प्रवासी विमानाचा रंग पांढरा का असतो? जाणून घ्या त्यामागील कारण

विमान कंपन्यांना असे वाटले की विमानाचा रंग जितका गडद असेल, तितके त्याचे वजन होईल. याशिवाय पांढरा रंग सूर्याच्या किरणांना योग्यरित्या परावर्तित करू शकतो. विमानाचे आयुष्य वाढवण्यासाठीही ते उपयुक्त ठरले.

प्रवासी विमानाचा रंग पांढरा का असतो? जाणून घ्या त्यामागील कारण
प्रवासी विमानाचा रंग पांढरा का असतो? जाणून घ्या त्यामागील कारण
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 2:57 PM

नवी दिल्ली : जेव्हाही तुम्ही विमानात बसता तेव्हा तुमच्या मनात अनेकदा प्रश्न येतो की ही प्रवासी विमाने नेहमी पांढऱ्या रंगाची का असतात? तुम्ही प्रवासी विमान कधीही इतर कोणत्याही रंगात पाहिले नसेल. प्रत्येक विमान कंपनी आपली प्रवासी सेवा देण्यासाठी पांढऱ्या रंगाचेच विमान निवडते. याचे कारण, हे आज आम्ही तुम्हाला याठिकाणी सांगू इच्छितो. या प्रश्नाचे उत्तर कोरा नावाच्या वेबसाईटवर लाशी स्मिथने दिले आहे. स्मिथ एअरबसशी संलग्न असून तिचे लेख लोकांना खूप आवडतात.

एकेकाळी काळी विमाने होती!

लाशीने दिलेले कारण खूप मनोरंजक आहे. आज तुम्हाला पांढऱ्या रंगाची विमाने दिसतात. पण एकेकाळी विमानांचा रंग काळा असायचा. पांढऱ्या रंगाचे विमान अतिशय असामान्य मानले जायचे. लाशीने लिहिले आहे की, पूर्वीच्या काळात ‘पॅन’ अमेरिकन एअरलाइन्ससारख्या अनेक विमान कंपन्या धातूपासून बनवलेल्या काळ्या रंगाच्या विमानांची निवड करीत असत. त्यावर दुसरा कोणताही रंग नसायचा. आज अशी विमाने दिसत नाहीत. आज या विमानांना पूर्णपणे सेवेतून बाहेर करण्यात आलेले नाही, असेही लाशीने नमूद केले आहे.

या कारणामुळे निवडले गेले मॅटेलचे विमान

पांढऱ्याऐवजी मॅटेलचे विमान का निवडले गेले? यावरही लाशीने उत्तर दिले आहे. तिने याबाबत म्हटले आहे की ‘हे असे होते कारण जर विमानात काहीतरी तुटले किंवा क्रॅक दिसला तर ते पेंट केलेल्या विमानावर सहज दिसणार नाही. पण जर मॅटेलच्या विमानात चढताना काही अडचण आली तर ते समजणे सोपे होईल व नंतर ती अडचण सोडवता येईल. या विमानांना काही काळानंतर विमान कंपन्यांनी सेवेतून बाहेर काढले जाते. त्यानंतर मॅटेलच्या विमानाची जागा पांढऱ्या रंगाच्या विमानाने घेतली. स्मिथच्या मते, पांढऱ्या रंगापेक्षा काळ्या रंगाची किंमत खूप जास्त होती.

सूर्यप्रकाशात स्पष्टपणे दृश्यमान

जर धातूचे विमान काळ्या रंगाने रंगवले गेले असेल तर भरपूर पेंट खर्च होईल. तसेच असे केल्याने विमानाचे वजन देखील वाढेल. बोईंग 747 सारखे विमान रंगविण्यासाठी कित्येक किलो रंग लागेल आणि नंतर त्याचे वजन सुमारे 250 किलोग्रॅमपर्यंत वाढेल. विमान कंपन्यांना असे वाटले की विमानाचा रंग जितका गडद असेल, तितके त्याचे वजन होईल. याशिवाय पांढरा रंग सूर्याच्या किरणांना योग्यरित्या परावर्तित करू शकतो. विमानाचे आयुष्य वाढवण्यासाठीही ते उपयुक्त ठरले. जिथे बाकीचे रंग उडून जातात, तिथे पांढरा रंग हलका होत नाही.

काही विमान कंपन्यांची रंगीत विमाने

स्मिथने असेही लिहिले आहे की प्रत्येक विमान पांढरे असणे आवश्यक नाही. आजही नेदरलँडच्या केएलएम नॅशनल एअरलाइन्सने आपल्या विमानाचा वरचा भाग फिकट निळ्या रंगाने रंगवला आहे. तसेच साऊथवेस्ट एअरलाईन ही जगातील सर्वात जुनी आणि बजेट एअरलाईन आहे. ही एअरलाईन नेहमी सोनेरी, निळा आणि लाल रंगाने उड्डाण करते. साऊथवेस्टची सुरुवात 1967 साली झाली होती.

इतर बातम्या

कोरोनाची तिसरी लाट कधी येणार?; सतेज पाटील यांनी केलं मोठं विधान!

“मंदिर बंद, उघडले बार; उद्धवा धुंद तुझे सरकार”, नवी मुंबईत भाजपचे शंखनाद आंदोलन

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.