AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या ‘या’ धरणाला पाकिस्तान इतका का घाबरतो?

भारताने पाकविरुद्ध कारवाई करत अनेक धरणाचे दरवाजे बंद केल्याने पाकिस्तान चिंताग्रस्त आहे. सिंधू पाणी कराराच्या पार्श्वभूमीवर एक असं धरण आहे जे फार महत्त्वाचं आहे. पण एक धरण असं आहे यामुळे पाकिस्तानवर खूप मोठं संकट येईल त्यामुळे पाकिस्तानला या गोष्टीची चिंता अजूनही आहे. पण पाकिस्तान या धरणाला इतकं का घाबरतं?

भारताच्या 'या' धरणाला पाकिस्तान इतका का घाबरतो?
Baglihar DamImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 07, 2025 | 4:34 PM
Share

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’ ने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच त्याआधी भारताने पाकिस्तानवर अनेक कठोर कारवाई देखील केली होती. जसं की, पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित केला. त्यानंतर पाकिस्तान अशी भीती व्यक्त करत आहे की भारत पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह वळवू शकतो.

दरम्यान एका वृत्तानुसार असा एक व्हिडीओ समोर आला आहे की, जम्मूमधील रामबन येथील चिनाब नदीवर बांधलेल्या बगलिहार धरणाचे सर्व दरवाजे बंद असलेले दिसत आहेत. एका वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, सिंधू पाणी करार स्थगित झाल्यानंतर पहिल्यांदाच भारतानं या करारांतर्गत धरणावर काही काम सुरू केलं आहे. भारत उत्तर काश्मीरमधील झेलम नदीवर बांधलेल्या किशनगंगा धरणाचे दरवाजे अशाच प्रकारे बंद करण्याची योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे. आणि पाकिस्तान याच बगलिहार धरणाराला घेऊन चिंता व्यक्त करताना दिसत आहे.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अलीकडेच असं म्हटलं होतं की, जर भारतानं पाकिस्तानात येणाऱ्या पाण्याची दिशा रोखण्याचा किंवा बदलण्याचा प्रयत्न केला तर ते युद्ध मानलं जाईल. तसेच यामुळे देशातील लोक उपासमारीनं किंवा तहानेनी मरू शकतात. असही ते म्हणाले होते.

बगलिहार धरणाचं महत्त्व?

1960 मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू पाणी करार झाला. या कराराअंतर्गत, सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या वापराबद्दल दोन्ही देशांमध्ये एक करार झाला. बगलिहार धरण हे बऱ्याच काळापासून दोन्ही शेजारी देशांमधील वादाचा मुद्दा आहे. पाकिस्ताननं यापूर्वी या प्रकरणात जागतिक बँकेच्या हस्तक्षेपाची मागणी केली होती आणि काही काळ जागतिक बँकेनंही या प्रकरणात मध्यस्थी केली होती. याशिवाय, पाकिस्ताननं किशनगंगा धरणाबाबतही आक्षेप घेतला आहे आणि त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

‘बगलिहार हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट’

मुख्य म्हणजे हे दोन्ही धरणं जलविद्युत आहेत, यापासून वीज निर्मिती होते. बगलिहार धरणाच्या जलाशयात 475 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. तसेच त्याची वीज निर्मिती क्षमता 900 मेगावॅट आहे. धरणातून वीज निर्मिती करण्याच्या या जलविद्युत प्रकल्पाला ‘बगलिहार हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट’असं नाव देण्यात आलं आहे.

एका अहवालात म्हटल्याप्रमाणे नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनच्या एका अधिकाऱ्याला सांगण्यात आलं आहे की, जलाशयातील गाळ काढण्यासाठी दरवाजे बंद करण्यात आले होते. त्यामुळेच पाकिस्तानकडं जाणारा पाण्याचा प्रवाह 90 टक्क्यांनी कमी झाला आहे. किशनगंगा धरणाबाबतही असंच करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

मे ते सप्टेंबर या काळात उत्तर भारतातील धरणांच्या जलाशयांमध्ये जास्तीत जास्त पाणी भरलं जातं, कारण याच काळात पावसाळा येतो. आता बगलिहार जलाशयात पाणी भरण्याच्या प्रक्रियेला ऑगस्ट महिन्यापेक्षा खूप जास्त वेळ लागणार आहे असही म्हटलं आहे.

पाकिस्तानला धरणाबद्दल नेमकी कशाची भीती आहे?

चिनाब ही सिंधू पाणी करारातील पश्चिमेकडील नद्यांपैकी एक आहे. या करारामुळे शेती, घरगुती आणि वीज निर्मितीसाठी पाण्याचा वापर करण्यास परवानगी मिळते. मात्र, पाकिस्तान 1992 पासून बगलिहार धरणावर आक्षेप घेत आहे. या धरणाबाबत करार करण्यासाठी जागतिक बँकेच्या मध्यस्थीखाली दोन्ही देशांमध्ये अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या.

धरणाचे दरवाजे बंद झाले पाकिस्तानची दुर्दशा 

पाकिस्तानाच्या म्हणण्यानुसार जर भारतातून पाणी येत असेल तर भारत पाण्याच्या तुटवड्यादरम्यान ते पाणी थांबवू शकतं आणि जास्त पाणी असल्यास ते कधीही सोडू शकतं. तर भारताने यावर दिलेलं उत्तर म्हणजे पाकिस्तानची ही भीती दूर करण्यासाठी भारत काहीही करू शकत नाहीत.यावर अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या पण दोन्ही देशांमधील मतभेद कायम राहिले. त्यामुळे आता या धरणाचे दरवाजे बंद झाले तर पाकिस्तानची सर्वबाजूंनी दुर्दशा होईल अशी परिस्थिती आहे.

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...