आरक्षणासाठी ब्राह्मणांचा एल्गार, 40 संघटना मुंबईत धडकणार

आरक्षणासाठी ब्राह्मणांचा एल्गार, 40 संघटना मुंबईत धडकणार

पुणे : ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बाह्मणांच्या 40 संघटना राजधानी मुंबईत धडकणार आहेत. येत्या 22 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानात ब्राह्मण समाजाच्या वतीने आरक्षणासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्यातील एकूण 40 ब्राह्मण संघटना सहभागी होणार असल्याची माहिती ब्राह्मण समाजाचे समन्वयक विश्वजित देशपांडे यांनी दिली. आरक्षण आणि स्वतंत्र महामंडळ या मागण्यांसह 14 मागण्या […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:48 PM

पुणे : ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बाह्मणांच्या 40 संघटना राजधानी मुंबईत धडकणार आहेत. येत्या 22 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानात ब्राह्मण समाजाच्या वतीने आरक्षणासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्यातील एकूण 40 ब्राह्मण संघटना सहभागी होणार असल्याची माहिती ब्राह्मण समाजाचे समन्वयक विश्वजित देशपांडे यांनी दिली. आरक्षण आणि स्वतंत्र महामंडळ या मागण्यांसह 14 मागण्या ब्राह्मण समाजाच्या आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.

ब्राह्मण आरक्षण शक्य नाही

काही दिवसांपूर्वी टीव्ही 9 मराठीच्या ‘महाराष्ट्र महामंथन’ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मणांना आरक्षण देणं शक्य नसल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्री म्हणाले होते“ब्राह्मण आरक्षणाची मागणी अल्पप्रमाणात होत आहे. ब्राह्मणांना आर्थिक आरक्षण शक्य नाही. तशी तरतूद संविधानात नाही. आरक्षण हे शैक्षणिक आणि सामाजिक मागासांनाच मिळतं. ब्राह्मण समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या पुढारलेला आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक आरक्षण मिळू शकत नाही. सध्या खुल्या प्रवर्गातील जागा अनेक आहेत, तिथे त्यांनी जागा मिळवाव्या. आर्थिक स्तर म्हणाल तर  आर्थिक दुर्बल घटकांसाठी या सरकारने सर्व घटकांसाठी तरतूद केली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

ब्राह्मणांना आर्थिक आरक्षण शक्य नाही. तशी तरतूद संविधानात नाही. आरक्षण हे शैक्षणिक आणि सामाजिक मागासांनाच मिळतं. ब्राह्मण समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या पुढारलेला आहे. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात मराठा समाजाने आरक्षणासाठी मोठमोठे मूकमोर्चा काढले. धनगर समाजही आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला कायदा करुन आरक्षण देण्यात आले असून, ते लागूही करण्यात आलं. आता ब्राह्मण समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक होताना दिसत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें