Nashik| नाशिकमध्ये कोरोनामुळे 2 दिवसांत 3 मृत्यू; सध्या 309 रुग्णांवर उपचार सुरू

Nashik| नाशिकमध्ये कोरोनामुळे 2 दिवसांत 3 मृत्यू; सध्या 309 रुग्णांवर उपचार सुरू
सांकेतिक फोटो

नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे 2 दिवसांत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात शनिवारी 11 डिसेंबर रोजी एकाचा आणि गुरुवारी 10 डिसेंबर रोजी दोघांचा मृत्यू झाला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Dec 12, 2021 | 12:16 PM

नाशिकः नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे 2 दिवसांत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात शनिवारी 11 डिसेंबर रोजी एकाचा आणि गुरुवारी 10 डिसेंबर रोजी दोघांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात 309 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 3 हजार 804 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 736 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण

उपचार सुरू असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 20, बागलाण 06, चांदवड 06, देवळा 03, दिंडोरी 11, इगतपुरी 05, कळवण 05, मालेगाव 02, नांदगाव 01, निफाड 37, सिन्नर 25, त्र्यंबकेश्वर 03, येवला 24 अशा एकूण 148 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 147, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 06 तर जिल्ह्याबाहेरील 08 रुग्ण असून, एकूण 309 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 12 हजार 849 रुग्ण आढळून आले आहेत.

मास्क वापरण्याचे आवाहन

महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. या विषाणूची संसर्ग क्षमता जास्त आहे. हे ध्यानात घेता कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित अंतराचे पालन करावे. एकाच ठिकाणी गर्दी करू नये. विशेषतः प्रत्येकाने मास्क वापरावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच ज्यांनी लस घेतली नाही, त्यांनी लसीचे दोन्ही डोस आवश्य घ्यावेत, असेही सांगण्यात आले आहे. कारण तूर्तास तरी कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस आणि मास्क हेच दोन पर्याय आहेत.

तर ठोठावणार दंड

सध्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूने सगळ्यांनाच धडकी भरवलीय. त्यात नाशिक जिल्ह्यात अजूनही कोरोना रुग्ण सापडत आहेतच. लसीकरणाची गती संथ झालीय. त्यामुळे कोरोना संसर्गाला आळा बसवा म्हणून प्रशासन आक्रमक झाले आहे. त्यांनी मास्क न घालणाऱ्यांवर पुन्हा एकदा कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही वाहनातून प्रवास करा. तुम्ही मास्क घातलेला नसेल, तर तर आता चक्क वाहनचालकाही दंड करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील 4 लाख 3 हजार 804 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 736 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

-डॉ. अनंत पवार, जिल्हा नोडल अधिकारी 

इतर बातम्याः

Alliance | मुंडे असते तर युती कायम राहिली असती, शिवसेना नेते संजय राऊत यांचे मोठे विधान; नव्या राजकीय चर्चेला उधाण

Nashik | हे भलतेच अवघड, नाशिकमध्ये चक्क 156 अधिकाऱ्यांची नावे मतदार यादीत दुबार, आता बोला…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें