दोन सख्ख्या बहिणींचं अपहरण, मजूर बापाकडे अपहरणकर्त्यांची दोन कोटींच्या खंडणीची मागणी

दोन सख्ख्या बहिणींचं अपहरण करुन दोन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींच्या (Accused Kidnapped two sisters) पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

दोन सख्ख्या बहिणींचं अपहरण, मजूर बापाकडे अपहरणकर्त्यांची दोन कोटींच्या खंडणीची मागणी
Follow us
| Updated on: Mar 10, 2020 | 3:57 PM

नाशिक : दोन सख्ख्या बहिणींचं अपहरण करुन दोन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींच्या (Accused Kidnapped two sisters) पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. येवला तालुका पोलीस आणि नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे अपहरण करण्यात आलेल्या मुलींचे वडील हे मोलमजुरीचं काम करतात. तरीही अपहरणकर्त्यांकडून (Accused Kidnapped two sisters) दोन कोटींची खंडणी मागितली गेल्यामुळे पोलिसांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. पोलिसांनी या दोघी बहिणींची सुटका केली आहे.

दोघांपैकी मोठी बहिण ही 17 वर्षांची तर लहान 15 वर्षांची आहे. ते येवला तालुक्यातील गुजरखेडे येथे वास्तव्यास आहेत. संशयित आरोपी राहुल विजय पवार (वय 20) याने रविवारी रात्री म्हणजे 8 मार्चला रात्री काहीतरी आमिष दाखवून दोघी बहिणींचं अपहरण केलं. या कामात त्याला तृतीयपंथी असलेला दुसरा संशयित आरोपी पूजा उर्फ दिनेश राजेंद्र सोळसे याने मदत केली. राहुल पवार हा मनमाड तालुक्यातील नवसारी भागात राहतो. तर दिनेश सोळसे कोपरगाव तालुक्यातील पोहोगावचा रहिवासी आहे.

हेही वाचा – मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही, आव्हाडांची गणेश नाईकांवर बोचरी टीका

राहुल पवार मुलींना दिनेश सोळसेच्या कोपरगाव येथे घेऊन गेला. त्याने अपहरण केलेल्या मुलींच्या वडिलांना फोन करत तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. दोन कोटी न दिल्यास मुलींना जीवे मारु, अशी धमकी दिली. घाबरलेल्या मुलींच्या वडिलांनी तातडीने येवला तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे त्यांनी पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी अपहरणकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी ‘अशी’ केली कारवाई

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंग तसेच मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक आणि मनमाड उपविभागीय अधिकारी समरसिंह साळवे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब कारवाईला सुरुवात केली. त्यांनी येवला तालुका पोलीस ठाणे आणि नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हा शाखेचे असे दोन पथक तयार केले. त्यांना या प्रकरणी गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचला. दोन्ही पथकांना कोपरगाव तसेच शिर्डी परिसरात पाठवण्यात आले. अखेर मध्यरात्री दोघी आरोपींना पोलिसांनी अटक करत मुलींची सुटका केली.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.