नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात, 14 भाविक गंभीर जखमी

नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात, 14 भाविक गंभीर जखमी

चंदन पुजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : भाविकांच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात 14 जण गंभीररित्या जखमी आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील महीरावणी येथे ही घटना घडली. या अपघातातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर जखमींमध्ये चार बालकांचा देखील समावेश आहे. टेम्पो ट्रॅव्हलर आणि कोंबड्या वाहून नेणारी गाडी यांच्यात हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातातील भाविक उत्तर प्रदेशातील होते.

त्र्यंबकेश्वर येथून दर्शन आटोपून परतीच्या प्रवासाला निघालेल्या भाविकांच्या गाडीचा संदीप फाउंडेशन जवळ महीरावणी पाड्यानजीक हा अपघात घडला. यात 14 भाविक गंभीर जखमी झाले आहेत.

दुपारी 5 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. टेम्पो ट्रॅव्हलर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो ट्रॅव्हलर उलटला. त्यानंतर समोरून येणाऱ्या गाडीला जाऊन धडकली.

यावेळी ट्रॅव्हलरमध्ये एकूण 20 भाविक होते. त्यापैकी 14 भाविक जखमी झाले असून इतरांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. टेम्पो चालकाची प्रकृती चिंताजनक आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI