AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या पहिल्या रात्रीलाच सुहागरात का म्हणतात? लॉजिक काय? 101 टक्के लोकांनाही माहीत नाही

'सुहागरात' हा शब्द आपल्यापैकी बहुतांश लोकांनी ऐकलाच असेल आणि त्याचा अर्थ काही लोकांना माहीतही असेल. पण त्याचा खरा अर्थ काय हे फारचं कमी लोकांना माहीत असेल. सुहागरातचा खरा अर्थ आणि त्याचं लॉजिक या आर्टिकलमध्ये जाणून घेऊया

लग्नाच्या पहिल्या रात्रीलाच सुहागरात का म्हणतात? लॉजिक काय? 101 टक्के लोकांनाही माहीत नाही
लग्नाच्या पहिल्या रात्रीलाच सुहागरात का म्हणतात ?Image Credit source: social media
| Updated on: Aug 26, 2025 | 4:17 PM
Share

लग्न.. आयुष्यातला हा एक असा टप्पा, असा प्रसंग ज्याबद्दल प्रत्येक व्यक्ती व्यक्ती,मुलगा असो की मुलगी ते स्वप्न रंगवतात. त्यामुळे आयुष्यात खूप मोठा बदल होतो. आपल्याकडे लग्न हे एक जन्माचं नव्हे तर सात जन्मांचं बंधन मानलं जातं. हे नातं दोन लोकांना एकत्र आणतं, त्यांना आयुष्यभरासाठी एकत्र नात्यात बांधतं. सुख, दु:ख, प्रगति, आनंद, वाईट काळ, सगळ्यात पती-पत्नीच एकमेकांना खंबीरपणे साथ देतात. लग्न ठरलं की ते लागून घरी जाईपर्यंत अनेक विधी, परंपरा असतात. मात्र त्यातील काही रिती अशा असतात ज्याबद्दल आपण जाणतो, पण त्याचा खरा अर्थ फार कमी लोकांना माहीत असतो.

लग्नानंतर असाच एक विधी म्हणजे सुहागरात… सुहागरात म्हणजे काय याची बऱ्याच लोकांना कल्पना असेल , त्याचा अर्थही काहींना ज्ञात असेल, पण त्याचा खरा अर्थ, आणि त्यामागचं कारण हे फारच कमी लोकांना माहीत असेल. या लेखात आपण सुहागरातचा खरा अर्थ आणि त्याचं लॉजिक जाणून घेऊया..

सुहागरात म्हणजे काय, काय आहे खरा अर्थ ?

आपल्यापैकी अनेकांनी ‘सुहागरात’ हा शब्द ऐकला आहे आणि अनेकांना त्याचा अर्थ माहित असेल, परंतु बऱ्याच लोकांना त्याचा खरा अर्थ माहित नसेल. ही विशेष रात्र मानली जाते कारण ती वधू-वरांची पहिली रात्र असते. मुलगा असो की मुलगी, दोघांनाही, आपल्या जोडीदाराला समजून घेण्याची इच्छा असते. आणि सुहागरात यावेळी त्यांना एकमेकांना जवळून समजून घेण्याची आणि त्यांचे कौटुंबिक जीवन सुरू करण्याची संधी या रात्री मिळते, तिथपासून त्यांची, त्यांच्या नात्याची नवी सुरूवात होते.  पण याला सुहागरात असंच का म्हणतात? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ?

लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीला सुहागरातच का म्हणतात ?

खरंतर सुहागरात या शब्दाचा अर्थ संस्कृत शब्दापासून आला आहे. तो सौभाग्य या शब्दाशी संबंधित आहे जो सुहागचा उगम मानला जातो. सुहाग आणि सुहागन हे दोन्ही शब्द विवाहित महिलेसाठी किंवा तिच्या संदर्भात वापरले जातात.  लग्नानंतर महिलांना सुहागन म्हणजेच सौभाग्यवती असं म्हटलं जातं आणि मंगळसूत्र, बांगड्या, चुडा, सिंदूर, पैंजण, जोडवी असे सौभाग्याशी निगडीत अनेक दागिने त्या महिला घालतात. पतीचे आयुष्य वाढवण्यासाठी त्या हे दागिने परिधान करतात असं म्हटल जातं.  त्यामुळेच, सुहागन, म्हणजेच सौभाग्यवती स्त्रीच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीला सुहागरात म्हणतात.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.