AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहुप्रतीक्षित 2021 Jeep Compass SUV फेसलिफ्ट 7 जानेवारीला लाँच होणार

जीप कंपनी जीप कंपास फेसलिफ्ट (Jeep Compass facelift) ही एसयूव्ही 7 जानेवारी 2021 मध्ये लाँच करणार आहे.

बहुप्रतीक्षित 2021 Jeep Compass SUV फेसलिफ्ट 7 जानेवारीला लाँच होणार
| Updated on: Jan 03, 2021 | 11:13 AM
Share

मुंबई : जीप कंपनी (Jeep) जीप कंपास फेसलिफ्ट (2021 Jeep Compass facelift) ही एसयूव्ही 7 जानेवारी 2021 मध्ये लाँच करणार आहे. सोबतच कंपनीने या एसयूव्हीचा पहिला टीझरदेखील जारी केला आहे. काही ठराविक शहरांमध्ये डीलर्सनी या कारसाठी प्री-बुकिंगला सुरुवात केली आहे. कंपास फेसलिफ्टच्या इंटरनॅशनल डेब्यूनंतर अवघ्या काहीच दिवसात ही शानदार कार लाँच केली जात आहे. (2021 Jeep Compass SUV facelift is going to launch in India on January 7, check its features)

आकर्षक डिझाईनची सर्वांना भुरळ

या गाडीच्या नव्या आकर्षक डिझाईनने अनेकांना भुरळ घातली आहे. डिझाईनसह शानदार इंटिरियर आणि एक्सटिरियरमुळे अनेकजण या कारच्या लाँचिंगची वाट पाहात आहेत. स्टाईलिंगच्या बाबतीत जीप कंपासमध्ये रिवाइज्ड हेडलाईट्स देण्यात येतील, जे इंटीग्रेटेड LED DRLs आहेत. सोबतच या कारमध्ये तुम्हाला 7 स्लेट ग्रील मिळतील जे हनीकॉम्बसारख्या इंसर्ट्ससह येतात. या कारमध्ये तुम्हाला नवीन फ्रंट बंपर मिळेल जो स्किड प्लेटस येतो. या SUV मध्ये तुम्हाला नवीन एलॉय व्हिल्स दिले जाणार आहेत.

नवं इंटिरियर

इंटिरियरबाबत बोलायचे झाल्यास या कारमध्ये तुम्हाला रिस्टाइल्स डॅशबोर्ड मिळेल जो 10.1 इंचांच्या टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह असेल. यामध्ये तुम्हाला नवीन एसी वेंट आणि HVAC कंट्रोलही मिळेल. नवीन टचस्क्रीन FCA यूकनेक्ट 5 इन्फोटेनमेंट सिस्टिमसह मिळेल. यामध्ये तुम्हाला अमेझॉन अॅलेक्सा सपोर्ट, एपल कार प्लेदेखली मिळेल.

इंजिन

कंपास फेसलिफ्ट इंटरनॅशनल मार्केटमध्ये नवीन इंजिनासह येणार आहे. या गाडीत तुम्हाला 2.0 लीटर डीझेल इंजिन मिळेल जे 173hp आणि 350nm टॉर्क जनरेट करतं. यामध्ये तुम्हाला 1.4 लीटरचं टर्बो पेट्रोल इंजिन दिलं आहे, जे 163 hp आणि 250nm टॉर्क जनरेट करतं. दोन्ही इंजिन 6 स्पीड मॅनुअल स्टँडर्डसह येतात. पेट्रोलमध्ये ग्राहकांना 7 स्पीड डुअल क्लच ऑटोमॅटिक ऑप्शन देण्यात आला आहे. तर डिझेलमध्ये नाइन स्पीड टॉर्क कनवर्टर ऑटो ऑप्शन दिला आहे.

टकसन आणि Karoq ला टक्कर

जीप कंपास फेसलिफ्ट ह्युंदाय टकसन आणि स्कोडा Karoq या दोन गाड्यांना भारतीय मार्केटमध्ये टक्कर देणार आहे. फेसलिफ्टमध्ये तुम्हाला ट्रेलहॉक वेरिएंटही देण्यात आलं आहे. जीप नवीन 7 सीटर SUV लाँच करण्याची तयारी करत आहे, जी थेट टाटा फॉर्च्युनर आणि फोर्ड Endeavour ला टक्कर देईल.

हेही वाचा

SUV सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालण्यास मारुती सुझुकी सज्ज, कंपनी पाच कार लाँच करण्याच्या तयारीत

Renault ची ‘ही’ कार ठरणार सर्वात स्वस्त?, किंमत बघून थक्क व्हाल

Christmas Discounts विसरा! ‘ही’ कार कंपनी देतेय तब्बल 7 लाखांचा बंपर डिस्काऊंट

(Heavily Updated Jeep Compass to be unveiled on 7 January 2021)

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.