते. कारण फक्त गणेत्सोवानिमित्तच नाही तर इतर वेळीही आपण एखादी छान मूर्ती दिसली म्हणून बाप्पाची मूर्ती घरी आणतो किंवा कोणाला तरी गिफ्ट म्हणून देतोच.
गणेशाच्या मूर्तीची सोंड कोणत्या दिशेला असावी?
अशा वेळी हे माहिती असणे फार गरजेचे असते की गणेशाच्या मूर्तीची सोंड कोणत्या दिशेला असावी? हे खूप महत्त्वाचे मानले जाते. काही लोक घरात डाव्या बाजूला सोंड असलेली मूर्ती ठेवतात, तर काहीजण मूर्तीची सोंड उजवीकडे असेल याला महत्त्व देतात. अशा परिस्थितीत प्रश्न असा पडतो की सोंड कोणत्या दिशेने असणे शुभ मानले जाते. चला जाणून घेऊया.
डाव्या बाजूला असलेली सोंड घरात मूर्ती स्थापनेसाठी सर्वात शुभ मानली जाते
गणेश मूर्तीची डाव्या बाजूला असलेली सोंड घरात मूर्ती स्थापनेसाठी सर्वात शुभ मानली जाते. कारण अशी मूर्ती शांती, आनंद आणि समृद्धी प्रदान करते असं म्हटलं जातं. तर उजवीकडे सोंड असलेली गणेशमूर्ती विशेषतः ध्यानासाठी असते. म्हणजे ध्यान करण्याचं ती प्रतिक मानली जाते.
उजव्या सोंडेची गणेश मूर्ती अधिक जागृत आणि सिद्ध मानली जाते
उजव्या सोंडेची गणेश मूर्ती अधिक जागृत आणि सिद्ध मानल्या जातात, त्यांची पूजा करण्यासाठी विशेष विधी आणि योग्य पूजा आवश्यक असते, अन्यथा त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. म्हणून, घरात उजव्या सोंडेच्या गणेशाची मूर्ती ठेवणे शक्यतो टाळावे.
डाव्या बाजूला सोंड असलेली गणेश मूर्ती इच्छा पूर्ण करते.
डाव्या बाजूला सोंड असलेली गणेशमूर्ती भक्तांना भौतिक मार्गातील अडथळे दूर करण्यास मदत करते. तसेच, ही मूर्ती समृद्धी आणते ज्यामुळे जीवनात आनंद, समृद्धी आणि शांती येते. याशिवाय, डाव्या बाजूला सोंड असलेली गणेश मूर्ती इच्छा पूर्ण करते.
उजव्या बाजूला सोंड असलेल्या मूर्तीची पूजा करण्यासाठी खूप नियम
उजव्या बाजूला सोंड असलेली मूर्ती “दक्ष” किंवा “जाग्रत” मानली जाते. तिची पूजा करण्यासाठी खूप विधी आणि पूर्ण ज्ञान आवश्यक असते, अन्यथा त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. अशा मूर्तीची पूजा सहसा ब्राह्मणच करतात.
त्यामुळे तुम्हाला कोणत्या कारणाने गणेश मूर्ती आणायचीच असेल तर ती डाव्या बाजूला सोंडी असलेली मूर्ती आणावी. आणि कोणाला देतानाही याची काळजी घ्यावी.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )
