चंद्रपुरात मालगाडीच्या धडकेत 11 रानडुकरांचा मृत्यू, वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल

चंद्रपूर जिल्ह्यात मालगाडीच्या धडकेमुळे 11 रानडुकरांचा मृत्यू झाला (Thig pig death in Chandrapur) आहे.

चंद्रपुरात मालगाडीच्या धडकेत 11 रानडुकरांचा मृत्यू, वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल
Follow us
| Updated on: Jun 19, 2020 | 1:12 PM

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मालगाडीच्या धडकेमुळे 11 रानडुकरांचा मृत्यू झाला (Thig pig death in Chandrapur) आहे. ही घटना आज (19 जून) सकाळी पहाटे साडे पाच वाजता चंद्रपुरातील मुल शहराजवळ घडली. घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले (Thig pig death in Chandrapur) आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट जंगलामधून जाणाऱ्या चांदाफोर्ट- गोंदिया रेल्वेमार्गावर हा अपघात झाला आहे. आज सकाळी बल्लारपूर मार्गे गोंदियाकडे जाणाऱ्या  मालगाडीच्या पुढ्यात रानडुकले आल्याने हा अपघात झाला. या अपघातात 11 रानडुकरांचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली.

मुल शहराजवळ या मालगाडीने रानडुकरांना धडक दिली. चंद्रपूर शहरातील दुसरे रेल्वेस्थानक असलेल्या चांदाफोर्ट येथून एक महत्त्वाचा रेल्वे मार्ग गोंदिया-जबलपूरकडे जातो. याच रेल्वेमार्गावर मूल शहराजवळ असलेल्या घनदाट जंगलाच्या परिसरात ही घटना घडली.

सध्या प्रवासी रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे या मार्गावरून गाड्यांची वारंवारिता कमी आहे. केवळ मालवाहतूक करणाऱ्या गाड्या या भागातून जात आहेत. आज सकाळी बल्लारपूर मार्गे गोंदियाकडे जाणाऱ्या रेल्वे मालगाडीच्या पुढ्यात अचानक रानडुकरे आल्याने त्यांना जीव गमवावा लागला.

रानडुकर हे चपळ असतात. अत्यंत चपळ असलेल्या रानडुकरांचा रेल्वेगाडीच्या धडकेत मृत्यू कसा झाला याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे. वनविभागाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले असून रानडुकरांना पुरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

संबंधित बातम्या :

चंद्रपूर कोरोना नियंत्रण कक्षातच नियमांची पायमल्ली, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत डॉक्टरच्या लग्नाचा वाढदिवस

Nagpur Breaking | चंद्रपूर आणि गडचिरोलीचे मजूर स्पेशल ट्रेनने लखनौकडे रवाना

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.