AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिबट्यांनंतर आता मनमाडमध्ये लांडग्याचा हल्ला, चारजण गंभीर जखमी

शेतात जाणाऱ्या चार जणांवर पिसाळलेल्या लांडग्यांने हल्ला केला असून त्यात दोन महिला आणि दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहेत.

बिबट्यांनंतर आता मनमाडमध्ये लांडग्याचा हल्ला, चारजण गंभीर जखमी
| Edited By: | Updated on: Oct 31, 2020 | 9:06 PM
Share

मनमाड : नागरी वस्त्यात घुसून बिबटे हल्ले करीत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, आता लांडगेदेखील गावात शिरून माणसांवर हल्ला करू लागले आहेत. अशीच एक घटना आज (शुक्रवार) सकाळी मनमाडपासून जवळ असलेल्या हिसवळ बुद्रुक इथं घडली. शेतात जाणाऱ्या चार जणांवर पिसाळलेल्या लांडग्यांने हल्ला केला असून त्यात दोन महिला आणि दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. (A wolf attack in Manmad four seriously injured)

मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे हिसवळ गाव परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हिसवळ परिसरात मोकाट कुत्र्यासोबत आता लांडग्याचादेखील मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. यामुळे नागरिकांना असणारा धोका लक्षात घेत वन विभागाने लांडग्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्चे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात जावून जखमींची भेट घेत त्यांची विचारपूस केली. मनमाडपासून जवळ हिसवळ बुद्रुक गाव आहे. आज सकाळी मीना आहेर (वय-45), सुनीता पवार (वय 35), जगन आहेर (वय 65) आणि मोहन सोळसे (वय 30) हे चार जण शेतात जात असताना दबा धरून बसलेल्या लांडग्यांने त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे या चौघांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून गावातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. यामुळे लांडगा पळून गेला.

काही तरुणांनी त्याचा पाठलाग करून त्याला लाठ्या-काठ्यांनी मारण्याचा प्रयत्न केला मात्र, लांडगा जंगलात पसार झाला. यानंतर चारही जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी डी.बी.बोरसे, डी.जी.सुर्यवंशी, सी.इ.भुजबळ, अशोक सोनावणे यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. मनमाडसह नांदगाव तालुक्यात वनविभागाचे मोठे जंगल असून त्यात हरीण, मोर, ससे, लांडगे यासह इतर वन्यप्राणी आहेत. यामुळे गावात येऊन लांडग्यांने लोकांवर हल्ला केल्याची या भागात ही पहिलीच घटना मानली जात आहे.

इतर बातम्या – 

उदयनराजे आणि रामराजे यांच्यातला अबोला अखेर संपला, साताऱ्यात दोघांच्या मनसोक्त गप्पा
US Election 2020: ट्रम्प यांना मागे टाकत 8 अंकांनी बायडेन आघाडीवर – सर्वे

(A wolf attack in Manmad four seriously injured)

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...