जगात काय घडतंय? : लॉकडाऊनमध्ये इच्छा नसतानाही 70 लाख महिला गर्भवती होतील : यूएन

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जगातील अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्याशिवाय या दरम्यान, जगात अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत.

जगात काय घडतंय? : लॉकडाऊनमध्ये इच्छा नसतानाही 70 लाख महिला गर्भवती होतील : यूएन
Follow us
| Updated on: Apr 29, 2020 | 11:49 PM

मुंबई :  जगभरात कोरोना विषाणूचा प्रादु्र्भाव दिवसेंदिवस वाढत आहे (What Is Happening In World). कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जगातील अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्याशिवाय या दरम्यान, जगात अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर जगभरात घडत असलेल्या घडामोडींचा एक आढावा (What Is Happening In World)

1. लॉकडाऊनच्या काळात इच्छा नसतानाही 70 लाख महिला गर्भवती होतील, अशी माहिती संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालातून समोर आली आहे. इतकंच नाही तर विकसनशील आणि विकसित देशांमध्ये पुढच्या काही महिन्यात 5 कोटी महिला गर्भवती राहतील, त्यामुळे पुढच्या वर्षी लोकसंख्येत मोठी वाढ होण्याचीही शक्यता वर्तवली गेली. प्रामुख्यानं कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा तुटवडा असल्यामुळे ही शक्यता वर्तवण्यात येते आहे.

2. अमेरिकेचे खुद्द उपराष्ट्रपतीच मास्कविना फिरताना आढळून आले आहेत. काही दिवसांपूर्वी कोरोनापासून बरे झालेल्या लोकांची त्यांनी भेट घेतली होती. मात्र, भेटीदरम्यान सर्वांनी मास्क घातलेले असताना उपराष्ट्रपती माईक पेंस यांनी मास्क घातलेला नव्हता. हा व्हिडीओ अमेरिकेतल्या सोशल मीडियात व्हायरल झाला असून त्यांच्यावर मोठी टीका होते आहे.

3. तुर्कीनं अमेरिकेला मेडिकल उपकरणांची मदत पाठवली आहे. 5 लाख मास्क, 4 हजार पीपीई आणि इतर आवश्यक वस्तू तुर्कीनं अमेरिकेला दिल्या आहेत. दरम्यान खुद्द तुर्कीतही परिस्थिती गंभीर बनली आहे. तुर्कीत 1 लाख 14 हजारांहून जास्त लोक कोरोनाबाधित आहेत.

4. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याच्यावर नजर ठेवण्यासाठी अमेरिकेनं 5 गुप्तचर विमानं पाठवली आहेत. ‘द सन’नं ही बातमी प्रसिद्ध केली. किम जोंग नेमका कुठं आहे. त्याची माहिती ही विमानं घेणार आहेत. अमेरिकेसोबत दक्षिण कोरियाचं एक विमान सुद्धा उत्तर कोरियाच्या हद्दीत हेरगिरी करत असल्याची माहिती आहे.

5. ब्रिटनच्या पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पुत्रप्राप्ती झाली आहे. त्यांच्या होणाऱ्या पत्नीनं लंडनमधल्या एका रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला आहे. कैरी सायमड्सं यांच्यासोबत बोरिस जॉन्सन यांचा साखरपुडा झाला आहे. काही दिवसांपूर्वी बोरिस जॉन्सन स्वतःच कोरोनापासून बरे झाले आहेत.

6. कोरोनाच्या लसीबाबत संपूर्ण जगाच्या नजरा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडे लागल्या आहेत. मात्र, कोरोना लसीचं संशोधन करणाऱ्या टीममध्ये एका भारतीयाचाही समावेश आहे. मूळ कोलकात्याच्या असणाऱ्या चंद्रा दत्ता या संधोधन टीमच्या एक भाग आहेत. कोरोनाविरोधी लसीच्या टीममध्ये त्या गुणवत्ता व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत.

7. सार्वजनिक ठिकाणी मास्क घातलेला नसेल, तर जर्मनीत आता 8 लाखांचा दंड द्याावा लागणार आहे. जर्मनीनं आपल्या संपूर्ण 16 राज्यांमध्ये हा नियम लागू केला आहे (What Is Happening In World).

8. कोरोनाचं संक्रमण कसं आणि कुठंपर्यंत पसरलं याच्या तपासासाठी आता अमेरिकेत सांडपाण्याचे सुद्धा नमुने घेतले जाणार आहेत. ज्या भागात कोरोनाचं संक्रमण जास्त आहे. त्याठिकाणच्या सांडपाण्याचे नमुने घेतले जाणार आहेत. याआधी नेदरलँडमध्ये सुद्धा अशा प्रकारची चाचणी करण्यात आली होती. त्याद्वारे कम्युनिटी संक्रमण झालं की नाही, याचाही अंदाज लावता येणार आहे.

9. न्यूयॉकमध्ये एका अंत्यविधीत सहभागी झालेल्या लोकांना अटक करण्याचे आदेश निघाले आहेत. काही दिवसांपूर्वी निघालेल्या अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते. त्यांच्यावर कारवाई म्हणून न्यूयॉर्कच्या महापौरांनी सर्वांच्या अटकेचे आदेश काढले आहेत.

10. लॉकडाऊन आणि देशाचं चलन घसरल्यामुळे लेबनॉनमधली परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं चित्र आहे. एका बातमीनुसार तिथल्या लोकांनी आता थेट बँकांवर दरोडा घालणं सुरु केलं. गेल्या काही दिवसात असंख्य बँकांवर दरोडे पडले आहेत आणि देशातल्या अनेक भागात तीव्र आंदोलनंही सुरु झाली आहेत.

11. कोरोनामुळे इक्वाडोरची आरोग्य यंत्रणा जवळपास कोसळण्याच्या मार्गावर आहे. इक्वाडोरमध्ये 24 हजारांहून जास्त लोक कोरोनाबाधित आहेत. मात्र आरोग्य यंत्रणा नव्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अपूर्ण पडू लागली आहे.

12. कोरोनावर कंट्रोल मिळवल्यानंतर 22 मेपासून चीनमध्ये संसदीय अधिवेशन सुरु होणार आहे. याआधी 5 मे ला अधिवेशन सुरु होणं अपेक्षित होतं. मात्र, आता 22 मे ही नवी तारीख (What Is Happening In World) दिली गेली आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.