AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भावा, तुझी वेळ तर आता सुरु झाली होती’, इरफानच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा

अभिनेता इरफान खान यांचं वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर बॉलवूडवर शोककळा पसरली आहे (Veterans tribute to irrfan khan).

'भावा, तुझी वेळ तर आता सुरु झाली होती', इरफानच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा
इरफान खानने आतापर्यंत अनेक हिंदी, इंग्रजी चित्रपट आणि बऱ्याच मालिकांमध्येही काम केलं होतं.
| Updated on: Apr 29, 2020 | 4:00 PM
Share

मुंबई : “भावा, तुझा अभिनय क्षेत्रातला खरा प्रवास तर आता सुरु झाला होता (Veterans tribute to irrfan khan). तुझी वेळ आता सुरु झाली होती. तू आणखी भरपूर काम केलं असतंस तर तुझ्या कामाची दखल इतिहासाला घ्यावी लागली असती. इतिहासाच्या पानांवर तुझं नाव लिहिलं गेलं असतं”, असं म्हणत चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी अभिनेता इरफान खानला श्रद्धांजली वाहिली. अभिनेता इरफान खान यांचं वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर बॉलवूडवर शोककळा पसरली आहे (Veterans tribute to irrfan khan).

इरफान खान यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर सिनेसृष्टीतील आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनीदेखील ट्विटरवर इरफान यांना श्रद्धांजली अर्पण केली. “इरफान यांच्या निधनाची बातमी कळली. ही खूप दु:खद अशी घटना आहे. इरफान मेहनती आणि हुशार अभिनेते होते. सिनेसृष्टीत त्यांचं मोठं योगदान आहे”, असं अमिताभ बच्चन म्हणाले.

अभिनेता शाहरुख खानने ट्विटरवर दु:ख व्यक्त केलं. “माझा मित्र, माझी प्रेरणा आणि आमच्या काळातला महान कलाकार. तू आमच्या आयुष्याचा भाग होता याचा आनंद कायम राहील”, असं अभिनेता शाहरुख खान म्हणाला.

इरफानच्या निधनानंतर दिग्दर्शक करण जोहरनेदेखील शोक व्यक्त केला आहे. “धन्यवाद! न विसरता येणाऱ्या सिनेमांच्या आठवणींबद्दल. धन्यवाद! कलाकार म्हणून तू अभिनयाचा दर्जा वाढवल्याबद्दल.  धन्यवाद! सिनेसृष्टीला समृद्ध केल्याबद्दल.  तुझी खूप खूप आठवण येत राहील, पण तू आमच्यात राहिल्याबदद्ल आम्ही कृतज्ञ आहोत. तुला सलाम!”, असं दिग्दर्शक करण जोहर म्हणाला आहे.

“तुझ्या प्रत्येक गोष्टीत तू आणलेला करिष्मा  म्हणजे एक जादूच.  तुझ्या प्रतिभेने तू आम्हा सर्वांना प्रेरित केलं. तुझी खूप आठवण येईल”, असं अभिनेत्री प्रियंका चोप्रा म्हणाली.

अभिनेते परेश रावल यांनी इरफानला श्रद्धांजली अर्पण करताना “इरफान तुझ्यासारखं कुणीच नसेल”, असं म्हटलं. दरम्यान, ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांनीदेखील इरफानला श्रद्धांजली अर्पण केली.

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनीदेखील इरफान खान यांना ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली. “गुणी अभिनेते इरफान यांच्या निधनाची बातमी मिळाल्यावर खूप दु:ख झालं”, असं लता मंगेशकर म्हणाल्या.

राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची इरफान खान यांना श्रद्धांजली

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनीदेखील इरफान यांना श्रद्धांजली वाहिली. “अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला आहे. दुर्धर असा कॅन्सर झाला असून सुद्धा न खचता, सकारात्मकतेने इरफान यांनी हे वास्तव स्वीकारले आणि उपचार सुरु असतांना परत उत्साहाने उभे राहिले”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर दु:ख व्यक्त केलं आहे. “इरफान हे एक हुशार आणि हरहुन्नरी कलाकारा होते. ते जागतिक पातळीवर भारताचे ब्रँड अॅम्बेसीडर होते. त्यांची कायम आठवण येत राहील. या दु:खद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीय आणि चाहत्यांसोबत आम्ही आहोत”, असं राहुल गांधी म्हणाले.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीदेखील इरफान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. इरफान यांच्या निधनाची बातमी कळताच धक्का बसला. या कठीण परिस्थितीत परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो, असे अशोक गहलोत म्हणाले.

प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनीदेखील ट्विटरवर इरफान यांना श्रद्धांजली अर्पन केली. यावेळी त्यांनी कवितेच्या ओळींमार्फत आपलं दु:ख व्यक्त केलं.

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.