AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भारतात 2030 पर्यंत 3 कोटी 40 लाख नागरिकांच्या नोकऱ्या जाणार’

भारतात 2030 पर्यंत जवळपास 34 मिलियन (3 कोटी 40 लाख) नागरिक आपल्या नोकऱ्या गमावतील. यामागे प्रमुख कारण ‘ग्लोबल वॉर्मिंग’ असेल, असा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) दिला आहे.

'भारतात 2030 पर्यंत 3 कोटी 40 लाख नागरिकांच्या नोकऱ्या जाणार'
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 04, 2019 | 4:40 PM
Share

नवी दिल्ली: भारतात 2030 पर्यंत जवळपास 34 मिलियन (3 कोटी 40 लाख) नागरिक आपल्या नोकऱ्या गमावतील. यामागे प्रमुख कारण ‘ग्लोबल वॉर्मिंग’ असेल, असा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) दिला आहे.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात जगभरात किती नोकऱ्या जाणार याचीही आकडेवारी दिली आहे. ‘वर्किंग ऑन अ वार्मर प्लेनेट: द इंपेक्ट ऑफ हीट स्ट्रेस ऑन लेबर प्रॉडक्टिविटी अँड डिसेंट वर्क’ असे या अहवालाचे नाव आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या प्रभावामुळे जगभरात जवळपास 80 मिलियन (8 कोटी) लोकांच्या नोकऱ्या जातील. यात एकट्या भारतात 3 कोटी 40 लाख नोकऱ्या जातील.

जागतिक तापमान वाढीमुळे नागरिकांच्या शारीरिक क्षमता कमी होतील. वातावरणात 35 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान आणि अधिक आद्रता असल्याने शारीरिक अशक्तपणा वाढेल, असेही नमूद करण्यात आले आहे. तापमान वाढीने काम करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. याच संस्थेने या शतकाच्या अखेरीस जागतिक तापमानात 1.5 अंश सेल्सिअस वाढ होईल, असेही सांगण्यात आले होते.

अहवालात म्हटले आहे, “तापमान वाढल्याने 2030 पर्यंत कामाच्या वेळेत सरासरी 2.2 टक्के घट होईल. म्हणजेच 8 कोटी नागरिकांच्या पूर्णवेळ नोकऱ्या जातील. म्हणजेच सरासरी 2,400 बिलियन डॉलरचे जागतिक नुकसान होईल. भारतात ग्लोबल वॉर्मिंगमुळे 2030 पर्यंत सरासरी 5.8 टक्के कामाच्या वेळेत घट होईल. याचाच अर्थ 3 कोटी 40 लाख नागरिकांच्या नोकऱ्या जातील.”

जागतिक तापमान या शतकाच्या शेवटी 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढणार नाही या अंदाजावरच संबंधित अहवाल असल्याचेही आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने नमूद केले आहे.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...