ONION | कांदा डोळ्यांत पाणी का आणतो? जाणून घ्या यामागील गुपित

देशाच्या कानाकोपऱ्यात कांद्याचे पकौडेसुद्धा बनवले जातात व त्यांना चांगली मागणीही आहे. मात्र हा कांदा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणीही आणतो. (Why does onion bring tears to the eyes, know the secret behind this)

ONION | कांदा डोळ्यांत पाणी का आणतो? जाणून घ्या यामागील गुपित
कांदा डोळ्यांत पाणी का आणतो? जाणून घ्या यामागील गुपित
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 4:58 PM

मुंबई : कांदा हा प्रत्येक घरात आढळतोच. कुठल्याही घरात कांदा हा सहजपणे मिळतो. जर कुठल्याही भाजीत कांदा टाकला नसेल तर त्या भाजीला तितकी चांगली चव लागत नाही. त्यामुळे जेवण बनवताना कांदा नसेल तर गृहिणीचा हात चालणारच नाही, असे म्हटले जाते. आपल्या देशात बनणाऱ्या बहुतांश भाज्यांमध्ये कांदा हमखास टाकला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यात कांद्याचे पकौडेसुद्धा बनवले जातात व त्यांना चांगली मागणीही आहे. मात्र हा कांदा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणीही आणतो. अर्थात जेवणासाठी कांदा कापत असताना शेजारी असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यांत पाणी येतेच. (Why does onion bring tears to the eyes, know the secret behind this)

कांदा डोळ्यांत पाणी का आणतो?

कांद्याचे काही प्रकार आहेत. मात्र डोळ्यांत पाणी आणण्याचा गुणधर्म सर्व कांद्यांच्या प्रकारांमध्ये सारखाच आहे. काही कांदे डोळ्यांमध्ये अधिक पाणी आणतात, काहींमुळे कमी प्रमाणात पाणी येते. पण हे असे का घडते, याचा तुम्ही कधी विचार केला आहात का? आज आम्ही तुम्हाला याबाबतच महत्त्वाची माहिती देणार आहोत. अर्थात कांद्यामध्ये नेमकी कुठली तत्वे आहेत, ज्यामुळे मनुष्याच्या डोळ्यांत पाणी आणले जाते.

कांद्यामध्ये असते विशेष प्रकारचे केमिकल

कांदा भले डोळ्यांत पाणी आणत असेल म्हणून आपण कांद्याचा जेवणातील वापर टाळत नाही. कांद्यामध्ये सायन-प्रोपेंथियल-एस-ऑक्साईड नावाचे एक केमिकल असते, याच केमिकलमुळे कांदा आपल्याला रडवतो अर्थात डोळ्यांत पाणी आणतो.

लेक्राइमेट्री-फॅक्टर सिंथेस एन्जाइम आहे जबाबदार

कांदा चिरताना हेच केमिकल बाहेर येते, त्यामुळे आपल्या डोळ्यांच्या लेक्राइमल ग्लॅण्डवर परिणाम करण्यास सुरुवात होते. याच कारणामुळे आपल्या डोळ्यांतून पाणी यायला सुरुवात होते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी आमचे संशोधक आधी एंजाइमला कारण मानत होते, परंतु आता कांद्यामध्ये लेक्राइमेट्री- फॅक्टर सिंथेस नावाचा नवीन एंजाइम आढळला आहे. कांदा कापताना लेक्राइमेट्री-फॅक्टर सिंथेस एंजाइम बाहेर पडतो व तोच आपल्या डोळ्यांच्या संपर्कात येतो. याचाच परिणाम म्हणून आपल्या डोळ्यांतून अश्रू गळायला सुरुवात होते.

आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे कांदा

कांदा आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे. कांद्यामध्ये अनेक प्रकारचे औषधीय गुण असतात. तसेच हा कांदा पोषक तत्त्वे, व्हिटॅमिन आणि खनिजने समृद्ध असतो. एवढेच नव्हे तर कांद्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नीशियम, सोडियम, पोटेशियम, सेलेनियम, फॉस्फोरस, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिान बी 6 आणि फायबरदेखील असतात. ही तत्त्वे आपल्या शरिरासाठी, आरोग्यादासाठी अत्यंत लाभदायी आहेत. (Why does onion bring tears to the eyes, know the secret behind this)

इतर बातम्या

केंद्र सरकारकडून गव्हाची विक्रमी खरेदी, 43 लाख शेतकऱ्यांना 80 हजार कोटी मिळाले

भ्रष्ट कारभारावर नाराजी व्यक्त करीत इसमाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी घेतले ताब्यात

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.