नागपुरात गेल्या चार महिन्यात 92 गर्भवती महिलांना कोरोनाची लागण

नागपुरात गेल्या चार महिन्यात 92 गर्भवती महिलांना कोरोनाची लागण

नागपुरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत (Pregnant Women Corona Nagpur) आहे.

सचिन पाटील

| Edited By:

Aug 03, 2020 | 9:01 AM

नागपूर : नागपुरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत (Pregnant Women Corona Nagpur) आहे. पण याच दरम्यान नागपुरातील गर्भवती महिला हिम्मतीनं कोरोनावर मात करत असल्याचे समोर आले आहे. नागपुरात गर्भवती महिलांभोवती कोरोनाचा विळखा आहे. गेल्या चार महिन्यात 92 गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाली आहे (Pregnant Women Corona Nagpur).

जुलै महिन्यात 60 गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाली होती. आतापर्यंत 62 गर्भवती महिलांची प्रसुती सुरक्षित झाली आहे. नागपुरातील मेयो आणि मेडिकलच्या डॉक्टरांचं मोठं यश हे मानलं जात आहे.

जुलै महिन्यात 42 कोरोनाबाधित गर्भवती महिलांची प्रसुती झाली आहे. नागपुरातील सर्वच गर्भवती कोरोनाबाधित आईकडून कोरोना निगेटीव्ह बाळाला जन्म देण्यात आला आहे.

राज्यातही आतापर्यत मोठ्या प्रमाणात गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये मोठ्या संख्येने गर्भवती महिला कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत. त्यासोबत गर्भवती महिलांनी जन्म दिलेले बाळही कोरोना निहेटिव्ह जन्मास आले आहेत.

मुंबईत 300 गर्भवती महिलांची सुखरुप प्रसुती

मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात कोरोनाबाधित मातांच्या सुखरुप प्रसुतीने 300 चा टप्पा 13 जून 2020 रोजी रात्री पार केला आहे. नायर रुग्णालयाच्या या कामगिरीने कोरोना विरोधातील मानवाच्या लढ्यास एका वेगळ्या शुभवर्तमानाची जोड दिली आहे. उपलब्ध माहितीनुसार एकाच रुग्णालयात 300 कोरोनाबाधित मातांची प्रसुती झाल्याचे हे जगातील आजपर्यंतचे एकमेव उदाहरण आहे.

संबंधित बातम्या :

गर्भवती महिलेला दाखल करुन घेण्यास 3 रुग्णालयांचा नकार, उपचारविना रिक्षातच मृत्यू

जगात काय घडतंय? : लॉकडाऊनमध्ये इच्छा नसतानाही 70 लाख महिला गर्भवती होतील : यूएन

नागपूरमध्ये कोरोना काळातही राजकारण, दोन स्वतंत्र बैठका, तरीही निर्णय एकच!

नागपूरच्या लोकप्रतिनिधींना ‘इगो’ची लागण, कोरोनाकाळातही राजकारण

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें